कॅव्हेन्डीश, हेन्री : ( १० ऑक्टोबर १७३१ – २४ फेब्रुवारी १८१० )



कॅव्हेन्डीश, हेन्री : ( १० ऑक्टोबर १७३१ – २४ फेब्रुवारी १८१० )

प्रारंभिक जीवन


 हेन्री कॅव्हेंडिशचा जन्म 10 ऑक्टोबर 1731 रोजी नाइस येथे झाला होता, जेथे त्याचे कुटुंब त्या वेळी राहत होते.  त्याची आई लेडी एनी ग्रे, हेन्री ग्रे (केंटचा पहिला ड्यूक) यांची चौथी मुलगी आणि तिचे वडील लॉर्ड चार्ल्स कॅव्हेंडिश, विल्यम कॅव्हेंडिश (देवनशायरचा दुसरा ड्यूक) यांचा तिसरा मुलगा.  त्यांच्या वंशाच्या खुणा आठ शतकांनंतर नॉर्मनच्या काळात सापडतात आणि ग्रेट ब्रिटनमधील अनेक थोर कुटुंबांशी त्यांचा जवळचा संबंध होता.  1733 मध्ये, तिच्या दुसऱ्या मुलाच्या, फ्रेडरिकच्या जन्माच्या तीन महिन्यांनंतर आणि हेन्रीच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या काही काळापूर्वी, त्याच्या आईचा मृत्यू झाला.  वयाच्या 11 व्या वर्षी, हेन्रीने लंडनजवळील हॅकनी अकादमी या खाजगी शाळेत प्रवेश घेतला.  वयाच्या १८ व्या वर्षी (२४ नोव्हेंबर १७४८ मध्ये) त्यांनी केंब्रिज विद्यापीठात सेंट पीटर्स कॉलेजमध्ये प्रवेश केला, ज्याला आता पीटरहाऊस म्हणून ओळखले जाते, परंतु तीन वर्षांनंतर 23 फेब्रुवारी 1751 रोजी पदवी न घेता (जी एक सामान्य पद्धत होती)  त्यानंतर तो आपल्या वडिलांसोबत लंडनमध्ये राहिला, जिथे त्याने लवकरच स्वतःची प्रयोगशाळा स्थापन केली.

 लंडन जवळील हॅकने अकादमीमधून (Hackney Academy)  शालेय शिक्षण पूर्ण करून  पुढील शिक्षणासाठी, कॅव्हेंडीश यांनी पीटर हाऊस महाविद्यालय, केंब्रिज येथे प्रवेश घेतला. तीन वर्षांनंतर पदवी न घेताच ते लंडनला परतले, स्वत:ची प्रयोगशाळा उभारली व आपले संशोधन चालू केले.

हेन्री कॅव्हेंडीश यांनी १७६६ साली हायड्रोजन वायुचा शोध लावला. त्यांनी हायड्रोजनची द्रावणीयता आणि विशिष्ट गुरुत्वाचे मोजमापनही केले. ह्या शोधनिबंधासाठी त्यांना कोपले पदक प्रदान करण्यात आले. हायड्रोजनचे हवेत ज्वलन झाले असता पाणी तयार होते आणि पाण्यातील हायड्रोजन व ऑक्सिजनचे प्रमाण २:१ असते असे त्यांनी दाखवून दिले. १८८३ साली कॅव्हेंडीश ह्यांनी वायुमितीवर (eudiometry) शोधनिबंध प्रसिद्ध केला. ह्या संशोधनासाठी त्यांनी स्वत: बनविलेल्या वायुमापी नलिकेचा उपयोग केला होता. १७६० साली कॅव्हेंडीश ह्यांनी उष्णतेवर संशोधनास सुरुवात केली. वस्तुच्या गतिमुळे उष्णता निर्माण होते असा सिद्धांत त्यांनी मांडला. पाण्यावरील आपल्या संशोधनात अप्रकट उष्णतेची संकल्पना त्यांनी वापरली होती. उष्णता विषयक संशोधनातून त्यांनी उष्णतेचा सर्वसामान्य सिद्धांत विकसित केला. उष्णतेची अक्षय्यता, कार्य व ऊर्जेतील परिवर्तनीयता ह्यासारख्या संकल्पना त्यांनी आपल्या संशोधनातून मांडल्या होत्या.

कॅव्हेंडीश यांनी विद्युत विषयक केलेले संशोधन त्यांच्या मृत्युनंतर बऱ्याच वर्षांनी प्रकाशात आले. ह्या संशोधनात त्यांनी इलेक्ट्रोलाइटसच्या विद्युत वाहकतेचा अभ्यास केला आहे. विद्युत प्रवाह व विद्युत विभव (electric potential) ह्यांच्यातील परस्पर संबध त्यांनी प्रस्थापित केले होते. दोन विरुद्ध भारीत कणांतील परस्पर आकर्षणाचा गणिती पुरावाही ह्या आपल्या संशोधनामध्ये कॅव्हेंडीश ह्यांनी विकसित केला होता.

पृथ्वीची  घनता मोजण्यासाठी कॅव्हेंडीश ह्यानी वापरलेले उपकरण खालील आकृति २ प्रमाणे होते. तर आकृती १ मधे सुधारीत कॅव्हेंडीश प्रयोगाची योजनबद्ध आकृती दाखवली आहे. दोन्ही टोकांना शिशाचे गोळे चिकटवलेला एक लाकडी गज मधोमध दोरी बांधून टांगून ठेवला होता. ह्याला पिळाचा लंबक असे म्हणतात. दोन मोठे गोलक ह्या लहान गोलकांजवळ ठेवले. ही सर्व रचना अशा रितीने केली गेली की चारही गोलक व लाकडी गज समतल वर्तुळाच्या परीघावर असतील. गज वर्तुळाच्या व्यासाच्या ठिकाणी असेल. गुरुत्वाकर्षणामुळे छोटे गोलक मोठ्या गोलकांकडे आकर्षिले जाउन लंबकाच्या दोराला पीळ बसेल. लंबकाचे गोलाकार विस्थापन मोजून त्यावरून गुरुत्वाकर्षणाचा स्थिरांक आणि पृथ्वीची घनता काढली गेली.

कॅव्हेंडीश ह्यांनी काढलेली घनता व आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने काढलेली घनता ह्यात केवळ १% चा फरक आहे. ह्यावरून कॅव्हेंडीश किती अचूक व  काटेकोरपणे प्रयोग करत असत ह्याची आपण कल्पना करु शकतो.

आपल्या कारकीर्दीत कॅव्हेंडीश ह्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली. त्यात, रॉयल सोसायटी व रॉयल सोसायटी क्लबचे सदस्यपद, रॉयल सोसायटीच्या सल्लागार मंडळावर निवड, वैज्ञानिक उपकरणे हाताळण्यातील कौशल्यामुळे रॉयल सोसायटीच्या हवामानखात्याच्या उपकरणांचे समीक्षण करणाऱ्या समितीच्या प्रमुख, ग्रीनविच वेधशाळा, शुक्र संक्रमण समिती, पर्वतांचे गुरुत्वीय आकर्षण अभ्यास समिती इत्यादी. कॉन्स्टन्टाइन फिफ्स ह्यांच्या उत्तर ध्रुव मोहीमेचे ते वैज्ञानिक सल्लागार होते. याशिवाय, ते फिलॉसॉफिकल ट्रॅन्झॅक्शन्स  ह्या नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या शोधनिबंधांच्या समीक्षा समिती, ब्रिटीश म्युझियमच्या  विश्वस्तपदी, रॉयल इन्स्टिट्यूशन ऑफ ब्रिटनचे व्यवस्थापक अशी पदेही त्यांनी भूषवली. कॅव्हेंडीश ह्यांच्या सन्मानार्थ केंब्रिज विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रयोगशाळेला कॅव्हेंडीश फिजिकल लॅबोरेटरी असे नाव देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments