नील हेनरिक डेव्हिड बोर ( ७ ऑक्टोबर १८८५ - १८ नोव्हेंबर १९६२)

 


👉नील हेनरिक डेव्हिड बोर ( ७ ऑक्टोबर १८८५ - १८ नोव्हेंबर १९६२) 

हे एक डॅनिश भौतिकशास्त्रज्ञ होते. आण्वीय संरचना आणि पुंजभौतिकी सिद्धान्त या विषयांत त्यांनी मूलभूत योगदान दिले. त्याबद्दल १९२२ मध्ये त्यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले. बोर हे एक तत्त्वज्ञानी आणि वैज्ञानिक संशोधनाचे प्रवर्तक देखील होते.


👉नील्स बोहर(niels bohr) यांचे संशोधन


नील बोरनी अणूच्या रचनेवर सिद्धान्त मांडला. त्यानी अर्नेस्ट रुदरफोर्ड यांच्या अणूच्या प्रतिकृतीमध्ये अामूलाग्र सुधारणा सुचवल्या व बोअरची अणूची प्रतिकृती जगासमोर ठेवली. पुंजयामिकीमधील कोपेनहेगन विवेचनची पायाभरणी करण्यात त्यांचा मोठा सहभाग होता.

अणूभोवती इलेक्ट्रॉन कण काही विशिष्ट कक्षांमधेच कोणतेही प्रकाशकिरण उत्सर्जित न करता फिरू शकतात, मात्र एका कक्षेमधून दुसऱ्या कक्षेत त्यांनी उडी घेतली तर प्रकाशकिरणांचे उत्सर्जन होते हे बोर यांच्या आण्वीय संरचना सिद्धान्ताचे मूलभूत तत्त्व आहे. या सिद्धान्ताचे संपूर्ण स्पष्टीकरण पुढे श्रॉडिंजर-हायझेनबर्ग-डिरॅक-पाउली वगैरे बोरच्या शिष्यांनी विकसित केलेल्या पुंजयामिकीने दिले. हे शोधून काढण्यासाठी बोरने ‘बोर्स क्लाऊड चेंबर’ नावाचे उपकरण वापरले.

बोरचे पुंजयामिकीला योगदान म्हणजे त्यांनी मांडलेले परस्परपूरकतेचे तत्त्व. एकाद्या पादार्थिक अवस्थेचे वर्णन वरकरणी परस्परविरोधी भासणाऱ्या कणकल्पना आणि तरंगकल्पना अशा संकल्पनांच्या मदतीने करता येते, तेव्हा या कल्पना परस्परविरोधी नसून परस्परपूरक असतात असे मानणे आवश्यक आहे. बोरच्या विज्ञान आणि तत्त्वविचारात परस्परपूरकता वारंवार डोकावते.


👉निल्स बोहर विषयी अधिक माहिती

कोपेनहेगन विद्यापीठात एक्दा एक प्रश्न विचारला होता. एक वायुभारमापक (बॅरोमीटर) वापरून इमारतीची उंची कशी मोजाल? त्यावेळी एका विद्यार्थ्याने लिहिलं, “एका लांब दोराला बॅरोमीटर बांधावा. त्यानंतर इमारतीच्या वरून तो बॅरोमीटर खाली सोडावा. तो टेकला की त्या दोरीची तिथपर्यंत लांबी मोजावी. त्यात त्या बॅरोमीटरची लांबी मिळवली कीत्या इमारतीची उंची मिळेल.”

अर्थातच तो विद्यार्थी नापास झाला. “पण माझ्या उत्तरात काय चूक आहे?” असं त्या विद्यार्थ्याने शिक्षकांना विचार्लं तेव्हा त्यांनी वैतागून तोंडी परिक्षेला बसायला लावलं. त्याला उत्तरासाठी सहा मिनिटे देण्यात आली. त्यातली पाच मिनिटे तो विद्यार्थी अगदी गप्प बसला. “वेळ संपत आली, लवकर बोल”, असं त्याला डिवचल्यावर मात्र “अनेक तर्‍हेनं हा प्रश सोडवता येईल पण त्यातली आता नक्की कोणती पद्धत सांगू हेच समजत नाहिये.” असं म्हणून त्या विद्यार्थ्याने एकामागून एक अशा खोलवर शास्त्रशुद्ध पद्धती सांगितल्यावर मात्र त्या विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत नापास करणार्‍या शिक्षकांचे डोळेच पांढरे झाले. त्या विद्यार्थ्याचे नाव होते नील्स बोहर.
रुदरफोर्डने १९११ साली आपले बुद्धीमान शिष्य हेन्री मोस्ले व नील्स बोहर यांच्या सहकार्याने अणुरचनेचे व अणुगर्भाचे स्पष्ट व खुलासेवार चित्र वैज्ञानिक जगापुढे मांडले. बोहर-रुदरफोर्ड मॉडेल या नावाने ही अणुगर्भाची कल्पना आता सर्वमान्य झाली आहे.

 

रुदरफ़ोर्डचं अणूविषयक केलेलं मॉडेल आणि प्लांकचं क्वांटम मॉडेल एकत्र करून नवं सुधारीत मॉडेल तयार करण्याचं श्रेय जातं ते याच नील्स बोहरकडे. नील्स बोहर याने १९१३ साली अणुरचनेच्या मूलभूत सिद्धांताचा शोध लावला होता. बोहर मॉडेल या नावाने तो प्रसिद्ध आहे.

 

त्याने सांगितलेल्या अणुसिद्धांताच्या रचनेमुळे रसायनशास्त्र, विद्युत शास्त्र व अणुरचनेच्या मूलभूत सिद्धांताचे सुरुवातीस फारसे स्वागत झाले नसले, तरी या कामाबद्दल तब्बल ९ वर्षांनी मात्र त्याला नोबेल पुरस्काराप्राप्ती झाली.

बोहर हा खूप चतुर माणूस होता. एकदा भाषण देताना कुणीतरी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर माहीत नसल्यानं त्यांन काडेपेटीतील काड्या मुद्दाम खाली सांडल्या आणि त्या काड्या गोळा करता करता उत्त्र आठवून उत्तर दिलं. १९५० च्या दशकात मुंबईला भाषण द्यायला बोहर आलेला असताना आईन्स्टाईनविषयी बोलतान भरून आल्याने बोहरला रडूच कोसळले होते.

 

१७ नोव्हेंबर १९६२ रोजी क्वांटम थीयरीच्या इतिहासाविषयी नील्स बोहरनं एक मुलाखत दिली होती तीच मुलाखत त्याची शेवटची मुलाखत ठरली. त्याच्या दुसर्‍याच दिवशी हृदयविकारानं बोहरचं निधन झालं. बोहरचं काम इतकं मोठं होतं की रिचर्ड र्‍होड्सनं म्हटलं आहे ,”विसाव्या शतकात आईन्स्टाईनच्या खालोखाल सगळ्यात मोठा कोणी शास्त्रज्ञ असेल तर तो नील्स बोहर.”

संदर्भ – अच्युत गोडबोले यांच्या “किमयागार” मधील लेख and https://vinod-gore.blogspot.in


संकलन -श्री राठोड सुनिल नरसिंग.
सौजन्य google 

Post a Comment

0 Comments