मातीच्या कुशीत
मातीच्या कुशीत जन्मलास, तेंव्हा निसर्ग दरवळला,
मायेच्या ममतेत भिजलास, तेंव्हा सुगंध दरवळला !
भोगुनी कठोर श्रमाला, जिंकण्यास जग साऱ्या,
प्रेमाचा संदेश निपजला, तेंव्हा स्नेह दरवळला !
अनेक सवंगडी गवसती, येती, रमती, बिलगती,
नात्याला पाजर फुटला, तेंव्हा प्रेम दरवळला !
योग्यता झाली पारखी, तसे दानशूर बरवळला,
सृष्टीचा पालनहार झाला, तेंव्हा कर्मफळ दरवळला!
अनेक कत्तली झाली, त्यांचेही सरणे रचू लागली,
एकदाच दोघांनाही पेटवला, तेंव्हा सरण गंध दरवळला!
✍️- सुनिल नरसिंग राठोड, मुरूम
0 Comments