पिरतीचा रंग तू
पिरतीचा रंग तू, माझ्या अंगी राह तू,
साथ माझी जीवनभर वाह तू,
गारवा माझा तू,पारवा माझा तू,
आपल्या पिरतीचा ग्रंथ लिव तू,।।धृ।।
तुझा हा वपुगंध, मला करी बेधुंद,
जळत्या देहास करी बेबंद,
माझे जीवन तुझे, तुझे यौवन माझे,
आपल्या पिरतीचे न तुटे हे बंध,
संसाराचा साज तू ,धैवताचा गाज तू,
माझे कान तरसे ती आवाज तू,।।1।।
तुझ्याच नयनांनी, झालो पार मी घायाळ
आस लागे नव्याने, तुझ्या संग जागून,
विसरलो देहभान, घेऊनी हा देहपान,
साता जन्माची सात घेतो मागून ,
स्वर्गाचा इंद्र तू, चौथविचा चंद्र तू
विखुरल्या संसाराचा निर्वाह तू ।।2।।
पिरतीचा रंग तू , माझ्या अंगी राह तू,
साथ माझी जीवनभर वाह तू,
गारवा माझा तू, पारवा माझा तू,
आपल्या पिरतीचा ग्रंथ लिव तू।।
◆◆गीतकार :-श्री सुनिल नरसिंग राठोड , मुरुम
0 Comments