होय । मी सेवालाल बोलतोय ....

 


होय । मी सेवालाल बोलतोय ....


भविष्याचे वेध घेतलेले

माझे बोल आज खरे होत आहे

पण समाजाची अंधभक्ती

मला आज बोलायला भाग पाडत आहे.

वयाच्या चोवीस वर्षांत

मी जे काही कार्य केलं

आज माझ्या विचारांना

कोणी डोक्यात घेत नाही.

विज्ञानवादी विचार दिला

अंधश्रद्धेत घेऊन गेलो नाही ,

समाज संघटित करण्यासाठी 

आजीवन वनवास भोगलो

आज समाजाची वाटचाल

माझ्या विचाराने तोलत आहे,

होय ! मी तोडावाला सेवालाल बोलत आहे.


माझ्या फोटोंचे बाजार मांडून

मला मंदिरात थाटलात !

माणसातून देव बनवुनी

माझे विचार कापलात

जय सेवालाल नावाने

मटणाचे सेंटर उघडलात

मतांचे राजकारण करून

मला जातीमध्ये तोललात

अडाणी महाराज लोक

मनाने लडी गीत लिहिलात

एकाचे दोन करून थोतांड वाणी जोडून

भजनात ते बकत आहे

मनाला खटकलेल्या गोष्टया

आज मी उघडत आहे

होय ! मी तोडावाला सेवालाल बोलत आहे.


कोणी म्हणतो जादूगार,

तर कोणी म्हणतो अवतारी,

भजन पूजन करू नका म्हंटल

पण ऐकणार का कोणीतरी ?

मी चमत्कारी जर असतो

तलवार हाती घेतलो नसतो

जादूटोणा विचार पेरून

गुलामगिरीत जगलो असतो

संघर्ष केलो, युद्ध केलो

पण मंदिर कुठेच नाही बांधलो

गोरगरिबांची सेवा करत आणि

जनजागृती करत हिंडलो

विज्ञानवादी विचार तुमच्या डोक्यात कालवत आहे ,

होय ! मी तोडावाला सेवालाल बोलत आहे.


विचारांचे प्रतीक म्हणून पगडी ठेवू.

मी माझे पाय पडायला का देवू ?

गुलाम जर करायचे होते तुम्हास

तर मी ठेवलो असतो माझे खडाऊ ,

भजन पूजन मध्ये वेळ घालवू नका ,

करणी करणे शिकू नका

कोणी कुणाशी कमी नाही

तुम्ही स्वतः स्वतःला बघा

माझ्या वचनाला जाणून घे, छाणून घे ,आणि मगच मानून घे!

मी जे काही सांगतो

त्या गोष्ट ध्यानात ठेवत्यावेळेस पण सांगितलं आणि आता पण मी सांगत आहे,

होय ! मी तोडावाला सेवालाल बोलत आहे.

होय ! मी तोडावाला सेवालाल बोलत आहे.


(संदर्भ : क्रांतिसिंह सेवादास तोडावाळो , लेखक - भीमणीपुत्र मोहन नायक)

गोरपीठ ---कवी - अमोल नायक


मराठी अनुवाद - श्री सुनिल नरसिंग राठोड , मुरुम

Post a Comment

0 Comments