मॅडम मेरी क्युरी मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी, Maria Salomea Skłodowska-Curie (७ नोव्हेंबर, इ.स. १८६७ - ४ जुलै, इ.स. १९३४)

 


मॅडम मेरी क्युरी मारिया स्क्लोदोव्स्का-क्युरी, Maria Salomea Skłodowska-Curie (७ नोव्हेंबर, इ.स. १८६७ - ४ जुलै, इ.स. १९३४) 


👉जन्म व बालपण


मेरी क्युरी यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६७ साली पोलंड देशाची राजधानी वॉर्सामध्ये एका अत्यंत अशा गरीब कुटुंबात झाला. त्यांचे मुळ नाव मारिया स्क्लोडोव्ह्स्का असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव वाल्दिस्लाव असे होते. ते गणित व विज्ञान या विषयांचे शिक्षक होते. मेरी क्युरी यांच्या आईचे नाव, ब्रोनिस्लावा असे होते. त्या शिक्षिका व उत्तम पियानोवादक होत्या. मेरी क्युरी यांना जोसेफ, जोफिया, हेलेना, ब्रोनिस्लावा ही भावंड होती. मेरी क्युरी यांच्या आईंना क्षयरोग झाला होता. त्यामुळे मेरी क्युरी यांना त्यांची साथ फार काळ लाभली नाही. ९ मे १८७८ साली मेरी क्युरी यांच्या आईचा मृत्यू झाला.


👉संशोधन व कार्य


वयाच्या सोळाव्या वर्षी तिने शिक्षिका म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ह्यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात क्ष-किरण व्हॅन उभारली, क्ष-किरण यंत्रे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालविण्याचे प्रशिक्षणही दिले. कॅन्सर या आजारावर काम करण्यासाठी मेरी क्युरीने रेडियम संशोधन संस्था उभारली होती. याच संस्थेत मेरी क्युरी यांची मुलगी आयरीन क्युरी सुद्धा सक्रिय होती. पुढे आयरीन क्युरीलाही नोबेल पारितोषिक मिळाले. किरणोत्सारीता या शब्दाचे श्रेय मेरी क्युरी यांच्याकडे जाते. मेरी आणि पिएर क्युरी या दोघांनी पिचब्लेंडसारखी खनिजे युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात बेक्वेरल किरण उत्सर्जित करतात हे दाखवून दिले. मेरीने पिचब्लेंडमधून मोठ्या प्रमाणात किरणोत्सार करणारा पदार्थ वेगळा करून एका नवीन मूलद्रव्याची भर घातली. या नवीन मूलद्रव्यास मेरीने आपल्या पोलंड देशावरून पोलोनियम असे नाव दिले. पुढे मेरी आाणि पिएर क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी रेडियम नावाचे मूलद्रव्य सापडले. रेडियम हे युरेनियमपेक्षा १६५० पट जास्त किरणोत्सारी आहे. एक ग्रॅम रेडियममून दर सेकंदाला जितका किरणोत्सार बाहेर पडतो त्याला १ क्युरी किरणोत्सार असे म्हटले जाते.


👉 पुरस्कार


नोबेल पारितोषिक पटकावणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. तसेच दोन नोबेल पारितोषिके मिळवण्याचा पहिला मानही त्यांनी मिळवला.



👉सखोल माहिती

मादाम मेरी क्युरी यांना ‘रेडियोअॅक्टीव्हीटी’ वरील त्यांच्या संशोधनाबद्दल अतिशय मानाचे समजले जाणारे नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. नोबेल पारितोषिक मिळविणाऱ्या मादाम मेरी पहिल्या महिला शास्त्रज्ञ ठरल्या. मात्र त्यांना त्यांच्या कार्याचे हे श्रेय जेव्हा मिळाले, तेव्हा त्यांच्या आयुष्याची अखेर जवळ येऊन ठेपली होती. मेरी त्यांच्या पाच भावंडांमध्ये सर्वात लहान होत्या. त्यांना अगदी लहान वयातच लिहिण्या-वाचण्याचे कौशल्य अवगत झाले. मेरी यांना अतिशय विलक्षण बुद्धिमत्ता लाभली होती. मात्र अतिशय लहान वयामध्येच मेरीला त्यांच्या परिवाराची जबाबदारी उचलावी लागली.
      मेरीची आई आणि थोरल्या बहिणीचे निधन झाल्यानंतर मेरीने शिक्षिकेची नोकरी स्वीकारून परिवाराच्या संगोपानाच्या जबाबदारीमध्ये आपला वाटा उचलला. खरे तर मेरीला उच्चशिक्षण घेण्याची खूप इच्छा होती, पण त्याकाळी पोलंडमधील महिलांना विद्यापीठामध्ये प्रवेश दिला जात नसे. तेव्हा मेरी ने विद्यापीठामध्ये न जाता गणित आणि शास्त्रावरील पुस्तके मिळवून घरीच अभ्यास सुरु केला. मादाम मेरी यांना शास्त्र विषयामध्ये अतिशय रस असून शास्त्रज्ञ बनण्याची त्यांची इच्छा होती. विज्ञानामध्ये होणाऱ्या प्रगतीमुळे मानव जातीचे भले होईल अशी त्यांची खात्री होती.
      अश्या रीतीने सहा वर्षे मेहनत आणि अभ्यास केल्यानंतर, विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याइतपत पैसे मेरीकडे साठल्यानंतर, त्यांनी फ्रांसला जाऊन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. तासंतास मेहनत करीत मेरीचे अभ्यासजीवन सुरु झाले. ही वाट अतिशय खडतर होती, पैशांची अडचण तर होतीच, आणि काही वेळा तर केवळ चहा आणि पावावर गुजराण करण्याची वेळ मेरीवर येत असे. पण तरीही मेरी आनंदात असे. तिची बुद्धिमत्ता असामान्य तर होतीच, त्यामुळे प्रत्येक परीक्षेमध्ये मेरी अव्वल येत असे. वेळप्रसंगी आपल्या सोबत शिकणाऱ्या इतर विद्यार्थांच्या अभ्यासातील अडचणी देखील मेरी दूर करीत असे. मेरीने आपल्या परिश्रमाने आणि जिद्दीने भौतिक शास्त्रामध्ये पदवी मिळविली.
    त्यानंतर तिची भेट एका फ्रेंच भौतिक शास्त्राज्ञाशी झाली, आणि कालांतराने दोघे विवाहबद्ध झाले. त्यानंतर एक्स रे चा शोध लावून, आणि क्युरी दाम्पत्याने हे तंत्रज्ञान अधिक विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. किरणांचे उत्सर्जन करणाऱ्या वस्तूला ‘रेडियोअॅक्टीव्ह’ म्हणून प्रथम क्युरी दाम्पत्यानेच संबोधले होते. त्यांच्या या नव्या शोधाला त्याच्या उपयुक्ततेमुळे भरपूर प्रसिद्धी लाभली आणि या शोधासाठी मेरीचे पती पिएर क्युरी यांना नोबेल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. पण या शोधामध्ये मेरीचे सहकार्य तितकेच महत्वाचे असल्याचे सांगून पिएर यांच्या आग्रहाखातर मेरी यांनाही नोबेल देऊन गौरविण्यात आले.
    त्याकाळी विद्यानाच्या क्षेत्रामध्ये पुरुषांचे वर्चस्व असून, या क्षेत्रामध्ये काम करणे महिलांना जमणारे नाही अशी सर्वसाधारण सामाजिक विचारसरणी होती, त्यामुळे मेरीला सतत निंदेला, अपमानाला तोंड द्यावे लगत असे. तरीही मेरी जिद्दीने काम करीत राहिली, आणि तिच्या या जिद्दीच्या फलस्वरूप पोलोनिम आणि रेडियम या दोन रासयनिक तत्वांचा शोध लागला. रसायनशास्त्रातील तिच्या या कामगिरीबद्दल मेरी ला १९११ साली दुसऱ्यांदा नोबेल पारितोषिक देऊन सम्मानित करण्यात आले. पहिल्या विश्वयुद्धाच्या वेळी सैनिकांना झालेली दुखापत समजून घेण्यासाठी एक्स रेचा वापर करण्याची कल्पना मेरीने मांडली. पण त्याकाळी एक्सरे मशीन्स अभावानेच उपलब्ध असत. त्यामुळे ही मशीन्स एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी गाड्यांचा वापर करण्यात येऊ लागला. त्यामुळे लाखो सैनिकांच्या दुखापतींचे योग्य निदान होऊन त्यांना योग्य उपचार देता येणे शक्य होऊ शकले. मात्र रेडीयेशनचे दुष्परिणाम मेरीला स्वतःला टाळता न आल्याने १९३४ साली मादाम मेरी क्युरी यांचे निधन झाले.

Post a Comment

0 Comments