26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त लहान मुलांचे मराठीत भाषण

प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठीत भाषणे 

👉मराठी भाषण क्र 1 

     अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे.

       आपला देश २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या तयारीत आहे. यंदा २०२३ या वर्षी भारत ७४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहे. भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि २६ जानेवारी १९५० पर्यंत स्वत:चे संविधान नव्हते. प्रजासत्ताक दिन हा दिवस मानला जातो जेव्हा भारताचे संविधान लागू झाले. २६ जानेवारीला हा राष्ट्रीय कार्यक्रम साजरा करण्यासाठी देशभरातील सर्व शाळा आणि महाविद्यालये तयारी करत असतात.

         एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण समाप्त करतो जय हिंद । जय भारत ।

👉मराठी भाषण क्र 2

      अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे.

    आजचा दिवस मांगल्याचा! आजचा दिवस भारतीय गणराज्याचा। आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा। माझा- तुमचा सगळ्यांचा…

     अनमोल योगदान दिले ज्यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी, त्या सर्व वीरांना, महापूरुषांना वंदन मी करतो… वंदन करुनी माझ्या प्राणप्रिय भारतमातेला, मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो…

     आज आपला भारत देश प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा.

     एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण समाप्त करतो जय हिंद । जय भारत ।

👉मराठी भाषण क्र 3 

    अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे.

    १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश ब्रिटीशांच्या जुलमी राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यावर भारत देशाचा कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते. अशा वेळी डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. या समितीने २ वर्ष ११ महिने १८ दिवस अथक परिश्रम करुन भारत देशाला मजबूत संविधान दिले.

     २६ जानेवारी १९५० ला आपल्या देशामध्ये हे संविधान लागू करण्यात आले. आपला भारत देश सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक देश बनला. आपल्या देशाची राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी लिखीत राज्यघटना आहे. घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहत.

     एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण समाप्त करतो जय हिंद । जय भारत ।

👉मराठी भाषण क्र 4

      अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे.

    आपल्या देशाला स्वतंत्र आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूर वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. त्या शूर वीराचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांच्यामुळेच आज आपण सुखाचे दिवस जगत आहोत.

    आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर खडा पहारा देत आहेत. या जवानांना माझे कोटी कोटी प्रणाम. 

      एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद ! जय भारत ।।

👉मराठी भाषण क्र 5

    अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे.

    आज २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंद उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. या मंगलदिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

      एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद ! जय भारत ।।

👉मराठी भाषण क्र 6 

     अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे.

     मित्र हो, १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त, स्वतंत्र झाला. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला खरी गरज संविधानाची होती. त्याशिवाय देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालणार नव्हता. आपल्या देशात सर्वांना सूखासमाधानाने, शांततेत जगता यावे म्हणून संविधान निर्मितीचे महान कार्य सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या संविधान समितीने २ वर्ष, ११ महिने, १८ दिवस अथक परिश्रम घेवून देशाचे समृद्ध संविधान तयार केले. २६ जानेवारी १९५० रोजी आपल्या देशात संविधान अंमलात आले; देश प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला, आपल्या देशाचे संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. या संविधानामुळे प्रत्येक भारतीयास भेदभावाशिवाय समान हक्क-अधिकार मिळालेले आहेत.

       एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद ! जय भारत ।।

👉मराठी भाषण क्र 7

     अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे.

     आपला भारत देश स्वतंत्र व प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. आज त्या सर्व शूर वीरांना आपण वंदन करुया, कारण त्यांच्यामुळे आज आपण मुक्त श्वास घेत आहोत. आजही देशाच्या सीमेवर सैनिक अहोरात्र मातृभूमीच्या सेवेसाठी सज्ज आहेत. त्यांचा आपण सदैव सन्मान करूया.

      एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद ! जय भारत ।।

👉मराठी भाषण क्र 8

      अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे.

उत्सव तीन रंगाचा आज सजला
नतमस्तक मी त्या सर्वांचा
ज्यांनी देशासाठी इतिहास घडवला

     आज २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून आपण उत्साहात साजरा करीत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी आनंद उत्साहाचा, सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. या मंगलदिनी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

      एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद ! जय भारत ।।

👉मराठी भाषण क्र 9

      अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे.

     प्रजासत्ताक दिन !’ या शब्दांतच या दिवसाचे महत्व, सारसर्वस्व लपलेले आहे. भारतीय स्वातंत्र्य प्राप्ती नंतर, भारतमातेच्या, भारतीयांच्या व भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील हा सर्वश्रेष्ठ अविस्मरणीय दिवस होय’! कविवर्य कुसुमाग्रजांनी भाकित केल्याप्रमाणे –

‘कशास आई भिजविशी डोळे,
उजळ तुझे भाळ,
रात्रीच्या गर्भात असे, उद्याचा उष:काल !’

        वास्तवात घडले, १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा तिरगा झेंडा अभिमानाने, डौलाने फडकला. लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांनी भाषण केले व डॉ बाबासाहेब आबंडेकर यांनी अवघ्या सव्वा दोन वर्षात भारताची राज्य घटना तयार झाली. व हे राष्ट्र लोकशाही गणराज्य अर्थात प्रजासत्ताक म्हणून घोषित झाले. मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती सर्व जगात श्रेष्ठ व मार्गदर्शक संस्कृती आहे. म्हणूनच २६ जानेवारी रोजी घोषित झालेली लोकशाही ही आदरणीय, पूज्य आहे याचा मागोवा घेतांना, स्पष्टपणे हीच गोष्ट लक्षात येते की,

      भारतात लोकशाहीची पाळेमुळे खूप खोलवर रुजलेली आहेत, एवढेच नव्हे तर ऋग्वेदात ‘लोकशाही’ चा उल्लेख ‘लोकमतांवर आधारित राज्यपद्धती असाच आहे. या पूर्वीच्या काळी प्रचलित असलेली शासन पद्धती जरी राजेशाहीची होती. तरीही हे राजे लोकनियुक्त म्हणजेच प्रजेने निवडलेले असत. हे सर्वं राजे धर्मपरायण असून धर्माप्रमाणे न्यायाचे राज्य चालवीत असत. १८ व्या शतकांत इंग्रजांचे पदार्पण येथे झाले. त्यांनी सुमारे दीडशे वर्ष भारतावर राज्य केले, त्याचाच परिणाम म्हणून आजची परिणाम म्हणून आजची आपली संसदीय राज्य पद्धती अस्तिवात आली आहे.

      एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद ! जय भारत ।।

👉मराठी भाषण क्र 10

        अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे.

       इंग्रजाच्या राजवटीनंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अथक परिश्रमांतून सर्व संस्थाने खालसा केली, व डॉ राजेंद्रप्रसाद, डॉ. आंबेडकर, पंडित नेहरु, मौलाना आझाद, डॉ सरोजनी नायडू आणि स्वातंत्र्य चळवळीतील अनेक नेते या , संविधान सभेचे सभासद होते. संविधान निर्मितीसाठी सभेचे तीन वर्षे कामकाज सुरु होते आणि २६ नोंव्हेबर १९४९ या दिवशी भारताच्या संविधानास मान्यता मिळाली. आपल्या देशाला एक नवा कायदा प्राप्त झाला. हा कायदा म्हणजे लोकांनी, लोकांकडून लोकांसाठी केलेला कायदा होय ! ही शासन पद्धती म्हणजे संघराज्य पद्धती होय.

       एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद ! जय भारत ।।

👉मराठी भाषण क्र 11

      अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे.

      भारत देश २६ जानेवारी १९५० साली संविधानाप्राणे कारभार सुरु झाला. म्हणूनच जीवन हे खरंच सुंदर आहे. विशेषत: मानवी जीवन याची जाणीव होण्यासाठी विश्वाच्या इतिहासात डोकावण्याची गरज असते, त्यासाठी भारतीय राष्ट्रीय दिन साजरे करुन त्याचे स्मरण व आठवणी करुन पुन्हा पारंतत्र्यात किंवा गुलामगिरी मध्ये आपण जाणार नाही त्यासाठी नवी पिढी त्यांची काळजी घेऊन देशप्रेमासाठी आपले सर्वस्व अपर्ण करण्याची तयारी ठेवली पाहिजे.

       एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद ! जय भारत ।।

👉मराठी भाषण क्र 12

      अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन शब्द सांगणार आहे.

      आपला देश जेव्हा स्वतंत्र प्रजासत्ताक देश बनला तेव्हाच्या ऐतिहासिक क्षणाची आठवण म्हणून प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपल्या सर्वांना माहित आहे की भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाले आणि देशाला स्वतःची राज्यघटना नव्हती, त्याऐवजी भारताचे शासन ब्रिटिशांनी लागू केलेल्या कायद्यांद्वारे केले जात होते. तथापि, अनेक विचारविमर्श आणि सुधारणांनंतर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने भारतीय संविधानाचा मसुदा सादर केला, जो २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आला आणि २६ जानेवारी १९५० रोजी अधिकृतपणे अंमलात आला.

      एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद ! जय भारत ।।

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Post a Comment

0 Comments