दहावीची परीक्षा देताय ? नक्कीच वाचा 👇👇

दहावीची परीक्षा देताय ? नक्कीच वाचा 👇👇


           कोणत्याही मुलांच्या शालेय जीवनातील महत्त्वाची समजली जाणारी दहावीची परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आलीय. त्यामुळे मुलांमध्ये तसंच पालकांमध्ये मनात चिंतेचे वातावरण आहे. एससीसी बोर्डाच्या परीक्षेच्या पेपरची अनेकांना भीती असतेकारण हे मुले पहिल्यांदा अशा परीक्षेला सामोरे जात आहेत. या परीक्षेत उत्तर पत्रिका कशी द्यावी, परीक्षेपूर्वी अभ्यास कसा करावा याचं विद्यार्थ्यांना खूप मोठं टेन्शन असतं. तुम्हालाही टेन्शन असेल तर दहावीला शंभर पैकी शंभर टक्के मार्क्स मिळवायचे असतील तर खाली काही टिप्स दिल्या आहेत त्या नक्की समजून घ्या. 


दहावीची परीक्षा देताय ? नक्कीच वाचा 👇👇


👉औरंगाबाद ची स्वराली 100 टक्के मार्क मिळवलं त्याने कसा केला अभ्यास? 

📌औरंगाबाद शहरातील सिडको भागांमध्ये राहणारी स्वराली श्रीहरी जोशीने आठवी आणि नववीमध्ये ऑनलाईन शिक्षण घ्यावं घेतलं होतं. 

📌त्यामुळे दहावीत प्रवेश घेतल्यानंतर तिला दडपण आलं होतं की मी पुढे कसे टिकणार ? काही विषयांमध्ये सुधारणाही करायची होती. स्वरालीनं नियोजनबद्ध पद्धतीनं अभ्यास करण्यास सुरूवात केली. 

📌स्वरालीचा गणित हा विषय थोडा कच्चा होता. त्यामुळे तिनं गणिताकडं विशेष लक्ष दिलं. 

📌गणितामधील संकल्पना पाठ करण्याऐवजी त्या समजून घेण्यावर विशेष भर दिला. 

📌इंग्रजीमधील रायटिंग स्किल हा भाग 25 मार्कांचा असतो, त्यामुळे त्याचीही स्वरालीनं खास तयारी केली. 


दहावीची परीक्षा देताय ? नक्कीच वाचा 👇👇




👉स्वरालीने कशी दिली परीक्षा?

📌तिची ‘दहावीची परीक्षा सुरू झाल्यानंतर ज्या विषयाचा पेपर आहे, त्या दिवशी तिने त्या विषयातील महत्त्वाचे मुद्दे वाचले. 

📌स्वरालीने परीक्षेच्या दिवशी जास्त वाचन केला नाही कारण परीक्षेच्या दिवशी जास्त वाचन केल्यानं गोंधळ वाढतो. त्यामुळे जे मुद्दे अवघड वाटतात त्यावरच विशेष लक्ष दिलं.

📌तिने  पेपर नेहमीच क्रमानं सोडवलाय जो प्रश्न समजत नसेल, अवघड वाटत असेल त्यावर जास्त वेळ न घालवता पुढील प्रश्न सोडवले आणि त्यानंतर उरलेल्या वेळेत त्या प्रश्नाला वेळ दिला,’


दहावीची परीक्षा देताय ? नक्कीच वाचा 👇👇


   आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परीक्षेच्या कालावधीत त्याच्या पालकांनी तिला मानसिक आधार दिला. ही तिच्यासाठी खूप  महत्त्वाची गोष्ट होती. स्वरालीने कोणतंही टेन्शन न घेता प्रसन्न मुडमध्ये परीक्षा दिली. म्हणून तिला सहज यश मिळालं. तुम्हालाही या पद्धतीनं चांगले मार्क्स मिळतील,’ असा सल्ला स्वरालीनं दिला आहे.

       तर मग तुम्हाला ही स्वराली सारखे 100 पैकी 100 मार्क्स मिळवायचे असेल तर स्वरालीने वर दिलेल्या टिप्स नक्की आपल्या अभ्यासात वापरा मग नक्कीच तुम्हालाही स्वराली सारख यश मिळेल यात शंका नाही...


✍️सुनिल नरसिंग राठोड.

Post a Comment

0 Comments