नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याविषयी रंजक व सखोल माहिती[Netaji Subhash Chandra Bose]

 


नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याविषयी रंजक व सखोल  माहिती


👉भारतीय इतिहासातील स्वातंत्र्यसंग्रामात ज्या थोर वीरांनी कशाचीही पर्वा न करता उडी घेतली आणि अगदी निकराने लढा देत भारताला स्वतंत्र करण्यात मोलाची भूमिका बजावली, त्या थोर वीरांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव आघाडीने घेतले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे भारत भूमीचा एक तळपता सूर्य होता.


रंजक 

त्यांचे वकृत्व आणि विचार इतके प्रभावी होते की समोरचा आपसूकच त्यांच्याशी आणि पुढे स्वातंत्र्यलढ्याशी जोडला जाई.


👉 नेताजींनी केलेलं कार्य आजही प्रत्येक तरुणाला प्रेरणा देणारं, अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र उठवायला लावणारं असं आहे. म्हणूनच इंग्रजांनी देखील नेताजी सुभाषचंद्र बोस यांची धास्ती घेतली होती. अश्या या भारताच्या महान क्रांतिकारकाविषयी आज काही रंजक गोष्टी जाणून घेऊया !


👉२३ जानेवारी १८८७ रोजी कटक मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झाला. लहानपणापासूनचं ते बंडखोर वृत्तीचे होते.


👉नेताजींना ८ भावंडे होती. त्यांचा क्रमांक ९ वा होता. त्यांना शालेय जीवनातच राष्ट्रप्रेमाचे बाळकडू मिळाले. वयाच्या १५ व्या वर्षी, नेताजींनी हिमालयाच्या दिशेने प्रस्थान केले. पण त्यांना काही गुरुदर्शन झाले नाही म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंदांचे साहित्य वाचून त्यांना आपले गुरु बनवले.




रंजक घटना 

कॉलेजमध्ये असताना एकदा इंग्रजी शिकवणाऱ्या शिक्षकाने भारतीयांना दुषणे दिली. नेताजींनी त्या क्षणी उभे राहून शिक्षकाला गप्प केले आणि भारत आणि भारतीयांविरोधात काहीही बरळण्याचा जाब विचारला आणि संप पुकारला. या कृतीमुळे त्यांना कॉलेजमधून काढून टाकण्यात आले.


👉१९२१ मध्ये इंग्लंडला जाऊन नेताजींनी इंडियन सिव्हील एक्झाम दिली आणि त्यात नेताजींनी ४ था क्रमांक पटकावला होता.


 👉   त्याकाळी गव्हर्नरला भेटायला जाताना सोबत छत्री घेऊन जाण्यास मनाई होती. परंतु सिव्हील परीक्षा पास झाल्यावर नेताजींनी अश्या प्रकारचा तुघलकी फतवा पाळण्यास साफ नकार दिला.    वVस्वातंत्र्यलढ्यात सहभागी होऊन भारतभूमीला स्वतंत्र करण्याच्या इराद्याने नेताजींनी इंडियन सिव्हील सर्विस मधील चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीला लाथाडले.


👉नेताजींना २ वेळा राष्ट्रीय कॉंग्रेसचा अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते.


👉कॉंग्रेस पार्टी सोडल्यानंतर १९३९ मध्ये त्यांनी फॉरवर्ड ब्लॅकसंघटनेची स्थापना केली.


👉१९२१-१९४१ या काळात नेताजींना विविध कारागृहांमध्ये बंदी म्हणून ठेवण्यात आले.१९४१ मध्ये नेताजींना एका घरामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले. त्यांनी वेषांतर तेथून स्वत:ची सुटका करून घेतली आणि कारमधून कोलकत्त्यावरून ते गोमोहला पोचले. गोमोह येथून ट्रेन पकडून त्यांनी पेशावरमध्ये पाउल टाकले.




पुढे पेशावर ते काबुल हा प्रवास पायी डोंगररांगातून केला. त्यानंतर पुढे पुन्हा वेषांतर करून मॉस्को मार्गे जर्मनीपर्यंतचा प्रवास करत ते अडॉल्फ हिटलरला जाऊन भेटले.


👉१९४३ मध्ये जेव्हा नेताजी बर्लिनमध्ये वास्तव्यास होते तेव्हा त्यांनी आझाद हिंद रेडियो आणि फ्री इंडिया सेंटरची स्थापन केली.

 👉१९४३ मध्ये नेताजींना जपानहून आमंत्रण आले. जर्मनीहून जपान व्हाया मादागास्कर असा सबमरीनमधून प्रवास करत ते जपानला पोहचले . अश्या मोठ्या प्रवासयात्रा म्हणजे नेताजींसाठी जीवावरचं संकट असे. पण आपल्या हुशारीने ते या यात्रा यशस्वीरित्या पूर्ण करत असतं.

👉ऑक्टोबर २१, १९४३ रोजी, नेताजींनी सिंगापुरात अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची स्थापना केली.


👉सुभाषचंद्र बोस यांनी दिलेला “जय हिंद” चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे.


रंजक 

👉१९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करताना महात्मा गांधींनी नेताजींचा “देशभक्तांचा देशभक्त” असा उल्लेख केला होता.


👉ऑगस्ट १८, १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.



नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू हे आजवर न उलगडलेलं कोडं आहे.


👉 भारत सरकार देखील हे प्रकरण शांतचं ठेवण्याचा प्रयत्न करते. असं म्हटलं जातं की नेताजींचा मृत्यू विमान अपघातात झाला, परंतु त्यांच्या शरीराचे कोणतेही अवशेष मिळालेले नाहीत. याच कारणामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू एक रहस्य बनून राहिलं आहे.


तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा”


👉असा नारा देत भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवचैतन्य देणाऱ्या नेताजसुभाषचंद्र बोस यांना हृदयापासून सलाम !

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा”. हे वाक्य सुभाषचंद्र बोस यांचे आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेकदा तुरुंगवासही भोगला. नेताजी सुभाषचंद्र बोस हे देशभक्त होते. 



Post a Comment

0 Comments