आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्यावर भाषणे



भाषण १

             आदरणीय व्यासपीठ येथे उपस्थित असलेले बंधू भगिनी व माझे छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज आपण अद्याक्रांतिकारक उमजीराजे नाईक यांची जयंती साजरी करण्यासाठी येथे मोठ्या संख्येने जमलेले आहोत आपणास विनंती की मला सहकार्य करावे.

मेरे हौसलों में अभी जान बाकी है
ये तो दौड़ भर थी अभी उड़ान बाकी है,
मेरी सादगी से मेरे बारे में अंदाजा मत लगाना
ये तो शुरुआत भर थी अंजाम अभी बाकी है।

           उमाजी नाईक हे नाव लोकांना फारसं परिचित नाही.इतिहासातील हे शूर आणि लढवय्या व्यक्तिमत्व  इतिहासाच्याच अज्ञात युगात कोठेतरी हरवून बसलं, पण जेव्हा कधी आपण भारताच्या इतिहासाची पाने उलटतो तेव्हा इतिहासाच्या त्याच अंधाऱ्या युगातून या थोर व्यक्तिमत्त्वाच्या शौर्याचे सोनेरी कवडसे आपल्याला साद घालीत असतात, आपल्याला खुणावीत असतात. आपल्याला जवळ बोलावून उमाजी नाईक नामक त्या रांगड्या मराठी वीराची गाथा सांगण्यासाठी आसुसलेले असतात…!  ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्याच्या भिवडी येथे रामोशी-बेरड समाजातील खोमणे कुटुंबात उमाजींचा जन्म झाला. स्वराज्याच्या पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी खोमणे कुटुंब पार पाडत होते, त्यामुळे त्यांना नाईक ही पदवी मिळाली होती. पुढे तेच त्यांचे आडनाव झाले. लहानपणापासुनच उमाजींमधील करारीपणा पाहून भली भली लोक तोंडात बोटं घालायची.  तरुण वयातच त्यांना पारंपारिक रामोशी हेरकलेचे ज्ञान मिळाले आणि अगदी काही काळातच उमाजी या कलेत पारंगत झाले. सोबतच त्यांनी वडील दादोजी नाईक यांच्याकडून कुऱ्हाडी, तीरकमठा, गोफण, दांडपट्टा, तलवार, भाला चालवण्याची कला अवगत केली . म्हणतात ना कि

कोशिशें जारी हैं और हिम्मत बरकरार है
सिर पे है इस दुनिया पर छाने का फितूर,
मुझे किस्मत पर भरोसा नहीं अपनी मेहनत पर है
एक न एक दिन ये हालात बदलेंगे जरूर।

       एकीकडे उमाजी तयार होत असताना दुसरीकडे मराठी साम्राज्य लयास जात होते. इंग्रजांनी एव्हाना पुणे ताब्यात घेतले आणि दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांबरोबर हातमिळवणी करत त्यांच्या सांगण्यानुसार कारभार सुरु केला. दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इतर सर्व किल्ल्यांप्रमाणे पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढून घेतले आणि आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले. त्यामुळे रामोशी समाज उघड्यावर आला आणि त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. इंग्रजांनी रयतेचे हाल हाल केले. उमाजींचे तरुण रक्त झाल्या प्रकाराने उफाळले. त्यांनी छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून स्वराज्य पुन्हा परत आणेन अशी गर्जना केली आणि खुशाबा रामोशी, कृष्ण नाईक, बाबू सोल्स्कर आणि विठुजी नाईक यांना बरोबर घेऊन इंग्रजी सत्तेविरोधात बंडाचे निशाण फडकावले.  

जो तैरने का इरादा किया है
तो तमन्ना यही है कि उस पार जाऊं,
मैं पाकर ही रहूँगा अब मुकाम अपना
क्योंकि मैं वो नहीं जो आसानी से हिम्मत हार जाऊं।

                 महाराष्ट्राच्या मातीतील उमाजी नाईक हा देशातील पहिला वीर ठरला ज्याने इंग्रजी सत्तेच्या मनात दहशत निर्माण केली. त्यांनी श्रीमंतांची लुट सुरु केली आणि त्या लुटीतून ते गरीब प्रजेला मदत करू लागले. प्रजेला प्रमाण मानून त्यांनी इंग्रजांविरुद्ध आपली लढाई सुरु ठेवली. परंतु १८१८ मध्ये ते इंग्रजांच्या हाती सापडले आणि त्यांना १ वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागला.या काळात त्यांनी तुरुंगातून सुटल्यावर काय करायचे याची आखणी केली आणि बाहेर पडल्यावर आपला लढा अधिकच तीव्र केला. एव्हाना लोक देखील उमाजींच्या बाजूने उभे राहिले होते.उमाजींच्या सततच्या कारवायांमुळे मेटाकुटीला आलेल्या इंग्रजांनी सासवड-पुरंदरच्या मामलेदारास उमाजींना कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घेण्याचे आदेश दिला.आदेश मिळाल्याबरोबर मामलेदार इंग्रजांची फौज घेऊन निघाला. उमाजींच्या असंख्य टोळ्या होत्या. या सर्व टोळ्या दाट जंगलात राहत असतं. एका टोळीत जवळपास पाच हजार सैन्य असे.पुरंदरच्या पश्चिमेकडील एका खेड्यात मामलेदार आणि उमाजी यांच्यामध्ये मोठे युद्ध झाले आणि या लढाईत उमाजी आणि त्यांच्या साथीदारांनी रोमहर्षक विजय संपादन करीत इंग्रजांना पहिला जबरदस्त हादरा दिला…!

न मैं ही हारूँगा, न अपने हौसलों को टूटने दूंगा,
जो बुने हैं ख्वाब मैंने वो न वक़्त को मैं लूटने दूंगा
होगी मेरी भी एक जगह उन चमकते सितारों में
जो शुरू किया है सफ़र तो इसे अधूरा न छूटने दूंगा।

       २१ डिसेंबर १८३० ला उमाजींनी आपला पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बॉईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी गडावरून बंदुका, गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते तसेच काहींचे प्राण देखील घेतले होते…!स्वराज्य पुनर्स्थापित करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमाजींनी १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजांविरुद्ध एक जाहीरनामाच प्रसिद्ध केला आणि त्यात नमूद केले –

       मातीतील लोकांनी इंग्रजांच्या चाकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी.इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा,पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. 

      हा जाहीरनामा म्हणजे उमाजीने एकप्रकारे स्वराज्याचा पुकार केल्याचे प्रतिक ठरला. तेव्हापासून उमाजी रयतेचे राजे झाले. उमाजींच्या या अनपेक्षित खेळीमुळे बिथरलेल्या इंग्रजांनी आता मात्र भेदनीतीचा वापर करण्याचा मार्ग अवलंबिला. इंग्रजांनी उमाजीच्या नावे भलीमोठी बक्षिसे लावली आणि अनेकांना फितूर केले. एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून उमाजींनी ज्याचा हात कापला होता तो काळोजी नाईक देखील सूडभावनेने इंग्रजांना जाऊन मिळाला. दुसरीकडे नाना चव्हाण याने देखील १० हजार रुपये आणि चारशे बिघे जमीनीच्या बदल्यात इंग्रजांचे पाय चाटले. या दोघांनी उमाजींची सर्व खबर इंग्रजांना दिली आणि उमाजी आपल्याच माणसांमुळे सापळ्यात अडकले. 

योद्धा वो नहीं जो जंग से पहले ही हार जाए
योद्धा वो है जो बिना कश्ती के समंदर पार जाए,
यूँ तो जमाने में कई मुकद्दर के सिकंदर हैं यारों
योद्धा वही है जो रणक्षेत्र में अपने डर को मार जाए।

      १५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्याच्या उतरोली गावात बेसावध असताना उमाजी इंग्रज अधिकारी मॉकिन टॉस याच्या हाती लागले. इंग्रजांनी त्यांची कसून चौकशी केली, परंतु त्यांच्या हाती विशेष काही लागले नाही.उमाजींच्या खेळ्यांमुळे जेरीस आलेल्या इंग्रजांनी जास्त विलंब न लावता उमाजी नाईकांचे बंड संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. न्यायाधीश जेम्स टेलर यांनी इंग्रजी सत्तेविरोधात उठाव केल्याबद्दल उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा सुनावली. दिनांक ३ फेब्रुवारी १८३२ रोजी पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत वयाच्या ४१ व्या वर्षी उमाजींनी हसत हसत मृत्यूला आलिंगन दिल्रे. इतर कोणीही पुन्हा कधीही इंग्रजांच्या वाट्याला जाऊ नये व लोकांच्या मनात आपली जरब बसावी म्हणून इंग्रजांनी सलग तीन दिवस कचेरीच्या बाहेर पिंपळाच्या झाडाला उमाजींचे प्रेत लटकावून ठेवले होते. पण इंग्रज त्यांनी पेटवलेली बंडाची आग काही शमवू शकले नाहीत आणि पुढे जे काही घडले तो इतिहास तुम्हाला ठावूक आहेच!

        उमाजी नाईक यांची हीच शौर्यगाथा त्यांना आद्यक्रांतीकारकाची उपाधी देऊन गेली. खुद्द इंग्रज अधिकारीही त्यांच्या शौर्याचे कौतुक करून गेले आहेत. इंग्रज अधिकारी रॉबर्ट याने १८२० ला ईस्ट इंडिया कंपनीला लिहिताना म्हंटले आहे

–उमाजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे. जनता त्यांना मदत करत असून कोणी सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजी सारखे राज्य स्थापणार नाही?

तर उमाजींना पकडणारा मॉकिन टॉस म्हणतो –उमाजीपुढे छत्रपती शिवरायांचा आदर्श होता. त्यांना फाशी दिली नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.    शेवटी एकच म्हणव अस वाटत कि

आसमानों को छूने की ख्वाहिश
दिलों में पलती रहने दो,
हकीकत करने हैं जो ख्वाब
तो एक आग सीने में जलती रहने दो।

उमाजी नाईक नामक महाराष्ट्राच्या या थोर क्रांतीपर्वाला मानाचा मुजरा ! एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो / संपवते जय हिंद , जय भारत,  जय उमाजी 

भाषण २  

             आदरणीय व्यासपीठ येथे उपस्थित असलेले बंधू भगिनी व माझे छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज आपण अद्याक्रांतिकारक उमजीराजे नाईक यांची जयंती निमित्त माहिती सांगणारहे. आपणास विनंती की मला सहकार्य करावे.

जब टूटने लगे होसले तो बस ये याद रखना,

बिना मेहनत के हासिल तख्तो ताज नहीं होते,

ढूंड लेना अंधेरों में मंजिल अपनी,

जुगनू कभी रौशनी के मोहताज नहीं होते

 

     महाराष्ट्राच्या इतिहासात महापराक्रमी यौद्ध्यांच्या नामावलीत आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा पराक्रम लक्षवेधून घेतो. लढवय्य क्रांतीकारक आणि प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा पराक्रम प्रेरणा देत राहील. इंग्रजाच्या सत्तेचा सूर्य क्षितिजावर उगवत असताना त्याला पायबंद घालण्याचा विडा उचलून त्यांनी क्रांतीचा लढा उभारला. राजे उमाजी नाईक यांचा जन्म पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे 7 सप्टेंबर 1791 रोजी झाला. वडील दादोजी नाईक-खोमणे, आई लक्ष्मीबाई, भाऊ अमृता व कृष्णा, बहिण जिजाई, गंगू, म्हाकाळा, तुका व पार्वती असे कुटूंब. वयाच्या 10 व्या वर्षी कुस्तीगीर म्हणून त्यांचा लौकिक होता. सातारा गादीचे राजे प्रतापसिंह यांच्याकडून नसरापूरला राममंदिरात त्यांचा गौरव करण्यात आला होता. कुशल शिस्तप्रिय संघटक आणि धाडसी बाणा यामुळे सुरवातीला 300 च्या वर सैन्याची त्यांनी जमवा जमव केली. इंग्रजाना हाकलून लावण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडणारा पहिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून त्यांचे कार्य क्रांतीवीरांना बळ देणारे ठरले.

आओ झुक कर सलाम करे उन्हें,

जिनकी जिंदगी में ये मुकाम आया है.

किस कदर खुशनसीब है वो लोग,

जिनका लहू देश के काम आया है.

 

 इंग्रजांनी रामोशी जातीला गुन्हेगार ठरविले होते. त्यांना चरितार्थासाठी शेती किंवा दुसरा कुठलाही उद्योगधंदा नव्हता. सरळ मार्गाने इंग्रज जगू देत नव्हते. त्यामुळे पोट भरण्यासाठी लुटालूट करण्याशिवाय पर्याय नव्हता. पेशव्यांनी रामोशी वतने रद्द करुन पुरंदरगड खाली करण्याचा हूकुम दिला होता. 1804 मध्ये किल्ल्याच्या पायथ्याशी जांभुळवाडीवर हल्ला करुन त्यांना हुसकावून लावले होते. त्यामुळे त्यांनी निजामाच्या हद्दीत स्थलांतर केले. उमाजीला परिस्थितीची जाणीव झाली. त्याने आपले स्वातंत्र्य मिळविण्याचा निर्धार केला. जातीतील लोकांना एकत्र करुन जागृती केली. रामोशी खंडोबाचे भक्त होते. गेलेली वतने मिळविण्यासाठी बंडाचे निशाण त्यांनी हातात घेतले. 16 फेब्रुवारी 1831 ला इंग्रजाविरुद्ध त्यांनी बंड उभारले. शिवशाहीपासून पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी नाईक घराण्याकडे होती. कोणताही ह्ल्ला परतून लावण्याची त्यांची नेहमी तयारी असे. राजे उमाजी उंचपुरे धिप्पाड होते. चांगले कुस्तीगीर असल्याने रोज दंड बैठकांचा व्यायाम करी. दांडपट्टा, कु-हाडी, तीरकामठा, गोफण, भाला फेक, घोड्यावर बसणे. तलवार चालवणे ही कला त्यांनी वडिलांकडून लवकरच अवगत केली होती. या काळातच हिंदुस्थानात इंग्रजांनी आपली सत्ता स्थापन करण्यास सुरवात केली होती. हळुहळु मराठी मुलुख जिंकत पुणे ताब्यात घेतले होते. 1803 मध्ये दुस-या बाजीरावाला स्थानापन्न करुन त्याने इंग्रजाचा पाल्य म्हणून काम सुरु केले होते. त्याने पुरंदर किल्याच्या संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडुन काढून आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले होते. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. जनतेवर इंग्रजांचे अत्याचार वाढत होते. त्यामुळे उमाजी नाईक जनतेच्या बाजून लढण्यासाठी पुढे झाले. भारताच्या इतिहासात 1857 च्या उठावा अगोदर क्रांतीची स्वप्ने पाहणारे व 14 वर्षे इंग्रजाना सळो की पळो करुन सोडणारे पहिले क्रांतीकारक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. रामोशी समाजात जन्मलेल्या उमाजी नाईक यांच्या वर इतिहास कारांनी कायमच अन्याय केला. त्यांचा पराक्रम दुर्लक्षित राहिला.

मंजिल उन्ही को मिलती है,

जिनके सपनो में जान होती है,

पंख से  कुछ नहीं होता,

हौसलो से उड़ान होती है.”

महाराष्ट्राच्या भूमीत इंग्रजाना पहिला हादरा आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांनी दिला. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उमाजी नाईक यांचे बालपणच शौर्याचा वैभवशाली वारसा असलेल्या पुरंदर किल्ल्याच्या परिसरात गेले. अन्यायाच्या विरोधात उभे राहण्याची हिम्मत त्यांना शिवरायांच्या चरित्रातूनच मिळाली. वयाच्या १८ व्या वर्षी इंग्रजाच्या विरोधात उठाव करण्याचे धाडस त्यांनी दाखविले. विठुजी नाईक, कृष्णा नाईक, खुशाबा रामोशी, बाबू सोळस्कर यांना बरोबर घेऊन जेजुरीत खंडोबारायावर भंडारा उधळीत इंग्रजा विरोधात बंड करण्याची शपथ घेतली. इंग्रज सावकार, मोठे वतनदार अशा लोकांना लुटून ते गोरगरिबांना अर्थिक मदत करु लागले. कोणत्याही महिलेवर अन्याय झाला तर ते भावासारखे धाऊन जात. त्यामुळे जनतेच्या मनात त्यांच्या बाबत आपुलकीची भावना निर्माण होत होती. इंग्रजाना त्रास दिल्याने उमाजी राजे यांना 1818 रोजी एक वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याचा काळात ते लिहायला व वाचायला शिकले. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर त्यांच्या सरकार विरोधातील कारवाया आणखी वाढल्या. उमाजी राजे देशासाठी लढत असल्याने जनताही त्यांच्या सोबत येऊ लागली. त्यामुळे त्यांचे सैन्य पाच हजारापर्यंत गेले. दरोडे आणि लुटमारीमुळे इग्रंज पुरते वैतागून गेले. उमाजीराजांना पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी माँकिन टाँस यांनी पुरंदरच्या मामलेदारास आदेश दिले. मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागातील पोखर, कोडीत परिसरातील डोंगरात शोध घेऊ लागला. तेथे उमाजी आणि इंग्रजांच्या सैन्यात तुंबळ युद्ध झाले. इंग्रजाना पराभव स्वीकारावा लागला. उमाजींनी पाच इंग्रज सैनिकांची डोकी कापून मामलेदाराकडे पाठवली. त्यामुळे इंग्रज चांगलेच धास्तावले होते. उमाजींचे सैन्य डोंगरात टोळ्या करुन राहत असतं.

जब टूटने लगे हौंसला तो बस ये याद रखना,

बिना मेहनत के हासिल तख़्त-ओ-ताज नहीं होते,

ढूढ़ लेना अंधेरे में ही मंजिल अपनी दोस्तों,

क्योंकि जुगनू कभी रोशनी के मोहताज़ नहीं होते।

 

उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवून न्यायधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा सुनावली. खडकमाळ आळीत मामलेदार कचेरी समोर देशासाठी हसत हसत नरवीर उमाजी नाईक 3 फेब्रुवारी 1832 रोजी फासावर चढले. त्यावेळी त्यांचे वय होते 43 वर्षाचे. इंग्रजानी त्यांचे साथीदार खुशाबा नाईक व बाबू सोळस्कर यांनाही फाशी दिली. इतरांना दहशत बसावी म्हणून त्यांचा देह पिंपळाच्या झाडाला तसाच तीन दिवस लटकत ठेवला होता. अशा प्रकारे धगधगत्या क्रांतीकारकाच्या बंडाचा शेवट झाला.

आज तेरे लिए वक्त का इशारा है,

देखता ये जहां सारा है,

फिर भी तुझे रास्तों की तलाश है,

आज फिर तुझे मंज़िलो ने पुकारा है।

 

 

एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो/संपवते जय हिंद, जय भारत जय उमाजी 

 

 

 

 

भाषण 3   

             आदरणीय व्यासपीठ येथे उपस्थित असलेले बंधू भगिनी व माझे छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज आपण अद्याक्रांतिकारक उमजीराजे नाईक यांच्या जयंती निमित्त माहिती सांगणारहे. आपणास विनंती की मला सहकार्य करावे.

बिना संघर्ष कोई महान नही होता,

बिना कुछ किये जय जय कार नही होता,

जब तक नहीं पड़ती हथोड़े की चोट,

तब तक कोई पत्थर भी लोगों के लिए भगवान नही होता।

 

      राजे उमाजी नाईक यांनी 16 फेब्रुवारी 1831 रोजी इंग्रजी सत्तेविरोधात जाहीरनामाच प्रसिदध केला. लोकांनी इंग्रजी नोक-या सोडाव्यात. त्यांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा देऊ नये. देशवासियांनी एकाच वेळी जागोजागी गोंधळ घालून आराजकता माजवावी. इंग्रज राजवट लवकरच संपुष्टात येत आहे. त्यांना कोणी मदत करु नये. इंग्रजाना मदत केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करील. असे सांगून नवीन स्वराज्य उभारण्याचा प्रयत्न केला. स्वतःची फौज उभी केली. उमाजीने राज्यात स्वतःचा ध्वज निर्माण केला. शिवाजी राजांचे हुबेहुब अनुकरण करीत राज्य स्थापना केलं. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला. जनताही उमाजींना मदत करु लागली. उमाजींचा जाहीरनामा इंग्रजांना हादरावणारा होता. 1829 साली सरकारने त्यांच्याशी समझोता करुन त्याला 120 बिघे जमीन दिली. गुन्हे माफ केले. नाईक पदवी दिली. जातीतील काही साथीदारांना नोक-या दिल्या. काही काळ त्यांनी ते मान्य केले.

जिंदगी में जीत और हार है किसके लिए,

एक दूसरे में इतनी तकरार है किसके लिए,

जो आया है इस दुनिया मे एक दिन वो जाएगा,

ए इंसा तो तुझे इतना गुमान है किसके लिए।

 उमाजींनी केलेल्या या उठावामुळे इंग्रज हादरुन गेले. छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुन्हा उमाजी स्वराज्य निर्माण करीन यांची भिती त्यांना वाटू लागली. त्यामुळे उमाजीला पकडण्यासाठी त्यांनी सावकार, वतनदार यांना मोठ मोठी अमिषे दाखविली. उमाजीची माहिती देणारांस 10 हजार रुपये व चारशे बिघे जमीन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली. उमाजींच्या बहीणीवर प्रेम असलेल्या काळोजी नाईक याला उमाजीने एका दरोड्याच्या प्रकरणात शिस्त मोडून एका स्त्रीचे अपहरण केले म्हणून त्याच्या हाताची बोटे दगडाने ठेचण्याची शिक्षा दिली होती. त्याचा बदला घेण्यासाठी काळोजी व नाना चव्हाणही इंग्रजाना फितुर झाला. काळोजीने उमाजीराजे यांच्या बहिणीचा कपटाव्याने वापर करीत इंग्रजाना गुप्त माहिती पुरवली. उमाजीराजे यांच्या पराक्रमावर खूष असलेल्या सरदेशमुख यांची मुलगी पुतळ हिने त्यांच्याबरोबर लग्न केले. काळोजी नाईक आणि त्याचे साथीदार दरोडा टाकण्यासाठी आले असताना वस्तीमध्ये गरीब कुटुंबावर अन्याय करीत असलेल्या काळोजीच्या विरोधात पुतळ स्वतः उभी राहिली. तिचे धाडस आणि प्रामाणिकपणा उमाजीराजांनाही भावला. पुतळ चे उमाजी नाईक यांच्यावर प्रेम होते. त्यातूनच उमाजीने तिच्याबरोबर लग्न केले.

जिसमे उबाल हो ऐसा खून चाहिये,

जीत के खातिर ऐसा जुनून चाहिए,

ये आसमान भी आएगा ज़मीन पर,

बस इरादों में ऐसी गूंज होनी चाहिये।

 

        उमाजीला पकडण्यासाठी माँन्कीटसने दिवेघाटाच्या माध्यावर सैन्याची छावणी टाकून तो शोध घेत होता. भोर, पानवडी, काळदरी, पिंगोरीच्या डोंगर द-यातून उमाजी नाईक यांचा वावर होता. त्या ठिकाणीही इंग्रज शोध घेत होते. काळोजी नाईक फितुर झाल्याचे पुतळला समजल्याने तिने उमाजीनाईकांना वाचविण्यासाठी इंग्रज अधिका-याशी काळोजीच्या वेषातून संधान साधून त्याचा डाव उलटविण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या घडणा-या नाट्यमय घडामोडी बाबत अजूनही संशोधन झालेले नाही. उमाजीराजांचा खरा इतिहास पुढे येण्यासाठी संशोधन होण्याची गरज आहे. उमाजीं नाईक यांची तडफ, बेडरपणा, लढाऊ वृती, शिवनीती, प्रामाणिकपणा, जाज्वल्य देशप्रेम, चपळाई, खंडोबा प्रती असलेली देशभक्ती आणि जनतेत असलेला आदरयुक्त दरारा, सैन्यावरचा वचक यामुळे त्यांनी स्वराज्याचा दुसरा लढा उभारला होता.

       पुन्हा जनतेचे राज्य उमाजींच्या रुपाने येईल अशी शक्यता होती. पण महाराष्ट्राच्या मातीत आणखी काही नवीनच घडणार होते. फितुरीचा जुनाच शाप या मातीत आहे. काळोजी नाईक आणि नाना चव्हाणांनी गुप्त माहिती पुरवली. जोडीला जिजाला मदतीला घेऊन अखेर इंग्रजानी डाव साधला. 15 डिसेंबर1831 रोजी भोर तालुक्यातील उत्रोली गावी रात्री बेसावध असताना उमाजीला इंग्रजानी पकडले. पुण्यात मामलेदार कचेरीत काळ्या खोलीत ठेवण्यात आले. इंग्रज अधिकारी माँकिन टाँस याने उमाजीची सर्व हकीकत लिहून ठेवली आहे.

रो कर मुस्कुराने का मजा ही कुछ और आता है,

जिंदगी में कुछ खो कर पाने का मजा ही कुछ और आता है,

ज़िन्दगी में हार और जीत तो लगी ही रहती है,

लेकिन हार के जीतने का मजा ही कुछ और आता है।

 

       उमाजीवर देशद्रोहाचा खटला चालवून न्यायधीश जेम्स टेलर यांनी दोषी ठरवून उमाजी नाईक यांना फाशीची शिक्षा सुनावली. खडकमाळ आळीत मामलेदार कचेरी समोर देशासाठी हसत हसत नरवीर उमाजी नाईक 3 फेब्रुवारी 1832 रोजी फासावर चढले. त्यावेळी त्यांचे वय होते 43 वर्षाचे. इंग्रजानी त्यांचे साथीदार खुशाबा नाईक व बाबू सोळस्कर यांनाही फाशी दिली. इतरांना दहशत बसावी म्हणून त्यांचा देह पिंपळाच्या झाडाला तसाच तीन दिवस लटकत ठेवला होता. अशा प्रकारे धगधगत्या क्रांतीकारकाच्या बंडाचा शेवट झाला.

      अशा महापुरुषाचे प्रेरणादायी स्मारक त्यांच्या जन्मगावी भिवडी येथे उभारण्याची घोषणा अनेकवेळा झाली. पण योग्य तो न्याय अजून राजे उमाजी नाईक यांना मिळाला नाही. इतिहासकारांनी त्यांना हवे ते स्थान दिले नसले तरी जनतेच्या मनात स्वातंत्र्याचे महानायक म्हणून उमाजीराजांचे स्थान अबादीत आहे. थरकाप उडविणा-या त्यांच्या मोहीमांच्या दंतकथा आजही लोक मोठ्या आपुलकीने सांगत असतात. जाता जाता एक एवढच म्हणेन

कितने भी दलदल हों ज़िन्दगी में पैर जमाये ही रखना,

चाहे हाथ खाली हो ज़िन्दगी में लेकिन उसे उठाये ही रखना,

कौन कहता है छलनी में पानी रुक नही सकता,

अपना हौसला बर्फ़ जमने तक बनाये रखना।

 

एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो/संपवते जय हिंद, जय भारत जय उमाजी 

 

 

 

 

 

 

 

 

भाषण 4    

             आदरणीय व्यासपीठ येथे उपस्थित असलेले बंधू भगिनी व माझे छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज आपण अद्याक्रांतिकारक उमजीराजे नाईक यांच्या जयंती निमित्त माहिती सांगणारहे. आपणास विनंती की मला सहकार्य करावे.

हर ज़ुबा पे एक दिन तेरा ही नाम होगा,

हर कदम पे तेरे दुनिया का सलाम होगा,

हर मुसीबत का सामना करना तू डट कर,

तू देखना समय तेरा भी गुलाम होगा।

एक प्रसिद्ध क्रांतिकारक. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी घडून आलेल्या रामोशांच्या उठावात उमाजी नाईक यांचे नेतृत्व महत्त्वाचे होते. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील भिवडी (ता. पुरंदर) येथे झाला. वडील दादजी खोमणे हे पुरंदर किल्ल्याचे रखवालदार म्हणून काम करत होते. छ. शिवाजी महाराजांच्या काळापासून अनेक किल्ल्यांची राखणदारी या समाजाकडे सोपविण्यात आली होती. उमाजी लहानपणापासून वडिलांसोबत पुरंदरच्या रखवालीचे काम करत. आपल्या वडिलांकडून त्यांनी गोफण चालविणे, तीरकमठा मारणे, कुऱ्हाड चालविणे, भाला फेकणे, तलवार व दांडपट्टा चालविणे इ. कौशल्ये आत्मसात केली होती. उमाजी ११ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले (१८०२) आणि वंशपरंपरेने वतनदारी त्यांच्याकडे आली.

निगाहों में मन्ज़िले हैं,

सामने कठिन रास्ते हैं,

लेकिन मैं हर मुश्किल से उलझ गया,

और मैं सबसे आगे निकल गया।

 इंग्रजांच्या सल्ल्यावरून १८०३ मध्ये दुसऱ्या बाजीरावाने पुरंदर किल्ला रामोशींच्या ताब्यातून काढून घेण्याचा प्रयत्न केला, यावेळी रामोशींनी कडाडून विरोध केला. त्यामुळे संतापलेल्या पेशव्यांनी रामोशी लोकांचे हक्क, वतने, जमिनी जप्त केल्या. उमाजींनी पेशव्यांच्या या अत्याचाराच्या विरुद्ध संघर्ष केला. उमाजी उत्तम संघटक होते. बरेचशे रामोशी त्यांना आपला नेता मानत होते. गरिबांना लुटणारे सावकार, वतनदार व जमीनदार यांना त्यांनी आपले लक्ष बनविले. गोरगरिबांना लुटून सावकार झालेल्या मुंबईच्या चानजी मातिया या पेढीवाल्याचा माल उमाजींनी पनवेल-खालापूरजवळ धाड घालून पळविला. तेव्हा उमाजी इंग्रजांच्या हाती लागले व त्यांना एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा झाली. तुरुंगातून सुटल्यानंतर एका दरोड्यात ते पुन्हा पकडले गेले व त्यांना सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली. कैदेत असताना ते लेखन–वाचन शिकले.

डर मुझे भी लगा फांसला देख कर, पर मैं बढ़ता गया रास्ता देख कर,

खुद ब खुद मेरे नज़दीक आती गई मेरी मंज़िल मेरा हौंसला देख कर।”

उमाजी खंडोबाचा भक्त होते. त्यांच्या पत्रावर ‘खंडोबा प्रसन्न’ असे शीर्षक दिसते. त्यांचा भाऊ आमृता याने सत्तू बेरडाच्या नेतृत्वाखाली इंग्रजांचा भांबुर्ड्याचा लष्करी खजिना लुटला (१८२४-२५). या लुटीमध्ये उमाजींची भूमिका महत्त्वाची होती. १८२५ मध्ये सत्तू मृत्यू पावल्यानंतर त्याच्या टोळीचे उमाजी प्रमुख झाले. उमाजींविरुद्ध इंग्रज सरकारकडे तक्रारी वाढल्याने २८ ऑक्टोबर १८२६ रोजी इंग्रजांनी त्यांच्याविरुध्द पहिला जाहीरनामा काढला. यामध्ये उमाजी व त्यांचा साथीदार पांडूजी यांना पकडून देणाऱ्यांना १०० रु. चे बक्षीस जाहीर केले. तर दुसऱ्या जाहीरनाम्यात उमाजीला साथ देणाऱ्यांना ठार मारण्यात येईल, असे जाहीर केले. परिणामी उमाजींनी इंग्रजांविरुद्ध मोहीमच सुरू केली. भिवडी, किकवी, परिंचे, सासवड व जेजुरी भागात त्यांनी लुटालूट केली. त्यामुळे इंग्रज सरकारने उमाजींना पकडण्यासाठी स्वतंत्र घोडदळाची नियुक्ती केली व १५२ ठिकाणी चौक्या बसविल्या, परंतु उमाजी इंग्रजांच्या हाती सापडले नाहीत.

उठो तो ऐसे उठो कि फक्र हो बुलंदी को …..
झुको तो ऐसे झुको की बंदगी भी नाज़ करे …..

       ८ ऑगस्ट १८२७ रोजी इंग्रजांनी पुन्हा एक जाहीरनामा काढून उमाजींना पकडण्याचे आवाहन केले. जे लोक सरकारला मदत करणार नाहीत, त्यांना उमाजीचे साथीदार समजण्यात येईल असे घोषित केले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. इंग्रजांनी जनतेला पैशाचे आमिष दाखवत उमाजींना पकडणाऱ्यास १२०० रु. चे बक्षीस जाहीर केले. या काळात उमाजींचा दबदबा वाढला. त्यांनी स्वत:ला ‘राजे’ म्हणवून घेण्यास सुरुवात केली. न्यायनिवाडा सुरू केला. इंग्रजांनी उमाजींना पकडण्यासाठी यवतचा रामोशी राणोजी नाईक, रोहिड्याचा रामोशी आप्पाजी नाईक यांचीही मदत घेतलेली दिसते. १८२७ मध्ये उमाजीने इंग्रजांना आव्हान देत पुण्याचा कलेक्टर एच. डी. रॉबर्टसन याच्याकडेच आपल्या मागण्या केल्या. मागण्या मान्य न केल्यास रामोशाच्या उठावास सामोरे जावे लागेल, अशी धमकी दिली. तेव्हा उमाजींच्या विरोधात रॉबर्टसनने ५ कलमी जाहीरनामा काढला (१५ डिसेंबर १८२७). यामध्ये उमाजींना पकडून देणाऱ्यास ५००० रु. चे बक्षीस जाहीर केले होते. या जाहीरनाम्याला प्रतिरोध म्हणून २५ डिसेंबर १८२७ रोजी ठाणे व रत्नागिरी सुभ्यासाठी उमाजींनी स्वतंत्र जाहीरनामा काढला. या जाहीरनाम्यानुसार १३ गावांनी उमाजींना आपला महसूल दिला. ही घटना इंग्रजांना धोक्याची घंटा होती. उमाजी आपल्या हातामध्ये येत नाही म्हटल्यावर इंग्रजांनी त्यांची पत्नी, दोन मुले व एका मुलीस कैद केले. तेव्हा उमाजी इंग्रजांना शरण गेले. इंग्रजांनी त्यांचे सगळे गुन्हे माफ केले व आपल्या पदरी नोकरीस ठेवले. १८२८–२९ या काळात उमाजींकडे पुणे व सातारा या भागात शांतता ठेवण्याची जबाबदारी होती. या काळात त्यांनी अनेक मार्गांनी पैसा जमा केला. त्यामुळे इंग्रजांनी ऑगस्ट १८२९ मध्ये त्यांच्यावर लुटमारी, खंडण्या गोळा करणे, मेजवाण्या घेणे इत्यादी आरोप ठेवले; परंतु नोकरीतून काढून टाकले नाही. या काळात उमाजींनी इंग्रजांविरोधात सैन्य जमवण्यास सुरुवात केली होती. भाईचंद भीमजी प्रकरणात त्यांनी पैसे उकळल्याचे प्रकरण समोर आल्यावर इंग्रजांनी अचानक उमाजींना कैद केले; मात्र त्यातूनही निसटून ते कऱ्हे पठारावर गेले. या ठिकाणाहून इंग्रजांच्या विरोधात त्यांनी कारवाया सुरू केल्या.

ना कोई संघर्ष, ना कोई तकलीफ…तो क्या ख़ाक मज़ा है जीने में
बड़े बड़े तूफ़ान थम जाते हैं, जब आग लगी हो सीने में …

      इंग्रजांनी उमाजींना पकडण्यासाठी ॲलेक्झांडर मॅकिंटॉश यांची नियुक्ती केली. पुण्याचा कलेक्टर जॉर्ज गिबर्न याने २६ जानेवारी १८३१ रोजी उमाजींविरुध्द जाहीरनामा काढून पुन्हा जनतेला पैशाचे आमिष दाखवले, तथापि उमाजींविरुद्ध कोणीही तक्रार केली नाही. त्यानंतर उमाजींनी इंग्रजांच्या विरोधात आपला जाहीरनामा काढला (१६ फेब्रुवारी १८३१). हा जाहीरनामा ‘स्वातंत्र्याचा जाहीरनामा’ म्हणून देखील ओळखला जातो. यामध्ये त्यांनी दिसेल त्या यूरोपियनला ठार मारावे, ज्या रयतेची वतने व तनखे इंग्रजांनी बंद केली आहेत, त्यांनी उमाजीच्या सरकारला पाठिंबा द्यावा, त्यांची वतने व तनखे आपण त्यांना परत मिळवून देऊ; कंपनी सरकारच्या पायदळात व घोडदळात असणाऱ्या शिपायांनी कंपनीचे हुकूम धुडकावून लावावेत, अन्यथा आपल्या सरकारची शिक्षा भोगण्यास तयार राहावे व कोणत्याही गावाने इंग्रजांना महसूल देऊ नये, नाहीतर त्या गावांचा विध्वंस केला जाईल, असा इशारा उमाजींनी दिला होता. उमाजींनी आपण सर्व हिंदुस्तानसाठी हा जाहीरनामा काढला आहे, असा उल्लेख होता. संपूर्ण भारत एक देश अथवा एक राष्ट्र ही संकल्पना यामध्ये दिसून येते. तसेच यामध्ये हिंदू-मुसलमान राजे, सरदार, जमीनदार, वतनदार, सामान्य रयतेचा समावेश होता. या जाहीरनाम्यानंतर उमाजींनी ‘समस्त गडकरी नाईक’ यांना उद्देशून एक पत्रक काढले व इंग्रजाविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले.

उमाजी व त्यांच्या साथीदारांनी कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे व मराठवाड्यात अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अनेक इंग्रज अधिकारी नेमले गेले. ८ ऑगस्ट १८३१ रोजी इंग्रजांनी आणखी एक जाहीरनामा काढून उमाजींना पकडून देणाऱ्यास १०,००० रु. बक्षीस व ४०० बिघे जमीन देण्याचे जाहीर केले. या आमिषाला उमाजीचे दोन साथीदार काळू व नाना हे बळी पडले. त्यांनी उमाजींना १५ डिसेंबर १८३१ रोजी स्वत: पकडून इंग्रजांच्या स्वाधीन केले. त्यानंतर इंग्रजांनी उमाजींना पुणे येथे ३ फेब्रुवारी १८३४ रोजी फाशी देण्यात आली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील इंग्रज सत्तेच्या विरोधात तळागाळातील लोकांकडून घडून आलेला हा पहिला क्रांतिकारी प्रयत्न होता.

खोल दो पंख मेरे अभी और उड़ान बाकी है …..
ज़मी नहीं है मंज़िल मेरी ….. अभी तो पूरा आसमान बाक़ी है,
लहरों की ख़ामोशी को समन्दर की बेबसी न समझो …..
जितनी गहराई अंदर है बाहर उतना तूफ़ान बाक़ी है.

 

एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो/संपवते जय हिंद, जय भारत जय उमाजी 

 

 


Post a Comment

0 Comments