महाराष्ट्रातील तब्बल 38 हजार 735 शाळेतील शिक्षकांचे वेतन रोखणार ?

 महाराष्ट्रातील तब्बल 38 हजार 735 शाळेतील शिक्षकांचे वेतन रोखणार ?


यु -डायसवर नोंदणी करताना टाळाटाळ केलेल्या   शाळेवरील मुख्याध्यापक व शिक्षकांचे वेतन रोखणार ? 

 संचालकांनी उचलले कठोर पाऊल... एमपीएसपी चे आदेश...

    शैक्षणिक योजनांच्या अंदाजपत्रकांसाठी UDISE वरील माहिती ग्राह्य धरली जाते , अन हीच माहिती जर नसेल तर कसे होईल.? अशी माहिती देताना काही शाळांकडून माहितीच भरली गेली नसल्याचे निदर्शनात आले आहे .त्यामुळे राज्यातील आशा 38 हजार 735 शाळांमधील शिक्षकांचे वेतन रोखण्याचे आदेश संचालकाकडून निर्गमित झाले आहेत असे दिसून येते.. 

   महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी गुरुवारी सर्वच शिक्षणाधिकाऱ्यांना हे आदेश निर्गमित केले आहे ..

      यापूर्वी 2023-24 सत्राची माहिती udise प्लस पोर्टलवर भरण्याचे कार्य सप्टेंबर पासून सुरू करण्यात आले होते.याची मुदत 31 ऑक्टोबर पर्यंत देण्यात आली होती.परंतु ही मुदत संपून महिनाही लोटला परंतु अद्याप पर्यंत 38 हजारावर शाळांनी पोर्टलवर माहितीच भरली नाही . यात भौतिक सुविधांची माहिती अद्यावत न केलेल्या शिक्षकांचे नोव्हेंबर चे वेतन अदा करण्यात येऊ नये तसेच वेतन पथकांनी udise ची माहिती भरल्याचे मुख्याध्यापकाकडून प्रमाणित करून घेतल्यानंतरच त्यांचे वेतन अदा करण्यात यावा . असे आदेश आहेत .

      त्यामुळे राज्यातील मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यामध्ये नाराजी चे सूर पसरले असून विविध संघटनांनी विविध प्रकारच्या सोयी सुविधा नसल्याचे  सांगून आपली नाराजी व्यक्त केलेली आहे... तसेच अशा प्रकारच्या online कामे करण्यासाठी प्रशासनाकडून शिक्षकांना धारेवर धरणे , त्यांच्याकडे अपुरे असलेल्या साधन सामग्री जसे की संगणक, मोबाईल ,टॅब , इंटरनेट , व ऑपरेटर आदींच्या अभावी अशा प्रकारचे कामे करणासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांना कुठल्याच प्रकारचे आर्थिक सहकार्य मिळत नसल्याचे अथवा आर्थिक तरतूद नसल्याने व  तंत्रज्ञानाच्या अभावामुळे अशा शाळा राहिल्या आहेत. काही संघटनेकडून निवेदनाद्वारे शिक्षणाधिकारी, संचालकांना कळविण्यात आले असून माहिती भरण्यासाठी अशा प्रकारे शिक्षकांना गुंतवून त्यांचे आर्थिक व  मानसिक खच्चीकरण होत असल्याचे सुद्धा शिक्षकांतून सूर उठत आहेत..

     शिक्षक संघटनेमार्फत संचालकांना दिलेल्या  निवेदनात अशा प्रकारच्या कामासाठी काहीतरी योग्य प्रकारची तरतूद व वाढीव वेळ मिळावा व शिक्षकांवर अशा प्रकारच्या कामासाठी केवळ काम पूर्ण नाही म्हणून वेतन थांबवणे,  हे  अतार्किक, अनाकलनीय,व अनिष्ठ असल्याचे सांगून शिक्षकांवरील अशा प्रकारचे अविश्वास दाखवणे योग्य नसल्याचे  व त्यांचे वेतन न रोखण्याचे निवेदनाद्वारे म्हंटले आहे.

👉Udise ची माहिती न भरलेली सध्याची स्थिती 

◆25788 शाळेतील शिक्षकांची माहिती udise पोर्टल वर भरण्यात आलेली नाही.

◆12947 शाळांमधील भौतिक सुविधांची माहिती भरलेली नाही.

👉Udise ची माहिती भरलेली सध्याची स्थिती

◆ राज्यातील 88.08 टक्के माहिती ही शाळेतील भौतिक सुविधांची भरली आहे

◆ राज्यातील 76.27 टक्के माहिती ही शाळेतील  शिक्षकांची भरली आहे

◆ राज्यातील 71.70 टक्के माहिती ही विदार्थांची भरण्यात आली आहे.


👉म्हणजेच एकंदरीत राज्यातील शाळेतील भौतिक सुविधांची  11. 92 टक्के माहिती अजून भरावयाची आहे.

👉 राज्यातील शाळेतील शिक्षकांची 23.74 टक्के माहिती भरावयाची आहे.

👉 राज्यातील शाळेतील विद्यार्थ्यांचा 28.30 टक्के माहिती भरावयाची आहे..


    तसेच या परिपत्रकाद्वारे काम करा , पगार मिळवा असे वेतन वेतन थांबविण्याचे आदेश देताना परिषदेने शिक्षकांना अखेरची संधी ही दिलेली असल्याचे दिसते. परंतु जर udise चे काम 30 नोव्हेंबर पर्यंत न केल्यास सम्बधित शाळांचे वेतन थांबविण्याच्या स्पष्ट सूचना वेतन पथकांमार्फत देण्यात आलेल्या आहेत. 

   केवळ अशा प्रकारची शाळेची माहिती पोर्टल वर न भरल्यामुळे समग्र , पीएमएस , स्टार्सचे बजेट बिघडण्याची शक्यता सांगणार येते. 

     कारण शाळांनी udise प्लस पोर्टल वर  माहिती न भरल्यास शाळेचे तर नुकसान होईलच पण , केंद्रशासनामार्फत येणाऱ्या विविध योजनांवर विपरीत परिणाम सुद्धा नाकारता येत नाही.

    तसेच समग्र शिक्षा अभियान , स्टार्स प्रकल्प, तसेच पी एम सी या योजनांचे वार्षीक अंदाजपत्रक बनवताना अडचणी येणार आहेत. पोर्टलवर शाळा आणि विद्यार्थी यांची संख्या कमी झाल्याने येणाऱ्या निधीलाही कात्री लागणार असल्याचे सांगितले जात आहे...


✍️सुनिल एन राठोड...

Post a Comment

0 Comments