व्हाॅट्स अॅप’ वापरताय ना ? ग्रुप मध्ये पण ऍड असाल ? ‘या’ चुका टाळा, नाहीतर जेलवारी पक्की..समजा !!
मित्रांनो , स्मार्टफोन हातात आल्यापासून प्रत्येकाचं जगच बदललं आहे.. इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यातली साता समूद्र पलीकडे जाऊन सुद्धा एकमेकांना पाहू शकतो माहिती मिळवू शकतो . स्मार्टफोनमध्ये ‘मेसेंजिंग अॅप’ आले नि सोशल मीडियाचा जन्म झाला. देश-परदेशात दूर राहणारे नातेवाईक नि मित्रांच्या संपर्क साधणे अगदी सोपे झाले म्हणजेच जग खूप छोटे झाले.
आपण वापरत असलेले सोसिएल एप्स ‘व्हाॅट्स अॅप’ त्यापैकीच एक अतिशय लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप असून जगात ‘व्हाॅट्स अॅप’ वापरकर्त्यांची संख्या सर्वात जास्त मानली जाते.. परंतु आता ते वापरताना तितकीच दक्षता घेणंही महत्वाचं आहे.. बरेच जण ‘व्हाॅट्स अॅप’ नि ठरवलेल्या पॉलिसीकडे दुर्लक्ष करतात नि मग युजर्सना जेलमध्ये टाकण्याची वेळही येऊ शकते.
काय आहे माहिती जाणून घेऊयात कारण व्हॉट्स अॅप’ कडून आता पॉलिसीची कठाेर अंमलबजावणी केली जात आहे.. या पाॅलिसीचे पालन न करणाऱ्यांना थेट ब्लाॅक केलं जात आहे.. त्यामुळे ‘व्हाॅट्स अॅप’ मेसेज पाठवताना काळजी घेणं गरजेचं आहे. त्यातही एखाद्या ‘व्हॉट्स अॅप’ ग्रुपचे अॅडमिन असाल, तर तुमच्याच नव्हे, तर ग्रुपमधील अन्य सदस्यांच्या पोस्टवर लक्ष द्यावं लागतं..
खाली दिलेल्या चुका टाळा..!!आपण टाळू शकतो किंवा चुका होऊच नये अशी काळजी घेऊ शकतो.
1) हिंसा पसरवणारे मेसेज करणे टाळा
‘व्हॉट्स अॅप’वर (WhatsApp) हिंसा पसरवणारे, समाजात द्वेष निर्माण करणारे मेसेज येत असतील, तर ते शेअर करु नका.. अशा पोस्टबद्दल कोणी आक्षेपार्ह म्हणत रिपोर्ट केल्यास, तुमचं ‘व्हॉट्स अॅप’ अकाउंट ब्लॉक केलं जाऊ शकतं.. लाखो अकाउंट्सवर कंपनीने आतापर्यंत बंदी घातली आहे.यापुढे तुमच्याही अकाउंटला बंदी घातली जाऊ शकते.
म्हणजेच ‘व्हॉट्स अॅप’ अकाउंट रिकव्हर करता येत असले, तरी त्यासाठी युजर्सना स्पष्टीकरण द्यावं लागतं. त्यामुळे द्वेषपूर्ण पोस्ट शेअर करु नका.. तसेच, कोणाच्याही धार्मिक भावना दुखवणाऱ्या पोस्ट शेअर करू नयेत.याने विनाकारण दंगलीला उजाळा दिला जाईल व नाहक लोकांचा बळी जाईल. मग आपले काय होईल हे विचार न केलेलंच बरं.
त्याचबरोबर, ‘चाइल्ड पॉर्न’ शेअर करणाऱ्यांवरही कारवाई केली जाते. त्यासाठी देशात कडक कायदे करण्यात आले आहेत. त्यामुळे एखाद्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह माहिती किंवा व्हिडिओ येत असल्यास त्याबद्दल पोलिसांना कळवा. ‘व्हॉट्स अॅप’वरून अनेकदा बेकायदा कामेही केली जातात. अशा बाबी निदर्शनास आल्यास पोलिसांना माहिती द्यावी. जेणेकरून समाजात इतर कोणीही असल्या घटनांना बळी पडू नये.
3)शहानिशा करूनच माहिती फॉरवर्ड करावी
व्हाट्स अँप च वापर कामापूरतेच करावा . याचा अतिवापर करणे टाळावे, जेणेकरून आपण विनाकारण कोणत्याही अडचणीत येऊ नये याची काळजी आपणच एक सुजाण नागरिक या नात्याने करूयात.
0 Comments