●गोळ्यांच्या अतिसेवनाने 'अप्लास्टिक अनेमिया' हा आजार जीवघेणाही ठरू शकतो ●
आपण आज काल कोणत्याही रोगासाठी डॉक्टर कडे न जाता मेडिकल मधून डॉक्टर च्या सल्ल्यानुसार गोळ्या घेण्यापेक्षा आपल्याच मनाने मेडिकल वाल्याला सांगून गोळ्या घेवून येतो व त्याचे सेवन करतो. डोके दुखी असेल, सर्दी असेल, ताप असेल अथवा अंग दुखत असेल तर मेडिकल मधून आणून त्याचे सेवन केलेच म्हणून समजा, म्हणजेच छोट्या मोठ्या आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधगोळ्यांच्या अतिसेवनाने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अप्लास्टिक अनिमिया सारखे गंभीर परिणाम सुद्धा भोगावे लागतात आणि ही सवय जीवघेणीही ठरू शकते कसे ते पाहू..
👉 आपल्या शरीरातील अस्थिमज्जेमधून (बोनमॅरो) सर्वच रक्तपेशी तयार होणे कमी होते. म्हणजे रक्त तयार करणाऱ्या संस्था कमी होतात, तेव्हा अप्लॅस्टिक अॅनेमिया होतो.
👉हा आजार जुनाच असला, तरी तो काहींना आनुवंशिकतेने, रासायनिक औषधी फवारून पिकवलेल्या अन्नधान्याने, एक्स-रेच्या जास्त थेरपीने अथवा औषध गोळ्यांच्या अतिसेवनाने संभवतो.
👉वेळीच उपचार केल्यास याला रोखता येते; अन्यथा लाखो रुपये खर्च करूनही रुग्ण दगावू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
👉अनिमियाचे रुग्णालयात महिन्याकाठी अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. खासगी रुग्णालयात ही संख्या दुप्पट असते. विशेष म्हणजे, अप्लॅस्टिक अॅनेमिया आजाराचे मूळ कारण आतापर्यंत समोर आलेले नाही.
👉आधुनिक उपचारपद्धतीने या अवजारातून सर्वसामान्य जीवन रुग्णाला जगता येते. या आजारात रुग्णाला परत-परत पांढऱ्या पेशी देण्याची गरज पडते.
👉लाल (लोहित) व पांढऱ्या पेशी वाढविणाऱ्या संस्था कमी होतात. लाल पेशीची संख्या कमी झाल्यानंतर अॅनेमिया हा आजार होते.
👉या पेशी शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करतात. पांढऱ्या रक्तपेशी शरीर संरक्षका म्हणून काम करतात. यासह प्लेटलेट्स (रक्तकणिका) शरीरातील रक्तस्त्रावापासून बचाव करतात.
👉 या आजारामुळे त्या कमी होतात. यामुळे शरीरात कुठेही रक्तस्त्राव होऊ शकतो. तथापि, ही व्याधी म्हणजे कर्करोग नव्हे, पेशी किती प्रमाणात कमी झाल्या, त्यावरून अप्लॅस्टिक अॅनेमियाची व्याप्ती कळते.
■आपणास काय काळजी घ्यावी लागेल ?■
👉ताजे व चांगले शिजवलेले अन्न खावे,
👉कच्चा भाजीपाला खाणे टाळा,
👉फळे ही साल काढून खावीत.
👉आहारात प्रथिनयुक्त अंडे-मांस खावे.
👉 ग्रेपट्टीन बिस्कीट, सोया, पनीर, भाजलेला सुकामेवा खावा.
👉 अंघोळीच्या पाण्यात जंतुनाशक टाका.
👉 वेळोवेळी रक्ताची तापसणी करा.
👉हिमोग्लोबीन सातपेक्षा कमी होऊ देऊ नका,
👉प्लेटलेट्सवर लक्ष ठेवून राहा.
◆सावधान◆
👉काहींना मनाने औषधी घेण्याचे केवळ फायदेच जाणवतात. परंतु त्याचे दुष्परिणाम देखील जाणवत नाहीत.
👉मेडिकलवरुन शक्यतो अँटिबॅटिक, स्टुराईड, पेनकिलर टॅबलेट घेतल्या जातात. याचे दीर्घ काळ दुष्परिणाम जाणवतात.
👉अशा प्रकारे औषधी घेतल्याने व सतत असेच खाल्याने पोटाचे आजार, अल्सर, एनिमिया, किडनी विकार यांचा धोका संभवतो.म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे.
■आता याला उपाय काय?■
👉 रक्त, प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर तत्काळ डॉक्टरांना दाखवा.
👉आजाराच्या लक्षणानुसार गोळ्या अथवा एटीजी इंजेक्शन घेणे गरजचे आहे, ज्याचा खर्च तीन ते सहा लाख येतो तर मुंबई, पुण्याला दुप्पट खर्च येतो.
👉रुग्ण तिसऱ्या स्टेजला असेल, तर त्यांना बोनमॅरो डोनरच्या माध्यमातून ट्रॉन्सप्लांट हा पर्याय असतो.
👉स्टेमपेशीचे रोपण हा पर्याय असतो.
◆या आजाराची लक्षणे असतात तरी कशी?◆
👉लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स कमी होणे,
👉 थकवा जाणवणे,
👉सुस्ती येणे,
👉 दम लागणे,
👉चक्कर येणे
👉 घबराट होणे,
👉डोळे व जीभ पांढरी वाटणे,
👉सतत डोके दुखणे,
👉कानात आवाज येणे,
👉वारंवार घसा दुखणे,
👉ताप येणे,
👉छातीत संसर्ग,
👉त्वचेचा संसर्ग,
👉ब्रश करताना हिरड्यातून रक्त येणे,
👉नाकातून रक्त,
👉तोंडात फोड,
👉स्त्रियांच्या मासिक पाळी जास्त दिवस चालणे,
👉जास्तीचा रक्तस्त्राव होणे,
👉अंगावर लाल डाग,
👉पुरळ उठणे.
असे लक्षणे दिसली की ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे.
संकलन -सुनील राठोड
0 Comments