मानव चूकते (गझल - श्री सुनिल नरसिंग राठोड, मुरूम)



मानव चुकते

कधी देव तर , कधी दैत्य चूकते
कळूनही सारे ,स्वार्थी मन चूकते!

कधी हसणं , तर कधी रडणं ,
बेभान मनाचे, दुष्ट चक्र चूकते!

बोल तुझे मोठे , जसे जग बदले
तोंड जरी तुझें  , तरी बोल चूकते!

हाती तुझ्या दिवा, तरी मन अंधारे,
खरी आहे वात, तरी  तेज चूकते !

जयाने माजले, पतनाने खचले
क्षणात शत्रू होत, पण मैत्री चूकते!

कधी पुन्य तर , कधी भोगते पाप,
संचित आहे तरी, पण कर्म चूकते !

अहंकार मिरवी, भित्री नाती गिरवी
निती ठीक आहे, पण मती चूकते!

'सुनिल' सतत मानव बदलते,
सत्याच्या शोधात,पण मानव चूकते!


✍️ - श्री सुनिल नरसिंग राठोड, मुरूम 
मो. 9763961999


Post a Comment

0 Comments