आपण रात्री उशिरा झोपता? मग आरोग्याचं काय , ही सवय आपल्या जीवावर बेतू शकते वेळीच जाणून घेऊ
👉आपण पाहतोच की सध्या अतिशय व्यग्र (late night Sleep) दिनक्रमामुळे लोकांच्या जीवनशैलीत खूप बदल झाले पाहतोय. रात्री उशिरापर्यंत जागरण करणे, तासन् तास लॅपटॉप किंवा मोबाईल वर बसून काम करणे आणि रात्री उशिरा जेवण करणे, नित्याचे झाले आहे. आपल्यापैकी अनेकजण आरोग्यदायी जीवनशैली जगू शकत नाहीत.
👉अशा रीतीने उशिरा जेवल्याचा परिणाम म्हणजे अनेक आजार आपल्याला जडू शकतात. पूर्वीचा काळ वेगळा होता, आजच्या इतक्या सोयीसुविधा नव्हत्या, तंत्रज्ञान नव्हते, हे जरी मान्य केले तरीही त्यांची दिनचर्या नक्कीच आरोग्यदायी होती आणि त्या लोकांचे आरोग्य व शरीर दोन्ही चुस्त दुरुस्त असायचे.
👉पूर्वीचे लोक आणि आज ही काही लोक सकाळी लवकर उठणे आणि रात्री लवकर झोपणे हा त्या दिनचर्येचा भाग असतो. त्यांच्या जेवणवेळाही नियमित असायच्या. त्यामुळेच ते आरोग्यदायी जीवन दीर्घकाळ जगू शकले.
👉पण, हल्ली लोक रात्री उशिरा जेवायला लागलीत. त्यामुळे झोपण्याची वेळ आणि आरोग्य दोन्हीवर विपरीत परिणाम होत आहे. आपल्यापैकी कोणालाही उशिरा जेवण्याची सवय असेल तर त्याचे काय दुष्परिणाम होतात ते जाणून घेऊ यात!
👉तंदुरुस्त आहारासाठी योग्य वेळी झोपणे, सकाळी योग्य वेळी उठणे तसेच योग्य वेळी जेवण करण्याबाबत आयुर्वेदात सांगितले आहे. रात्री उशिरा जेवण करण्याचे दुष्परिणाम काय, ते पाहू या! म्हणजेच late night Sleep चे दुष्परिणाम.
1. आपले वजन वाढते :
उशिरा जेवण केल्यामुले ते पचवणे अवघड शरीराला अवघड जाते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयाचा आजार होण्याचा धोका असतो. त्या शिवाय स्थूलता वाढण्याचे एक महत्त्वाचे कारणही रात्री उशिरा जेवणे हे होय.
2. तणावग्रस्त जीवन :
जर आपण रात्री जेवण उशिरा केले की झोपेतही अडथळा येतो. त्यामुळे सकाळी संपूर्ण दिवस थकवा आल्यासारखे वाटते डोके दुखायला सुरुवात होणे आणि तणाव निर्माण होतो. तणावमुक्त आयुष्य हवे असल्यास रात्री लवकर जेवावे लागेल.
3. उच्च रक्तदाब वाढेल :
आपला जेवण झाल्यानंतर आपण कोणतेही काम न केल्यास शरीर अन्न पचवू शकत नसल्याने उच्च रक्तदाबाचा त्रास वाढू शकतो.
4. मधुमेह म्हणजेच शुगर वाढेल :
जेवणानंतर काही लोकांना गोड पदार्थ खाण्याची सवय असते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. कालांतराने ही सवय त्रासदायक ठरू शकते. रात्री लवकर जेवावे आणि जेवल्यावर शतपावली जरूर करावी म्हणजेच थोडं फिरणे.
5 पचन संस्थेचे बिघडणे व अपचन होणे :
असे व्यक्ती ज्यांना अपचनाचा त्रास होतो, त्यांनी उशिरा जेऊ नये. त्यामुळे आरोग्याच्या समस्या अधिक भेडसावतात.
6 चिडचिड वाढतो :
पुरेशा प्रमाणात शांत झोप न लागल्यास त्याचा परिणाम मानसिक आरोग्यावरही होताना दिसतो. मेंदूला पुरेसा आराम मिळत नाही आणि परिणामी चिडचिड वाढतो.
7 झोप न येण्याची समस्या वाढते:
रात्री उशिरा जेवल्यावर घशाशी येण्याचा त्रास होतो. त्यामुळे जीव घाबरा होतो आणि झोपही येत नाही अशाने मग झोपभंग तर होईलच शिवाय विविध आजार सुद्धा वाढू शकतात.
8 विस्मरण होणे:
रात्री उशिरा झोपल्यामुळे आपल्या मेंदूला अराम मिळत नाही , परिणामी मेंदूची स्मरण शक्ती ही कमजोर होत जाते आणि मग आपल्याला साधे साधे शब्द नाव आठवणीतून निघून जातात . म्हणजेच विस्मरणाचा धोका निर्माण होतो.....
जर हे असेच चालू राहिले तर तो दिवस दूर नाही ज्या दिवशी आपण नक्कीच दवाखान्याची वाट धरू. प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 7 तास झोप घेणे गरजेचे असते . हे प्रत्येकाच्या वयोमानानुसार कमी जास्त असू शकते . जसे की 1 वर्षापर्यंतचा लहान मूल सर्वात जास्त वेळ म्हणजे दिवसभरातून कमीत कमी 18 तास तर जास्तीत जास्त 20 तास झोपतो . जसजसे वय वाढेल आपले शरीर गरजेनुसार कमी जास्त प्रमाणात आराम मिळवत असतो , पण जर यात खंड पडला आणि आपणाला जास्तीत जास्त जागरण , उशिरा झोपणे , उशिरा जेवण घेणे असेच चालू राहिले तर खूप मोठे गंभीर परिणाम सुद्धा भोगावे लागते....
एक संशोधनात ही बाब दिसून आली ज्यात यूकेतील नॉन प्रॉफिट हेल्थ प्रोजेक्ट U.K. Biobank ने हे संशोधन केलं. यात सुमारे 7 लाख लोकांनी भाग घेतला होता त्या सर्वांना एकच सामाईक प्रश्न विचारण्यात आला होता की ते मॉर्निंग पर्सन आहेत की नाईट आउल? की इतर कुठली सवय आहे?
संशोधकांनी सहभागी स्वयंसेवकांच्या उत्तरांसोबतच त्यांनी चाचणीदरम्यान वापरलेल्या wristband अॅक्टिव्हिटी ट्रॅकरमधील आकड्यांचाही आधार घेतला होता.जर्नल नेचर कम्युनिकेशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या या संशोधनानुसार रात्री जागरण करणं आणि सकाळी उशिरापर्यंत झोपणं हे बहुतांशवेळा आपल्या शरीरातील जीन्सवर अवलंबून असतं. जे आपण ठरवलं तरीही खूप प्रमाणात बदलू शकत नाही.
संशोधकांना असं लक्षात आलं की माणसाच्या जीनच्या समूहातील 351 रीजन्स हे लवकर उठण्याशी संबंधित असतात. ज्या लोकांना या संशोधनासाठी बोलवलं होतं त्यापैकी बहुतांश लोक हे लवकर उठण्याची सवय असलेलेच होते.
संशोधकाचा मते जीनच्या समूहाची लिंक शरीरातील circadian clock आणि retina शी जोडलेली असते. मेंदूला रेटिनाच्या माध्यमातून प्रकाशाची जाणीव होते. रेटिना आपल्या झोपण्याउठण्याच्या वेळेनुसार शरीराचं घड्याळ सेट करतो.काही लोक जागरण करतात तर काही लवकर झोपतात. या दोघांचा मेंदू प्रकाशाला काय प्रतिक्रिया देतो हे त्यांच्या झोपण्याच्या सवयीशी संबंधित असतं.
या संशोधकांना लक्षात आलं की सहभागी स्वयंसेवकांच्या झोपायच्या वेळेत बदल जाणवला झोपेच्या दर्जात नाही. त्यांनी असंही सांगितलं की नाइट आउल्सना स्थुलता आणि डायबेटिस वाढण्याची शक्यता कमी आहे. पण त्यांना चिंता, स्क्रिझोफ्रेनिया होण्याचा धोका आहे. रात्री जागरण केल्यामुळे लोकांचं मानसिक स्वास्थ्य बिघडत चाललं आहे. संशोधनानुसार उशिरा झोपणं आणि मानसिक आरोग्य याच्यात खूप महत्त्वाचा संबंध आहे.
म्हणून म्हंटले जाते की निरोगी शरीर हवे असेल तर मन निरोगी ठेवणे गरजेचे आहे , चला तर मग आजपासून लवकर झोपण्याची सवय लावूनच घेऊ
✍️श्री सुनील एन राठोड
0 Comments