26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताने संविधान स्वीकारला !



■ संविधानाची निर्मिती ■

👉डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्त्वातील घटना समितीने तयार केलेला मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्विकारला गेला होता. 

👉26 नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.

👉 1949 मध्ये या दिवसापासून नागरिकत्व, निवडणुका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या. 

👉संपूर्ण राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 रोजी झाली. 

👉घटनासमितीने भारतीय संविधान बनविण्यासाठी 2 वर्षे 11 महिने 18 दिवस केले काम.

👉भारत  देश हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून ओळखला जाऊ लागला.

👉 त्याच प्रमाणे आपली राज्यघटना ही जगातील सर्वात मोठी घटना म्हणून प्रसिद्ध झाली. 

👉घटनासमितीची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी घेण्यात आली. मात्र प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यास फार दिवस गेले. 

👉भारत स्वतंत्र झाल्यानंतरच खर्‍या अर्थाने कामास सुरवात झाली.

👉 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समिती स्थापन झाली.

👉 घटना समितीची शेवटची बैठक 24 जानेवारी 1950 रोजी झाली. 

👉घटना समितीने एकूण 2 वर्षे 11 महिने 18 दिवस काम करुन राज्यघटना तयार केली.

👉घटना समितीच्या कार्यामध्ये अनेक उपसमित्या काम करत होत्या. 

👉पंडित नेहरु, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद आदी नेते या उपसमित्यांचे नेतृत्व करीत होते. 

👉घटनेचा कच्चा अराखडा तयार करण्याचे काम घटनाविषक सल्लागार सर बी.एन. राव यांच्याकडे होते.
 
👉या अराखड्यास अंतिम रुप देण्याचे काम मसुदा समितीच्या अध्यक्षाकडे, अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे होते.

■ घटनेत 395 कलमे ■

👉घटनासमितीचे सभासद 308 होते. तिची एकूण 11 अधिवेशने झाली.

👉 घटना सल्लागारांचा मूळ मसुदा 243 कलमी व 13 परिशिष्टांचा होता. घटनेच्या आराखडा समितीने केलेल्या मसुद्यात 31 कलमे व 8 परिशिष्टे होती.

👉 शेवटी घटनासमितीने मंजूर केलेल्या घटनेत 395 कलमे 8 परिशिष्टे राहिली.

👉घटनेत सामाजिक, आर्थिक न्यायाला अग्रक्रम
संविधानात लोकशाही आणि सामाजिक व आर्थिक न्याय ह्या तत्त्वांना अग्रकम दिलेला आहे. 

👉ह्या मूल्यांशी सुसंगत असे संस्थात्मक, सांस्कृतिक परिवर्तन समाजात घडवून आणावे लागेल, ह्याची जाणीव घटनाकारांना होती. 

👉संविधानात केंद्र आणि राज्ये ह्यांच्या घटना समाविष्ट आहेत, हे संविधानाच्या दीर्घतेचे दुसरे एक कारण आहे. 

👉याशिवाय अल्पसंख्याक गटांत सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने काही तरतुदी अंतर्भूत केल्या आहेत. 

👉उदा., समाजाच्या दुबळ्या गटांसाठीच्या तरतुदी तसेच अल्पसंख्याकांचे शैक्षणिक व सांस्कृतिक अधिकार, अनुसूचित जातिजमातींसाठी संसदेमध्ये ठेवलेल्या  राखीव जागा इत्यादी.

 👉घटनाकारांना प्रजासत्ताक शासनयंत्रणा आणि धर्मनिरपेक्ष राज्य भारतात निर्माण करावयाचे होते. 

👉त्याकरिता सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय प्रस्थापित होईल, अशी शासनयंत्रणा कार्यवाहीत यावी, हा त्यांचा हेतू होता.

👉 भारताच्या संविधानात जरी इतर देशांच्या संविधानांशी साम्य असलेल्या तरतुदी असल्या, तरी त्या तरतुदींच्या प्रेरणा भारतीय जनतेच्या अनुभूतीतून तसेच इच्छा आकांक्षातूनच उगम पावल्या आहेत.


■ संविधान म्हणजे काय – भारतीय ■


जनतेकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून शासन किंवा सरकार स्थापन केले जाते. संविधानातील तरतुदींनुसारच राज्यकारभार करण्याचे शासनावर बंधन असते. संविधानातील तरतुदी किंवा त्यात नमूद केलेला कायदा मूलभूत असतो.

◆संविधानास विसंगत ठरतील असे कायदे शासनाला करता येत नाहीत. असे केल्यास ते कायदे न्यायमंडळ रद्द ठरवू शकते.

◆संविधानातील तरतुदी अनेकविध बाबींविषयी असतात. उदा., नागरिकत्व, नागरिकांचे हक्क, नागरिक आणि शासनसंस्था यांच्यातील संबंध, शासनाने करायच्या कायदयांचे विषय, निवडणुका, शासनावरील मर्यादा व राज्याचे अधिकारक्षेत्र इत्यादी.

◆संविधानानुसार राज्यकारभार करण्याचे तत्त्व बहुतेक सर्वच देशांनी स्वीकारले आहे. असे असले तरी प्रत्येक देशाच्या संविधानाचे स्वरूप वेगवेगळे असते.

◆इतिहास, समाजरचना, संस्कृती, परंपरा इत्यादी बाबतींत देशादेशांमध्ये भिन्नता असते किंबा वेगळेपण असते. त्याचप्रमाणे राष्ट्रांच्या गरजा व उदिष्टेही भिन्न असू शकतात. त्यास अनुरूप असे संविधान निर्माण करण्याचा प्रयत्न ते ते राष्ट्र करते.

◆आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तत्पूर्वी भारतावर इंग्रजांचे राज्य होते.

◆इंग्रज सरकारने राज्यकारभाराच्या सोईसाठी मुंबई प्रांत, बंगाल प्रांत व मद्रास प्रांत यांसारखे विभाग पाडले होते.

◆या डॉ.राजेंद्रप्रसाद प्रांतांपधील कारभार तेथील लोकप्रतिनिधींमार्फत चालवला जात होता. त्याचबरोबर देशातील काही भागांचा कारभार तेथील स्थानिक राजे पाहत होते.

◆अशा भागांना संस्थाने म्हणत व त्यांचे प्रमुख संस्थानिक म्हणून ओळखले जात. संविधान सभेत प्रात आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश होता.

◆संविधान सभेत एकूण 299 सदस्य होते. डॉ.राजेंद्रप्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते.


◆डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान◆


◆डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांचा विवीध देशांच्या संविधानाचा गाढा अभ्यास होता.

त्यांनी अहोरात्र अभ्यास व चिंतन करून संविधानाचा मसुदा तयार केला.

◆डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेला संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्यात आला. त्यावर कलमवार चर्चा झाली. अनेक दुरुस्त्या सुचवण्यात आल्या.

◆संविधानाचा मसुदा संविधान सभेपुढे मांडण्याचे, त्याविषयी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे, तसेच संविधान सभेच्या सूचनांनुसार मूळ मसुद्यात फेरबदल करण्याचे, प्रत्येक तरतूद निर्दोष करण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केले.

◆भारताच्या संविधान निर्मितीतील या योगदानामुळे त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणतात.


संकलन - श्री सुनिल नरसिंग राठोड, मुरुम

Post a Comment

0 Comments