आपला स्मार्टफोन चोरीला गेला तर काय कराल? असे झाल्यास तात्काळ कोणती पाऊले उचलावे ?

 आपला स्मार्टफोन चोरीला गेला तर काय कराल? असे झाल्यास तात्काळ कोणती पाऊले उचलावी ?


        मित्रांनो आपण पाहतच आहोत की सध्या  इंटरनेट-स्मार्टफोनच्या वापरामुळे ऑनलाइन खरेदीचे प्रमाण देशात प्रचंड प्रमाणात वाढले आहे. कारणही असेच आहे वाढत्या यूपीआय व्यवहारांनी आतापर्यंत अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. 

     परंतु याचबरोबर याचे खूप मोठे दुष्परिणाम सुद्धा आहेत सायबर गुन्हेगारांकडून होणाऱ्या आर्थिक लुबाडणुकीच्या घटनाही वाढत आहेत. अशात चोरट्याने तुमचा स्मार्टफोन लांबवल्यास त्यातील माहितीचा वापर करून तुमचे बँक खाते साफ केली जाण्याची भीती असते. त्यामुळे ग्राहकांना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. काही गोष्टींबाबत सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. त्या कोणत्या गोष्टया आहेत हे जाणून घेऊयात.

 ■  घ्यावयाची दक्षता 

आपले कोणतेही पासवर्ड कधीही सेव्ह करू नका

        स्मार्टफोनमध्ये युजर्सची खासगी माहिती आणि व्यवहारांची नोंद असते. चोराकडून बँक खाते साफ केले जाऊ नये यासाठी पासवर्ड कुठेही सेव्ह करू नये, ही बाब लक्षात ठेवा. तुमची आर्थिक माहिती असलेल्या सर्व प्रकारच्या ऍप पासवर्ड लॉक करा. आपले नेट बँकिग पासवर्ड मोबाइल तसेच गुगल अकाऊंटवर कधीही सेव्ह करू नका.


यूपीआय तातडीने ब्लॉक करा

          चोरट्याने मोबाइल चोरल्यास कस्टमर केअरवर फोन करून बँक खाते व यूपीआय ब्लॉक करा. यासाठी उशीर लावू नका. अन्य मोबाइलवरहूनही तुम्हाला हे काम करणे शक्य असते. तसे तुम्ही करू शकता ..


पासवर्ड सुरक्षीततेची खबरदारी घ्या

       आपण आर्थिक व्यवहारांसाठी वापरल्या जाणाऱ्या एप्स वर पासवर्डच्या माध्यमातून दुहेरी सुरक्षा द्या. मोबाइल पासवर्ड असल्याने कोणत्याही अनोळखी व्यक्तीला तो चालू करणे शक्य होत नाही. तसेच पासवर्ड असल्याने ऍपचाही वापर करणे शक्य होणार नाही.


कोणत्याही अतिरिक्त व अनावश्यक अधिकच्या ऍप्सचा वापर करणे टाळा.

      आपणास विनाकारण  अनेक प्रकारच्या अप्सचा वापर करण्याची सवय असते . परंतु हे चुकीचे व धोक्याचे आहे. यामुळे मोबाइलमध्ये छेडछाडीच्या शक्यता वाढतात. व्यवहारांसाठी एक ऍप पुरेशी असते. वरवरचा खर्च, अचानकच्या खर्चासाठी मोबाइल वॉलेटमध्ये काही पैसे ठेवणे चांगले ठरते. 


 ◆ सुरक्षित Apps चा वापर करा.

      सध्या युजर्ससाठी अनेक प्रकारच्या यूपीआय ऍप्सचा उपलब्ध आहेत. सुरक्षेच्या तक्रारींवरून आरबीआय सातत्याने सदोष apps वर कारवाई करीत असते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोत्तम apps चा वापर करा. सुरक्षेबाबत सर्व फिचर्सची पडताळणी करून अपची निवड करा. 


उपरोक्त सर्व प्रकारच्या settings आपल्या मोबाईल मध्ये करून घेऊन आपले मोबाईल आणि अँप्स वापरावे .....


सौजन्य - लोकमत न्यूज 

Post a Comment

0 Comments