🔴होमी जहांगीर भाभा यांचे प्रारंभीक जीवन – Homi Bhabha Biography in Marathi🔴
👉मित्रांनो, डॉ होमी जहांगीर भाभा या महान अणु वैज्ञानिकाचा जन्म ३० ऑक्टोबर १९०९ साली मुंबई येथील एका पारशी कुटुंबात झाला होता.
👉डॉ. भाभा यांचे वडिल जहांगीर भाभा यांनी कैब्रीज विद्यापीठामधून शिक्षा प्राप्त केली होती. तसचं, पेशाने ते एक प्रसिद्ध वकील होते. शिवाय ते टाटा इंटरप्राईजेज कंपनीसाठी काम देखील करीत असतं.
👉 डॉ. भाभा यांच्या आई मेहेरेन या एका उच्च कुळातील महिला होत्या. डॉ. भाभा यांनी आपलं प्राथमिक शिक्षण कॅथेड्रल शाळेत पूर्ण केलं आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठीत्यांनी जॉन कॅनॉन शाळेत दाखला घेतला.
👉डॉ. होमी भाभा यांची गणित आणि भौतिकशास्त्र विषयाप्रती सुरुवातीपासूनच रुची होती.
👉डॉ. होमी भाभा यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण एल्फिन्स्टन कॉलेज मुंबई आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स महाविद्यालयातून पूर्ण केले.
👉 त्यांनी बी. एस. सी ही पदवी मिळवली. यानंतर सन १९२७ साली ते अभियांत्रिकेचे शिक्षण घेण्याकरिता इंग्लंडला गेले त्याठिकाणी त्यांनी कैब्रीज विद्यापीठातून आपली अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले.
👉 यानंतर सन १९३० साली त्यांनी पदवी संपादन केली आणि सन १९३४ साली केंब्रिज विद्यापीठातून डॉक्टरेट उपाधी ग्रहण केली.
🔴डॉ. होमी भाभा यांची कारकीर्द – Dr Homi Jehangir Bhabha Career 🔴
👉सन १९३९ साली दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी डॉ. होमी भाभा आपल्या भारत देशांत परत आले होते. त्यावेळी त्यांची कारकीर्द संपूर्ण भारतभर पसरली होती.
👉भारतात परत आल्यानंतर ते बंगळूर येथील इंडियन स्कूल ऑफ सायन्स सोबत जोडल्या गेले. सन १९४० साली डॉ. भाभा यांची रीडर पदी नियुक्ती केली गेली. यानंतर त्यांच्या आयुष्याला नवीन कलाटणी मिळाली.
👉त्यांनी आपले संपूर्ण जीवन विज्ञान क्षेत्राच्या सेवेत व्यतित केलं. डॉ. भाभा यांनी कॉस्मिक किरणांचे संशोधन करण्यासाठी इंडियन स्कूल ऑफ साइंस बैंगलोर याठिकाणी त्यांनी वेगळ्या विंभागाची स्थापना केली.
👉सन १९४१ साली वयाच्या अवघ्या ३१ वर्षी डॉ. होमी भाभा यांची रॉयल सोसायटीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली.
👉इंडियन स्कूल ऑफ सायन्सचे तत्कालीन अध्यक्ष आणि नोबल पारितोषिक विजेते प्रा. सी. व्ही. रमण हे देखील डॉ. होमी भाभा यांच्या कामगिरीवर खूप प्रभावित झाले होते.
👉डॉ. होमी भाभा यांनी जे. आर. डी. टाटा यांच्या मदतीने मुंबई येथे ‘टाटा इंस्टिट्यूट ऑफ़ फंडामेंटल रिसर्च’ ची स्थापना केली आणि सन १९४५ साली त्या इंस्टिट्यूट चे निर्देशक बनले.
👉मित्रांनो, डॉ. होमी भाभा यांनी आपल्या कारकिर्दीत सन १९४८ साली भारतीय आणू ऊर्जा आयोगाची स्थापना करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आणू ऊर्जा संबंधित कार्यक्रमात आपल्या देशाचे प्रतिनिधित्व केलं.
👉अश्या या महान संशोधकाने आपल्या कर्तुत्वाच्या बळावर अणु ऊर्जा क्षेत्रांत आपल्या देशाला बळकटी देण्याचं महत्वपूर्ण काम केलं आहे.
👉डॉ. भाभा यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारासाठी पाच वेळा नामांकित केलं गेल आहे, परंतु या महान वैज्ञानिकांना विज्ञान जगातील सर्वात मोठा सन्मान मिळू शकला नाही.
👉मित्रांनो, भारत देशांतील या महान वैज्ञानिकाचे निधन सन २४ जानेवारी १९६६ साली स्वित्झर्लंडमध्ये एका विमान अपघातात झाले.
0 Comments