कोणत्याही वाहनाचे टायर 'काळे' च का असतात? पांढरे किंवा इतर रंगाचे का नसतात?

 कोणत्याही वाहनाचे टायर 'काळे' च का असतात? पांढरे किंवा इतर रंगाचे का नसतात?



आपण रस्त्यावरून चालताना ट्रक, कार, बाइक्ससह आदी सर्वच प्रकाराची वाहने बघितली असतील. पण या सर्वच वाहनांचे टायर्स नेहमी काळेच का असतात? असा प्रश्न कधी आपल्याला पडला आहे का? जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल, तर जाणून घ्या, या मागचे वैज्ञानिक कारण...

आपल्याला माहितच असेल, की वाहनांचे टायर्स रबराचे असतात. रबराचा रंग राखाडी असला तरी टायर बनवण्याच्या प्रक्रियेत त्याचा रंग काळा होतो. काळे टायर अधिक काळ टिकतात, यामुळे टायरचा रंग काळा असतो. खरे तर, टायर बनविण्यासाठी रबरमध्ये ब्लॅक कार्बन आणि सल्फर मिसळले जाते. यामुळे टायरचा रंग काळा होतो.

नैसर्गिक रबर अत्यंत मऊ असते. पण टायर बनविण्यासाठी ते कडक केले जाते. रबर कडक करण्यासाठीच त्यात कार्बन आणि सल्फर मिसळले जाते. यामुळेच टायरचा रंग काळा असतो. जर रबरात कार्बन आणि सल्फर मिसळले नाही, तर यापासून तयार होणारे टायर अत्यंत खराब क्वालिटीचे असतील. तसेच कमी वापरातच हे टायर घासले जातील आणि खराब होतील. यामुळे वाहनांचे टायर्स काळ्या रंगाचे असतात

टायर : कोणत्याही वाहनाचे चाक रस्त्यावरून फिरत असताना रस्त्याच्या प्रत्यक्ष संपर्कात येणाऱ्‍या त्याच्या पृष्ठावर बसविण्याचा एक स्वतंत्र व विशेष कठीण असा भाग. लाकडी चाकाची प्रधी (काठ) लवकर झिजते म्हणून तिच्यावर पोलादी पट्टीची स्वतंत्र धाव बसवितात. ही धाव गरम करून बसवली व मग पाणी ओतून थंड केली म्हणजे आकुंचन पावून चाकावर घट्ट बसते व मग चाक पुष्कळ दिवस टिकते. तिच्यामुळे चाकाला चांगली मजबुतीही येते. आगगाडीच्या लोखंडी चाकांवरही जरूरीनुसार कठीण पोलादाच्या धावा बसवितात. धावेमुळे चाके पुष्कळ दिवस टिकतात आणि रस्ता किंवा रूळ व चाक यांमधील घर्षणरोध पुष्कळ कमी होतो. या फायद्यांबरोबर खडबडीत रस्त्यावरून वाहन जाताना पोलादी धावेमुळे वाहनाला हादरे बसतात, हा तिच्यातील एक तोटा आहे. हादरे बसू नयेत व वाहनातील प्रवास सुखकर व्हावा म्हणून रस्ता-वाहनांना पोलादी धावेऐवजी टिकाऊ रबराची धाव वापरतात. विशेषकरून अशा लवचिक जातीच्या धावेलाच टायर म्हणतात.

प्रकार : रबराच्या टायरांचे भरीव आणि वायवीय (पोकळ) असे दोन प्रकार आहेत. भरीव टायर भार वाहनाचे, हादरे शोषण्याचे वगैरे कामे स्वतःच करतात, तर वायवीय टायरात ही कामे संपीडित (दाबयुक्त) हवेकडून केली जातात.

आ. १. भरीव आणि कठीण रबराच्या आडवा छेद : (१) टायर, (२) रबराची युग्मक (जोडणारी) पट्टी, (३) पोलादी पट्टीचे धारक कडे, (४) चाकाची पाळ.
आ. १. भरीव आणि कठीण रबराच्या आडवा छेद : (१) टायर, (२) रबराची युग्मक (जोडणारी) पट्टी, (३) पोलादी पट्टीचे धारक कडे, (४) चाकाची पाळ.

भरीव टायर : आ. १ मध्ये भरीव आणि कठीण रबरी टायराचा छेद दाखविला आहे. हा टायर एका जाड पोलादी पत्र्याच्या पन्हळी छेदाच्या कड्यामध्ये उष्णतेच्या साहाय्याने कायमचा चिकटवून बसविलेला असतो. हे कडे मग चाकाच्या परिघावर दाबून बसवितात. घोडागाडीच्या चाकावर या पद्धतीचा टायर वापरतात, पण तो सरळ थंड पन्हळी प्रधीत नुसताच जोराने दाबून बसवितात.

आकृती २ मध्ये पोटात पोकळी ठेवलेल्या जाड आणि मऊ रबराच्या टायराचा छेद दाखविला आहे. असा टायर वाहनाला बसणारे हादरे वरील प्रकारच्या टायरापेक्षा जास्त प्रमाणात जिरवू शकतो.

आ. २. जाड मऊ रबराच्या पोकळ टायराचा आडवा छेद : (१) पोकळी.
आ. २. जाड मऊ रबराच्या पोकळ टायराचा आडवा छेद : (१) पोकळी.

वायवीय टायर : या प्रकारचे टायर आ. ३ मध्ये दाखविले आहेत. या टायरात संपीडित हवा भरलेले रबराचे पोकळ कडे वापरतात व त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी त्याच्या बाहेरून रबराचे मजबूत कवच बसवितात. या कवचाच्या परिघावर जाड कठीण रबराची धाव (रस्त्याशी प्रत्यक्ष संपर्क येणारा भाग) चिकटवतात. हा टायर हादरे उत्तम रीतीने शोषून घेतो व पुष्कळ दिवस चांगले काम देतो. या जातीचे टायर बैलगाड्या, हातगाड्या, सायकली (दुचाकी), स्कूटरी, मोटार सायकली, विविध प्रकारच्या मोटारगाड्या, निरनिराळ्या यांत्रिक गाड्या इत्यादींसाठी वापरतात. त्यांचे जवळजवळ १७५ निरनिराळे प्रकार आहेत. 

Post a Comment

0 Comments