सावधान ! आपल्या मुलांना मोबाइलच्या व्यसनापासून वाचवणे गरजेचे

 सावधान!आपल्या मुलांना मोबाइलच्या व्यसनापासून वाचवणे गरजेचे


         अलीकडेच भारतात आलेले ऍपलचे सीईओ टिम कुक यांनी पालकांना मुलांचा स्क्रीन टाइम कमी करण्याचा सल्ला दिला. भारतीय मुलांवर केलेल्या विविध सर्वेक्षणांचे निकाल चिंताजनक आहेत. सुमारे १००० मुले आणि त्यांच्या पालकांवर केलेल्या सर्वेक्षणात आढळले की, ९२१४ विद्यार्थी बाहेर खेळण्याऐवजी मोबाइल गेम खेळणे पसंत करतात.

          सुमारे ८२% शाळेतून आल्यावर फोन मागतात.... सुमारे ७८% मुलांना जेवताना फोनकडे पाहण्याची सवय असते. लोकलसर्कलने केलेल्या आणखी एका सर्वेक्षणानुसार ९ ते १३ वयोगटातील मुलांकडे दिवसभर स्मार्टफोन असतो.

           इतर अहवाल सुचवतात की, सर्वात आधी स्मार्टफोन स्वीकारणाऱ्यांमध्ये भारतीय मुले आहेत. जेवताना मुले मोबाइल पाहत असल्याचे आपण अनेकदा पाहतो. आपल्याला बोलता यावे म्हणून मुलांकडे मोबाइल दिले जातात. कदाचित तुमची मुलंही फोनवर बराच वेळ घालवत असतील. हे थांबवायला हवं. फोनचा मेंदूवर औषधांप्रमाणेच परिणाम होतो. 

           स्मार्टफोनच्या गैरवापराची न्यूरोकेमिस्ट्री अमली पदार्थांसारखीच आहे. स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे प्रा. अॅना लेम्बके यांच्या म्हणण्यानुसार, 'आपण सर्व आपल्या पसंतीचे डिजिटल ड्रग घेत आहोत व त्यात स्मार्टफोनचा वापरही आहे. 

          डिजिटल तारांमध्ये- अडकलेल्या पिढीसाठी हे नशेच्या इंजेक्शनसारखे आहे.' त्यांचे बरोबर आहे. एक प्रकारे आपणा सर्वांना व्यसन लागले आहे. पण, मुलांचे फोनचे व्यसन भयंकर ठरू शकते. प्रत्येकाला त्याचे सामान्य तोटे माहीत आहेत एकाग्रतेचा अभाव, आळस, डोळ्यांवर ताण आणि वेळेचा अपव्यय. तथापि, थोडे समजले ते असे की डिव्हाइसचेही व्यसन लागू शकते आणि त्याचे परिणाम घातक ठरू शकतात.

        जेव्हा जेव्हा आपल्याला आनंद वाटतो तेव्हा डोपामाइन नावाचे न्यूरोकेमिकल मेंदूमध्ये सोडले जाते. डोपामाइनमुळे आपल्याला तसाच आनंददायी अनुभव किंवा पदार्थ आणखी हवे असतात. त्यात अन्न, मद्यपान, धूम्रपान, ड्रग्ज, व्हिडिओ गेम, पोर्नोग्राफी किंवा फोन तपासत राहणे हेही असू शकते.

              हा अनुभव आपल्यापासून हिरावून घेतला तर तो घेण्याची इच्छा अधिक होते. विड्रॉल सिम्प्टम्स (व्यसन सोडल्यानंतर शरीरावर होणारे परिणाम) सुद्धा दिसून येतात. हे घडण्याचे कारण म्हणजे आपला मेंदू आनंद व वेदना यावर एकाच ठिकाणी प्रक्रिया करतो. मेंदू नेहमी सुख आणि दुःख यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न करत मुलांना शांत किंवा व्यग्र ठेवण्यासाठी त्यांना फोन देण्याचा सोपा व आळशी मार्ग वापरू नका. रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी तुम्ही अमली पदार्थ द्याल का? मग व्यसन लावणारा मोबाइल देणे कितपत योग्य आहे ? 

        आपल्याला ड्रग किंवा स्मार्टफोन मिळत नाहीत तेव्हा आपल्याला अस्वस्थ वाटू लागते आणि नंतर ते अधिक वापरावेसे वाटते. म्हणूनच आपल्यापैकी बहुतेक जण सतत फोन शोधत असतात, उचलत असतात, पाहत राहतात. आपल्या आनंदाच्या अनुभवाच्या यंत्रणेचा आणखी एक मैलू म्हणजे एखाद्या गोष्टीचे व्यसन. काही काळानंतर सहज मिळणाऱ्या आनंदाची आपल्याला सवय होते.

         मग आपण सामान्य वाटण्यासाठी व्यसनाची सामग्री वापरतो. धूम्रपानाचे व्यसन असलेले कोणीही तुम्हाला हे सांगेल. त्याचप्रमाणे एकदा का तुम्हाला फोनचे व्यसन लागले आणि फोन तुमच्यापासून हिरावला गेला की तुम्ही फक्त दुःखात जगता. वेदना चिंता, निरुत्साह, नैराश्य आणि चिडचिड यामध्ये बदलते. मग कशातच आनंद वाटत नाही. तुमच्या मुलामध्येही ही लक्षणे दिसतात का? याचे कारण फोन असू शकते.


          एकदा मुलाला फोनचे व्यसन लागले की, त्याच्या मेंदूतील आनंद निर्माण करणारी यंत्रणा विस्कळीत होईल. तो आता दुःखाचे आणि खच्ची मनोधैर्याचे जीवन जगेल. • यातील वाईट गोष्ट म्हणजे हे अगदी लहान वयात घडले तर त्याचा त्याच्या वाढत्या मेंदूच्या न्यूरोसर्किटवर गंभीर परिणाम होऊ शकतो. 

          मुलाला सामान्य वाटणे कायमचे कठीण होईल. ती इतर औषधांकडेही वळू शकतात. कृपया तुमच्या मुलांना फोन वापरू देऊ नका किंवा त्यांच्यासाठी तो सहज उपलब्ध होऊ देऊ नका. मोठ्या मुलांच्या फोनच्या वापरावरही लक्ष ठेवा. पालक म्हणून ते काय व किती काळ पाहतात हे तुम्हाला माहीत अस पाहिजे. 

         यावर उपाय म्हणून व्यसन लागलेल्या मुलांसाठी डिजिटल डिटॉक्सची शिफारस केली जाते. किमान ३० दिवस मुलाकडून फोन काढून घेतला पाहिजे (किंवा फक्त अत्यंत आवश्यक कामासाठी द्यावा ). त्याने रोज व्यायाम किंवा खेळासारख्या उपक्रमांत भाग घ्यावा. मुलांचे चांगले संगोपन करणे ही आम्हा भारतीयांची जबाबदारी आहे.



 (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.) सौजन्य दैनिक भास्कर 

संकलन :- श्री सुनिल नरसिंग राठोड, मुरुम..


Post a Comment

1 Comments