गोळ्यांच्या अतिसेवनाने 'अप्लास्टिक अनेमिया' हा आजार जीवघेणाही ठरू शकतो 😯

 


●गोळ्यांच्या अतिसेवनाने 'अप्लास्टिक अनेमिया' हा आजार जीवघेणाही ठरू शकतो ●

आपण आज काल कोणत्याही रोगासाठी डॉक्टर कडे न जाता मेडिकल मधून डॉक्टर च्या सल्ल्यानुसार गोळ्या घेण्यापेक्षा आपल्याच मनाने मेडिकल वाल्याला सांगून गोळ्या घेवून येतो व त्याचे सेवन करतो. डोके दुखी असेल, सर्दी असेल, ताप असेल अथवा अंग दुखत असेल तर मेडिकल मधून आणून त्याचे सेवन केलेच म्हणून समजा, म्हणजेच छोट्या मोठ्या आजारांसाठी डॉक्टरांचा सल्ला न घेता औषधगोळ्यांच्या अतिसेवनाने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन अप्लास्टिक अनिमिया सारखे गंभीर परिणाम सुद्धा भोगावे लागतात आणि ही सवय  जीवघेणीही ठरू शकते कसे ते पाहू..

👉 आपल्या शरीरातील अस्थिमज्जेमधून (बोनमॅरो) सर्वच रक्तपेशी तयार होणे कमी होते. म्हणजे रक्त तयार करणाऱ्या संस्था कमी होतात, तेव्हा अप्लॅस्टिक अॅनेमिया होतो. 

👉हा आजार जुनाच असला, तरी तो काहींना आनुवंशिकतेने, रासायनिक औषधी फवारून पिकवलेल्या अन्नधान्याने, एक्स-रेच्या जास्त थेरपीने अथवा औषध गोळ्यांच्या अतिसेवनाने संभवतो. 

👉वेळीच उपचार केल्यास याला रोखता येते; अन्यथा लाखो रुपये खर्च करूनही रुग्ण दगावू शकतो, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

👉अनिमियाचे  रुग्णालयात महिन्याकाठी अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. खासगी रुग्णालयात ही संख्या दुप्पट असते. विशेष म्हणजे, अप्लॅस्टिक अॅनेमिया आजाराचे मूळ कारण आतापर्यंत समोर आलेले नाही.

👉आधुनिक उपचारपद्धतीने या अवजारातून सर्वसामान्य जीवन रुग्णाला जगता येते. या आजारात रुग्णाला परत-परत पांढऱ्या पेशी देण्याची गरज पडते. 

👉लाल (लोहित) व पांढऱ्या पेशी वाढविणाऱ्या संस्था कमी होतात. लाल पेशीची संख्या कमी झाल्यानंतर अॅनेमिया हा आजार होते. 

👉या पेशी शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करतात. पांढऱ्या रक्तपेशी शरीर संरक्षका म्हणून काम करतात. यासह प्लेटलेट्स (रक्तकणिका) शरीरातील रक्तस्त्रावापासून बचाव करतात.

👉 या आजारामुळे त्या कमी होतात. यामुळे शरीरात कुठेही रक्तस्त्राव होऊ शकतो. तथापि, ही व्याधी म्हणजे कर्करोग नव्हे, पेशी किती प्रमाणात कमी झाल्या, त्यावरून अप्लॅस्टिक अॅनेमियाची व्याप्ती कळते.



■आपणास काय काळजी घ्यावी लागेल ?■


👉ताजे व चांगले शिजवलेले अन्न खावे, 

👉कच्चा भाजीपाला खाणे टाळा, 

👉फळे ही साल काढून खावीत. 

👉आहारात प्रथिनयुक्त अंडे-मांस खावे.

👉 ग्रेपट्टीन बिस्कीट, सोया, पनीर, भाजलेला सुकामेवा खावा.

👉 अंघोळीच्या पाण्यात जंतुनाशक टाका.

👉 वेळोवेळी रक्ताची तापसणी करा.

👉हिमोग्लोबीन सातपेक्षा कमी होऊ देऊ नका, 

👉प्लेटलेट्सवर लक्ष ठेवून राहा.


◆सावधान◆


👉काहींना मनाने औषधी घेण्याचे केवळ फायदेच  जाणवतात. परंतु त्याचे दुष्परिणाम देखील जाणवत नाहीत. 

👉मेडिकलवरुन शक्यतो अँटिबॅटिक, स्टुराईड, पेनकिलर टॅबलेट घेतल्या जातात. याचे दीर्घ काळ दुष्परिणाम जाणवतात.

👉अशा प्रकारे औषधी घेतल्याने व सतत असेच खाल्याने पोटाचे आजार, अल्सर, एनिमिया, किडनी विकार यांचा धोका संभवतो.म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे.



■आता याला उपाय काय?■


👉 रक्त, प्लेटलेट्स कमी झाल्यानंतर तत्काळ डॉक्टरांना दाखवा. 

👉आजाराच्या लक्षणानुसार गोळ्या अथवा एटीजी इंजेक्शन घेणे गरजचे आहे, ज्याचा खर्च तीन ते सहा लाख येतो तर मुंबई, पुण्याला दुप्पट खर्च येतो. 

👉रुग्ण तिसऱ्या स्टेजला असेल, तर त्यांना बोनमॅरो डोनरच्या माध्यमातून ट्रॉन्सप्लांट हा पर्याय असतो. 

👉स्टेमपेशीचे रोपण हा पर्याय असतो.


◆या आजाराची लक्षणे असतात तरी कशी?◆


👉लाल पेशी, पांढऱ्या पेशी, प्लेटलेट्स कमी होणे,

👉 थकवा जाणवणे, 

👉सुस्ती येणे,

👉 दम लागणे, 

👉चक्कर येणे

👉 घबराट होणे, 

👉डोळे व जीभ पांढरी वाटणे, 

👉सतत डोके दुखणे, 

👉कानात आवाज येणे, 

👉वारंवार घसा दुखणे, 

👉ताप येणे, 

👉छातीत संसर्ग, 

👉त्वचेचा संसर्ग, 

👉ब्रश करताना हिरड्यातून रक्त येणे, 

👉नाकातून रक्त, 

👉तोंडात फोड, 

👉स्त्रियांच्या मासिक पाळी जास्त दिवस चालणे, 

👉जास्तीचा रक्तस्त्राव होणे, 

👉अंगावर लाल डाग, 

👉पुरळ उठणे.


असे लक्षणे दिसली की ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणे.


संकलन -सुनील राठोड


Post a Comment

0 Comments