जागतिक योगदिन शाळेत साजरा करावयाच्या दिनानिमित्त योगाचे महत्व आणि फायदे
👉शाळेत पीटीचा तास आला आणि व्यायाम प्रकार करावे लागले तर अनेक लहान मुले नाक मुरडतात.
👉 योगा म्हटल्यावर तर ही छोटी मुले आपला हातच दुखतो किंवा पायच दुखतो अशी कारणेही आपल्या शिक्षकांना देतात. पण, लहानपणापासूनच मुलांना योगा किंवा व्यायाम शिकवणे किती महत्त्वाचे आहे, हे तुम्हाला माहीत असेलच.
👉आता तर 21 जून या योगदिन साजरा करायला सुरुवात झाल्यापासून अनेक शाळांमध्ये पीटीचे शिक्षकही मुलांना अभ्यासात नियमितपणे योगासनांचे प्रशिक्षण देऊ लागले आहेत.
👉 आंतरराष्ट्रीय योग दिवस हा दरवर्षी २१ जून रोजी जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रांनी याला मान्यता दिली आहे.
👉भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस 'आंतरराष्ट्रीय योग दिन' म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडला होता.
👉 संयुक्त राष्ट्रांच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य असलेले अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रान्स, रशिया यासारखे देशही या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत.
👉यावर विस्तृत चर्चा झाल्यानंतर डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.
👉 २१ जून हा दिवस जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वांत मोठा दिवस असतो. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या वेगामुळे २१ जून हा दिवस इतर दिवसांपेक्षा मोठा असतो.
👉२१ जून रोजी उत्तरायण संपून दक्षिणायण सुरू होते. या दिवशी दिवस मोठा तर रात्र लहान असते.
👉 २१ जून रोजी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत उजेड असतो. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असा प्रस्ताव मांडण्यात आला.
👉भारताला सुमारे ५ हजार वर्षांची शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक साधनेची परंपरा असून, ती शरीर व मनात परिवर्तन घडवून आणते.
👉भारतीय धर्म संस्कृतीमधील 'योग' संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे.
👉याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते, असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे. जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने केला गेला आहे.
👉काही वर्षांपासून या उपक्रमाने चळवळीचे रूप घेतले आहे. योग दिनाचे औचित्य साधून ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या उपस्थितीत योगसत्र झाले. स्वतः अबॉट यांनी यावेळी योगासने केली.
👉भारतीय धर्म संस्कृतीमधील 'योग' संकल्पनेची मांडणी श्रीमद्भगवद्गीता ग्रंथात केलेली आहे. त्याच जोडीने भगवान पतंजली मुनी यांनी आपल्या योगसूत्राद्वारे मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाची संकल्पना स्पष्ट केली आहे. याद्वारे आध्यात्मिक उन्नतीही साधता येते, असे पातंजल योगसूत्र ग्रंथात सांगितले आहे.
👉जगभरातून स्वीकारले गेलेले भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न या दिवसाच्या निमित्ताने केला गेला आहे. काही वर्षांपासून या उपक्रमाने चळवळीचे रूप घेतले आहे.
👉योग दिनाचे औचित्य साधून ऑस्ट्रेलियन संसदेमध्ये माजी पंतप्रधान टोनी अबॉट यांच्या उपस्थितीत योगसत्र झाले. स्वतः अबॉट यांनी यावेळी योगासने केली.
👉योग कसा करावा, कोणती योगासने शरीराला आणि मनाला सशक्त व सक्षम ठेवू शकतात, यावर अभ्यासकांनी आपली मते मांडली आहे. या सर्व शिकवणीचा सार एकच आहे. ते म्हणजे आपल्या जीवनात योग, योगासने, योगसाधना यांचा अवलंब करणे.
👉जागतिक योग दिनाला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात एकत्रितपणे काही वेळ योगासने करण्यावर भर दिला गेला. मात्र, आताच्या घडीला असलेल्या करोना संकटामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळणे महत्त्वाचे आहे.
👉त्यामुळे यंदा घरीच राहून जागतिक योग दिनात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. या जागतिक योग दिनात सर्वांनी सक्रिय सहभाग घेऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले जागतिक योग दिनातील योगदान सर्वांपर्यंत पोहोचवू शकता, असे सांगितले जात आहे.
👉सध्याच्या बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. पण, या आजारांचा उपचारही महागला आहे.
👉 औषधांपेक्षाही योगामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवून कुठल्याही रोगावर नियंत्रण मिळवता येऊ शकते. कारण, योगासनांमुळे शरीरांतर्गत प्रक्रियांमध्ये सुधारणा घडून येतात आणि मेंदूची क्षमता वाढते. मानसिक आरोग्यावरही त्याचा अनुकूल परिणाम होतो.
👉नैराश्य, ऑटिझमसारख्या मानसिक समस्यांवरही योगासने दुसऱ्या कुठल्याही औषधांपेक्षा जास्त प्रभावी आहेत, असे योगाभ्यासकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महापालिका रुग्णालयांतही डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णांसाठी योगभ्यासाचे आयोजन करण्यात येते. 👉लहान मुलांसाठी योगाचे महत्त्व?👇
👉बौद्धिक क्षमता वाढत
👉अभ्यासात त्यांना फायदा होईल
👉लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढेल
👉लहान मुलांचा रक्तदाब नियंत्रित राहील
👉त्यांचं वजन नक्कीच कंट्रोल मध्ये राहू शकते
👉मुलं आजारी प़डत नाही, आनंदी राहतात
👉एकाग्रता, स्मरणशक्ती, त्यांच्या सवयीं बदलतात
👉अभ्यासातली भीती कमी होते. विश्वास वाढतो
👉उदासीनता घालवण्यासाठी होते मदत
👉लहान मुलांना आधीपासूनच जर योगासनांची सवय आणि आवड लावली तर, त्यांना अभ्यासात आणि भविष्यात नक्कीच फायदा होईल. लहान मुलांना प्राणायम, पोट हलवणं, श्वासोच्छवास चांगल्या पद्धतीने करणं असे प्रकार शिकवले जातात.
👉 याशिवाय, नोकरी करणारी व्यक्ती असो किंवा स्वतंत्र व्यवसाय करणारी व्यक्ती. सध्या सगळ्यांचेच जीवन धकाधकीचे झाले आहे.
👉लहान मुलांच्या दप्तराचे ओझे ही त्यांच्या वजनाचे एवढे असते. अगदी पहिल्या इयत्तेतील विद्यार्थीसुद्धा यातून सुटलेले नाहीत.
👉 तणाव नियंत्रणाचा योग विषयात अगदी मुळापासून विचार करण्यात आला आहे. पण, आयुष्यात योगाच्या माध्यमातून तणावाचे नियोजन करणे सहज शक्य झाले आहे.
👉10 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी ब्रह्मविद्या देणं सर्वात महत्त्वाचं मानलं जातं. आठवड्यातून 2-3 तास जर ब्रम्हविद्या दिली तर मुलांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतावाढीस फायदा होतो. शरीराच्या आणि मनाच्या स्वास्थासाठी योग करणे हे गरजेचे आहे. योगसाधना आणि ब्रह्मविद्या ही महत्त्वाची गरज बनली आहे. त्यासाठी लहानपणापासूनच योगाचं महत्त्व मुलांना समजून दिलं पाहिजे.'
- डॉ. सुमन भांडेकर, ब्रह्मविद्या योग प्रशिक्षिका
◆योगासनांचे प्रकार◆
संकलन श्री सुनील राठोड, मुरुम
सौजन्य गुगल
1 Comments
Imp Information 👌
ReplyDelete