अखेर वृक्ष बोलला....
अखेर वृक्ष बोलू लागला
आपली जागा बदलू लागला
इकडे तिकडे फिरू लागला
त्याला पाहून गलका उडाला ।।
नेतृत्व आंब्याने स्वीकारले
सर्वांना तो संबोधू लागले
आम्ही आमचे धर्म जपले
पण मानवांनी ते नष्ट केले ।।
मानवजातीवर नको उपकार
होईल साऱ्या जगात हाहाकार
मानव करी आपले शिकार
देऊ त्यांना आता विकार
मिळून सर्वांनी घेतला बोध
अद्दल घडवायचा घेतला शोध
वडाला आला मानवाचा क्रोध
पारंब्याला लटकावून केला विरोध
प्रस्ताव कडुलिंबाने मांडला
ज्या गोष्टीवर मानव जगला
त्यावर आता निर्बंध घातला
प्राणवायू बंदचा फतवा काढला
एकमताने सर्वांनी होकार दिला
मानवाने त्यांचा प्रतिकार केला
झाडामागे सारी यंत्रणा लागली
विनवणी आता येऊ लागली ।।
मानवाचे आता ऐकाचे नाही
स्वार्थी जीवाला जगवायचे नाही
प्राणवायूचे उत्पन्न बंद पडले
मानवजात धारातीर्थी पडले
✍️अतिशयोक्ती अलंकार
श्री सुनिल नरसिंग राठोड
मुरुम, 9763961999
0 Comments