शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ..बदल्याबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय....

 

👉शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ..बदल्याबाबत राज्य शासनाचा मोठा निर्णय.... 


👉शिक्षकांच्या बदल्यांबाबत एक अत्यंत महत्वाची बातमी आहे. 


👉राज्य सरकारने एप्रिलमध्ये दिलेल्या आदेशानंतर बदल्यांची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. 


👉शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदलीसाठीचे पोर्टल 5 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे.


👉 बदल्यांची ही प्रक्रिया 5 जानेवारी 2023 पर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले..


👉जिल्हा अंतर्गत बदलीसाठी शिक्षकांनी 7 नोव्हेंबरपर्यंत आपली माहिती सादर केली आहे.


👉 आता 24 ते 26 नाव्हेंबरपर्यंत विशेष संवर्ग भाग एकमध्ये येणाऱ्या शिक्षकांनी होकार दर्शविल्यास तीन दिवसांत पोर्टलवर 1 ते 30 किंवा आपल्या आवश्यकतेनुसार पसंतीक्रम नोंदवता येईल.


🔴शिक्षकांना शाळांचे पसंती क्रमांक नोंदवावे लागतील🔴


👉शिक्षकांना पसंती क्रमानुसार शाळा न मिळाल्यास,  पूर्वीचीच शाळा कायम राहील.


👉 विशेष संवर्ग भाग-दोनसाठी प्राधान्यक्रम भरण्याची मुदत 1 ते 12 डिसेंबरपर्यंत आहे. 


👉त्यात 30 शाळांचा प्राधान्यक्रम नोंदवता येईल.

 

👉प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास, विशेष संवर्ग भाग दोनमधील शिक्षकांची बदली होणार नाही. 


👉त्यांची पूर्वीचीच शाळा कायम राहील.


👉ज्या शिक्षकांना बदली अधिकार प्राप्त आहेत, त्यांना 8 ते 12 डिसेंबरपर्यंत प्राधान्यक्रम भरता येणार आहेत. 


👉सेवाज्येष्ठतेनुसार 30 शाळांचा प्राधान्यक्रम 3 दिवसांत ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा लागणार आहे.


👉दरम्यान, बदली नको असल्यास, तसेच बदलीपात्र शिक्षक नसल्यास, प्राधान्यक्रम न भरल्यास शिक्षकाची बदली होणार नाही.


👉 बदल्याची ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. 


👉त्यानंतर 5 जानेवारी 2023 रोजी बदल्यांचे आदेश प्रकाशित केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.


 म्हणजेच पूर्वीपेक्षा थोडीशी सवलत देण्यात आली आहे म्हणजेच पूर्वी पसंतिक्रमानुसार देण्यात आलेल्या शाळेपैकी कोणतेही जागा न मिळाल्यास आणि संबंधित शिक्षकांची इतर सिनियर शिक्षकांमार्फत खो बसत होता तो आता संवर्ग 1 व 2 ला तर वगळण्यात आल्याचे दिसते ,याबाबत संवर्ग 3 व 4 चे काय होईल याची प्रतीक्षा करावी लागेल 


Post a Comment

0 Comments