भार्या, शृंगार रस प्रस्तुत (अष्टाक्षरी कविता) कवी सुनिल नरसिंग राठोड, मुरुम

 


भार्या


रंग तुझें सांगू कसे

चक्षु दिपतील असे.


चक्षु तुझे सांगू कसे,

अथांग सागर जसे.


मन तुझे सांगू कसे,

सीमाहीन दिशा जसे.


ओठ तुझे सांगू कसे,

गुलाब पाकळी जसे.


गंध तुझा सांगू कसा,

कस्तुरी सुवास जसा.


रोम तुझे सांगू कसे,

भुईहीन बन जसे.


रूप तुझे सांगू कसे,

शृंगारही लाजे जसे.


बोल तुझे सांगू कसे,

कोमल पंचम जसे


हास्य तुझे सांगू कसे ,

 वाहते ओहोळ जसे.


निरोपण करू कसे,

माझीच तू भार्या जसे....


        शृंगार रस प्रस्तुत (अष्टाक्षरी कविता) ,  भार्या , कवी सुनिल नरसिंग राठोड, मुरुम.....9763961999

Post a Comment

0 Comments