26 जानेवारी प्रजासत्ताक दिन विशेष: भारतीय ध्वज संहिता काय म्हणते, काय करावं आणि काय करू नये जाणून घेऊयात

 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन विशेष: भारतीय ध्वज संहिता काय म्हणते, काय करावं आणि काय करू नये जाणून घेऊयात



👉भारताच्या राष्ट्रीय ध्वजावर तीन रंग आहेत. म्हणून ह्याला तिरंगा म्हणतात.
🇮🇳
👉 राष्ट्रध्वजाच्या वरच्या पट्टीवर भगवा किंवा केशरी रंग असतो जो देशाची शक्ती आणि धैर्य दर्शवितो. 
🇮🇳
👉मध्यभागी असलेली पांढरी पट्टी धर्म चक्रासह शांती आणि सत्याचे प्रतीक आहे. 
🇮🇳
👉खालची हिरवी पट्टी सुपीकता, वाढ आणि भूमीची पावित्र्यता दर्शविते.
🇮🇳


👉चक्र- या धर्म चक्राला विधीचे चक्र म्हटले आहे जे तिसऱ्या शतकात इ.स.पू.मौर्य सम्राट अशोक ने बनविलेल्या सारनाथ मंदिरातून घेतले आहे. 

👉या चक्राला दर्शविण्याचा अर्थ आहे की जीवन गतिशील आहे आणि जीवन थांबणे म्हणजे मृत्यू होणं असं आहे.
 
👉ध्वज संहिता- 26 जानेवारी 2002 रोजी भारतीय ध्वज संहितेमध्ये सुधारणा करण्यात आली आणि स्वातंत्र्यताच्या बऱ्याच वर्षानंतर भारताच्या नागरिकांना आपल्या घरात,कार्यालयात आणि कारखान्यात केवळ राष्ट्रीय दिवसातच नव्हे तर इतर कोणत्याही दिवशी कोणत्याही व्यत्ययाशिवाय फडकविण्याची परवानगी देण्यात आली.

👉 आता भारताचे नागरिक राष्ट्रीय ध्वजाला अभिमानाने कुठे ही आणि कधीही फडकवू शकतात.परंतु  त्यांना ध्वजाच्या संहितेचे काटेकोर पालन करावे लागतील. जेणे करून तिरंग्याचा मान कमी होऊ नये. 

👉सुविधेच्या दृष्टीने भारतीय ध्वज संहिता 2002 ला तीन भागात विभागले आहेत.

👉 संहिताच्या पहिल्या भागात राष्ट्रीय ध्वजाचे सामान्य वर्णन केले आहे. 

👉संहिताच्या दुसऱ्या भागात सार्वजनिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था इत्यादी सदस्यांद्वारे राष्ट्रीय ध्वजाच्या कार्य प्रदर्शनाच्या विषयी  सांगितले आहे. संहिताचा तिसरा भाग केंद्र आणि राज्यसरकार आणि त्यांच्या संघटना आणि एजन्सीद्वारे राष्ट्रीय ध्वजाच्या प्रदर्शनाच्या विषयी माहिती देतो.  

👉26 जानेवारी 2002 च्या कायद्यावर आधारित काही नियम आणि कायदे सांगितले आहे की ध्वज कसे फडकवायचे आहे. 


👉कोणत्या नियमांचे पालन करावे ?

एकूण 10 प्रमुख नियम हे तिरंगा ध्वज फडकावण्याबाबत आहेत 

१. तिरंगा ध्वज हा केवळ लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेलाच असावा. झेंड्याचा आकार हा आयताकार असायला हवा. लांबी आणि रुंदीचे प्रमाण ३:२ असे असावे. केशरी रंग हे नेहमी सर्वात वरच्या बाजूस तर हिरवा रंग हा नेहमी झाल्या बाजूस ठेवावे.


२. सूर्योदयापासून ते सूर्यास्तादरम्यान तिरंगा फडकविता येतो.लक्षात ठेवा  तिरंगा कधीही जमिनीवर ठेवता येत नाही. झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये. काही प्रसंगी सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतीवरील तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे.

३. तिरंगा कधीही पाण्यात बुडवू नये. केवळ धुण्यासाठी पाण्याचा वापर करावा व झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. तिरंग्याचा कोणताही भाग जळालेला ,डागाळलेला मळकट  असल्यास तसेच तिरंग्याबद्दल अवमानकारक टिपण्णी केल्यास तीन वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

४. तिरंग्याचा व्यावसायिक वापर कोणीही कधीही करू नये. तिरंग्याचा गैरवापर कुणी करत असल्यास , तिरंगा वस्त्र म्हणून वापरत असल्यास किंवा मृतदेहाभोवती तिरंगा लपेटत असल्यास  तो तिरंग्याचा अपमान समजला जातो. येथे केवळ शाहिद जवान यांच्या पार्थिवावर झेंडा ठेऊन पुन्हा उचलून घडी करून सन्मानपूर्वक काढून ठेवायचे असते..

५. शालेय विद्यार्थ्यांना तिरंग्याचा गणवेश म्हणून वापर करता येत नाही. आणि जर एखादी व्यक्ती कमरेच्या खालीली वस्त्रासाठी तिरंग्याचा कापड म्हणून वापर करत असेल तर तो तिरंग्याचा अपमान समजून त्यावर कारवाई करण्यात येते. तिरंग्याचा रुमाल किंवा उशीसाठीही वापर करु नये.

६. तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहू नये पण विशेष प्रसंगी किंवा राष्ट्रीय दिन जसे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकविण्यापूर्वी त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवण्यास काहीही हरकत नाही.

७. एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट करण्यासाठी तिरंग्याचा वापर करत असाल तर आपण तिरंग्याचा अपमान करत आहात असे समजून संबंधितांवर कारवाई होऊ शकते. गाडी, रेल्वे किंवा विमानाचे छत वा अन्य भाग झाकण्यासाठी तिरंग्याचा वापर करता येणार नाही तसेच  एखाद्या इमारतीत किंवा घराच्या खिडकीला तिरंग्याचा पडदा लावण्यासही सक्त मनाई आहे. असे आढळल्यास संबंधितांवर कारवाई होऊ शकते.

८. फडकविलेला तिरंगा त्याच स्थितीत कायम राहायला हवा. म्हणजेच तो त्या दरम्यान फाटलेला, मळलेला अथवा चुरगळलेला दिसता कामा नये. त्यावर योग्य पद्धतीने पुढील सोपस्कार करावे.

९. तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास, वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे.

१०. अन्य झेंडा किंवा पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्यावर किंवा त्याच्याबरोबर लावू नये.

तसेच काही महत्त्वाचे अन्य बाबी पहा 
👇👇👇👇👇👇👇👇👇
 
👉 राष्ट्रीय ध्वज शैक्षणिकसंस्थां मध्ये (शाळा, महाविद्यालये, खेळ परिसर, स्काउट कॅम्पस इत्यादी मध्ये) ध्वजाला सन्मान देण्याची प्रेरणा देण्यासाठी  फडकवले जाऊ शकते. शाळांमध्ये ध्वजारोहणात निष्ठेची शपथ समाविष्ट केली आहे.
 
👉कोणत्याही सार्वजनिक, खासगी संस्था किंवा शैक्षणिक संस्थेच्या सदस्यांद्वारे राष्ट्रध्वजाचे अरोहण/प्रदर्शन सर्व दिवस आणि प्रसंगी, कार्यक्रम राष्ट्रध्वजाचा सन्मान आणि प्रतिष्ठेनुसार करू शकतात. 
 
👉नवीन संहितेच्या कलम 2 सर्व खासगी नागरिकांना त्यांच्या परिसरात ध्वज फडकविण्याचा अधिकार देण्यात येत आहे. 
 
शिवाय अधिक माहितीसाठी शासनाने सन 2002 साली राष्ट्रीय ध्वज संहिता कशी पाळावी यासाठी जि आर काढलेला आहे ते डाउनलोड करून पाहण्यासाठी  पुढे दिलेल्या चित्राला क्लिक करा 


👇👇👇👇👇👇👇👇👇👇






✍️संकलन सुनिल एन राठोड

Post a Comment

0 Comments