राज्यात इयत्ता तिसरी या वर्गापासून सराव परीक्षा ? पास नापासला पुन्हा सुरुवात ?

 


राज्यात इयत्ता तिसरी या वर्गापासून सराव परीक्षा ? पास नापासला पुन्हा सुरुवात ?

👉आपण जाणतोच की महाराष्ट्र या राज्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी शासन तसेच प्रशासन यांच्यामार्फत विविध  धोरण राबविले जातात.

👉 महाराष्ट्र वगळता अन्य शैक्षणिक दृष्ट्या प्रगत असलेल्या राज्यांमध्ये शिक्षणाचा पॅटर्न कसा आहे? 

👉परीक्षा पद्धती कशी आहे? 

👉याचा अभ्यास करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि शालेय शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी. केरळ, राजस्थान, पंजाब, गोवा राज्यांच्या शिक्षण पद्धतीचा जवळून अभ्यास केला.

👉त्यातल्या त्यात केरळ राज्यातील शिक्षण पद्धती सर्वोत्तम (Kerala Education pattern will be adopted from coming academic years) असून; येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून माध्यमिक स्तरापर्यंत शिक्षणाची व्यवस्था पाहिली जाते.असे दिसून आले.

 👉केरळ या राज्यतील विद्यार्थ्यांची दरमहा चाचणी घेऊन, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला जातो. त्यामुळे ही पद्धत उत्तम असल्याचे मत, राज्यातील शिष्टमंडळाचे झाले आहे.

🔴तिसरीपासून सुरू होणार परीक्षा :🔴


👉केरळ राज्यात गेल्या काही वर्षांपासून पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जात नव्हत्या.

👉तेथील  विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले जात होत. 

👉त्यामुळे  विद्यार्थी आणि त्यांना शिकवणारे शिक्षकही फारसे लक्ष देत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दरमहा परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. 

👉या परीक्षेत जर विद्यार्थ्यांची प्रगती समाधानकारक नसेल, तर त्यांच्याकडे विशेष लक्ष देऊन पुन्हा एकदा परीक्षा घेतली जाणार आहे. 

👉एकूणच विद्यार्थ्यांची सर्वांगीण गुणवत्ता वाढीस लागावी यासाठी हा प्रयत्न होणार असल्याचे, पगारे यांनी सांगितले. 

👉शिवाय विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातील विविध स्पर्धाचे आयोजन करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, हा सुद्धा राज्य शासनाचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले.


🔴शिक्षण समृद्धी केंद्राची उभारणी होणार🔴

👉राज्यातील प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख लक्षात यावा.

👉 तसेच प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत लक्ष देता यावे, यासाठी आता पुण्यात शिक्षण समृद्धी केंद्र उभारण्यात येणार असल्याचे समजते.

 👉या शिक्षण समृद्धी केंद्राच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील प्रत्येक शाळा आणि प्रत्येक विद्यार्थीची माहिती संकलित करून ठेवली जाणार आहे.

👉असे केल्याने कोणताही  विद्यार्थी शिक्षणात मागे पडणार नाही, असा दावाही पगारे यांनी केला.

👉साध्य तरी पास नापास ही जुनी पद्धत राबवणार असल्याचे दिसून आले नाही.

👉पाहुयात येणाऱ्या भविष्यात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना याचा किती फायदा झाला हे पाहणे सुद्धा गरजेचे झाले आहे .


✍️श्री सुनिल एन राठोड, मुरुम

Post a Comment

0 Comments