15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन शालेय मुलां-मुलींसाठी मराठी भाषणे

मराठी भाषणे

भाषण क्र 1

 अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने महात्मा गांधीजी विषयी माहिती सांगणार आहे.

   मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. गांधी हे वैष्णव वाणी. गांधींचे आजोबा उत्तमचंद यांना पोरबंदर संस्थानची दिवाणगिरी मिळाली होती. गांधींचे वडील करमचंद हे प्रथम पोरबंदर संस्थानचे व नंतर राजकोट संस्थानचे दिवाण होते. आई पुतळीबाई व वडील हे दोघेही शीलसंपन्न व धर्मनिष्ठ होते. ते नियमाने धार्मिक ग्रंथांचे पठन करीत व आपल्या मुलाबाळांना धार्मिक कथा सांगून सदाचरणाचे महत्त्व त्यांच्या मनावर बिंबवीत. 

         एवढे बोलून मी माझे बोलणे समाप्त करतो जय हिंद जय भारत 

भाषण क्र 2

 अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने महात्मा गांधीजी विषयी माहिती सांगणार आहे.

      मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ ला गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्या वेळी धार्मिक नाट्यप्रयोग फार होत असत; ते पाहण्यात आणि ध्रुव, प्रल्हाद, हरिश्चंद्र यांच्या कथा ऐकण्यात मोहनदास बाळपणी सातआठ वर्षांचे असताना रंगून जात. हरिश्चंद्राच्या अद्‍भुतरम्य कथेचे त्यांना वेडच लागले होते. हरिश्चंद्र नाटक त्यांनी वारंवार पाहिले. अहिंसात्मक सत्याग्रहाला आवश्यक निष्ठेची मनोभूमिका लहानपणीच तयार झाली.

         एवढे बोलून मी माझे बोलणे समाप्त करतो जय हिंद जय भारत 

भाषण क्र 3

     अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने महात्मा गांधीजी विषयी माहिती सांगणार आहे.

      महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवते ते म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातात काठी ,आणि अंगावर परिधान केलेले ते पांढरे शुभ्र वस्त्र! महात्मा गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते होते. रवींद्रनाथ टागोर यांनी त्यांना “महात्मा” ही उपाधी दिली.

महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ “महान आत्मा” असा आहे. महात्मा गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 या दिवशी सध्याच्या गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद आणि आईचे नाव पुतळीबाई असे होते.

त्यांची आई अत्यंत धार्मिक प्रवृत्तीच्या स्त्री होत्या. त्यांच्या या स्वभावाचा परिणाम गांधीजींवर पडला आणि त्यांच्या मूल्यांनी पुढे चालूनच गांधीजींच्या जीवनात महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट होत गेल्या. सन 1883 मध्ये साडे तेरा वर्षाच्या वयात त्यांचे लग्न कस्तुरबा यांच्याशी करण्यात आले.

         एवढे बोलून मी माझे बोलणे समाप्त करतो जय हिंद जय भारत 

भाषण क्र 4

   अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने महात्मा गांधीजी विषयी माहिती सांगणार आहे.

       मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ ला गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला.८८५ मध्येच करमचंद यांचे निधन झाले. बेचरजी स्वामी यांनी पुतळीबाईंना सांगितले, की मोहनदासाला उच्च वैद्यकीय शिक्षणाकरिता इंग्‍लंडला पाठवावे. परंतु वैद्याला मृत शरीराला स्पर्श करावा लागतो हे बरे नव्हे, म्हणून बॅरिस्टर होण्याकरिता इंग्‍लंडला पाठवावे असे वडील बंधूंनी ठरविले.मोहनदासांना ही कल्पना फार आवडली. आई या धाकट्याला परदेशी पाठविण्यास नाखूष होती. परंतु मोहनदासांचा आग्रह पाहून तिने त्यांना मद्य, मांस व परस्त्री वर्ज्य करण्याची शपथ घ्यावयास लावली आणि ते १८८८ मध्ये इंग्‍लंडला गेले. या वेळी कस्तुरबाई गरोदर होत्या. अठराव्या वर्षीच हिरालालचा जन्म झाला. रामदास व देवदास नंतर काही वर्षांच्या अंतराने झाले. इंग्‍लंडमध्ये असताना गांधींनी शाकाहारी मंडळ स्थापन केले. वडिलांच्याच पायापाशी बसून हिंदू, मुसलमान, ख्रिस्ती मित्रांच्या संवादांमध्ये अनेक धर्माच्या तत्त्वांचे जे विचार त्यांनी वारंवार ऐकले, ते इंग्‍लंडमध्ये गीता, बुद्धचरित्र व बायबलयांच्या वाचनाने अधिक दृढ झाले.

         एवढे बोलून मी माझे बोलणे समाप्त करतो जय हिंद जय भारत 

भाषण क्र 5

    अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने महात्मा गांधीजी विषयी माहिती सांगणार आहे.

       मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म २ ऑक्टोबर १८६९ ला गुजरातमधील पोरबंदर येथे एका सुसंस्कृत व प्रतिष्ठित कुटुंबात झाला.गांधींनी स्वत:. हिंदू लोकांच्या काही सवलती काढून घेणारे अपमानकारक बिल तेथील विधिमंडळात १८९४ मध्ये आले. गांधी त्या वेळी आफ्रिका सोडून स्वदेशी परतणार होते. परंतु आयत्या वेळी परत येण्याचा बेत रहित करून तेथेच राहून लढा देण्याचा संकल्प त्यांनी सोडला. नाताळ इंडियन काँग्रेस नावाची संस्था त्याकरिता स्थापन केली. सार्वजनिक फंडातील पैसा न घेता वकिली सुरू करून अगदी साधी राहणी अवलंबिली. इंडियन ओपिनियन हे वृत्तपत्र सुरू केले. सार्वजनिक फंड आंदोलनाकरिता गोळा होत असे; त्याचा पूर्ण चोख हिशोब प्रतिमास सादर करण्याची प्रथा ठेवली. मजुरांवर तेथे राहण्याबद्दल जादा कर देण्याचे विधेयक विधिमंडळापुढे मान्य झाले होते. याविरूद्ध त्यांनी मोठी चळवळ केली. गोरे लोक त्यामुळे त्यांच्यावर खूप चवताळले होते. याच सुमारास १८९६ च्या जून महिन्यात गांधी भारतीयांना तेथील परिस्थिती समजावून सांगण्याकरिता तात्पुरते भारतास परतले. काही महिने भारतात राहून येथील वृत्तपत्रांत तेथील परिस्थितीबद्दल हृदयविदारक हकीकती त्यांनी प्रसिद्ध केल्या व दक्षिण आफ्रिकेत ते पुन्हा गेले. याच सुमारास बोअर युद्ध सुरू झाले. त्यात गांधीजींनी हिंदी लोकांचे शुश्रूषा पथक तयार करून दोन्ही बाजूंच्या गोऱ्या जखमी सैनिकांची सेवा केली. बोअर युद्धानंतर गांधींनी भारताला भेट दिली.

         एवढे बोलून मी माझे बोलणे समाप्त करतो जय हिंद जय भारत 

भाषण क्र 6

   अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकराविषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

      स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ, समाजसुधारक, पत्रकार, वकील, दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणास्थान आणि भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. १४ एप्रिल १८९१ रोजी बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या

         एवढे बोलून मी माझे बोलणे समाप्त करतो जय हिंद जय भारत 

भाषण क्र 7

   अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकराविषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

         भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. प्रचंड बुद्धिमत्ता, समाजासाठी असीम त्याग करणारे, दलित समाजाला हक्क मिळवून देणारे, महाडचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे दहन, मंदिर सत्याग्रह, शेतकऱ्यांचा कैवारी, गोलमेज परिषद, पुणे करार, स्वतंत्र मजूर पक्ष, बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना, दलित शिक्षण संस्थेची स्थापना, पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना, महिलांसाठी कार्य, स्वातंत्र्य लढ्यात सहभाग अशा कितीतरी गोष्टी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनात केल्या. समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. समाजामधील तळागाळातील व्यक्तींचा प्रामुख्याने विचार केला. शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्र दिला.

         एवढे बोलून मी माझे बोलणे समाप्त करतो जय हिंद जय भारत 

भाषण क्र 8

    अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकराविषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

         भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. मध्य प्रदेशातील महू येथे  झाला. बाबासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव भीमाबाई असे होते. मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, सातारा असे वास्तव्य करीत आंबेडकरांचे कुटुंब मुंबईत राहण्यास आले. बाबासाहेबांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील सरकारी शाळेत घेतले. बाबासाहेबांनी शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट सोसले. वयाच्या १४-१५ वर्षी बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झाला. बाबासाहेब आपल्या शालेय जीवनात १८ तास अभ्यास करत असत.

         एवढे बोलून मी माझे बोलणे समाप्त करतो जय हिंद जय भारत 

  भाषण क्र 9

     अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकराविषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

         मित्रांनो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आईचे नाव भिमाबाई होते. बाबासाहेबांचा जन्म १४ तारखेला होणे व वंशामध्ये १४ वे पुत्र वडीलांना होणे ही एक मोठी आश्चर्य व संयोगाची गोष्ट आहे. जेव्हा ते शाळेत जाऊ लागले होते. तेव्हा त्या शाळेतील विद्यार्थी दुरदुर बसायचे कारण बाबासाहेब हे महार जातीचे होते अगोदर महार ह्या जातीला शुद्र समजले जात होते.

      त्यांच्या अंगाला चुकून हात लागला तर ते आबोळ करायचे. पण बाबासाहेबांनी ते निमुटपणे सहन केले. ब्राम्हण शिक्षक सुद्धा त्यांना शाळेत बसू देत नव्हते एकदा यांनी शाळेच्या खिडकी जवळून मास्तर काय शिकवित हे बघून अभ्यास केला. त्यांनी आपल्या वडीलांना विचारले. आमच्या चरी रामायण ग्रंथ आहे. महाराभारत आहे तुम्ही ते वाचत राहात, मग हे लोक विटाळ का मानतात? रामजीच्या प्रश्न पडला की पोराला कसं समजाववे? भिमराव आता हुशार झाला होता. मित्रांनो एवढा मोठा आपमान त्यांनी सहन केला.

         एवढे बोलून मी माझे बोलणे समाप्त करतो जय हिंद जय भारत 

भाषण क्र 10 

     अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकराविषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ मध्ये मध्यप्रदेशातील महू या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव भिमाबाई व वडिलांचे नाव रामजी हे होते . भिमराव रामजी आंबेडकर असे त्यांचे पूर्ण नाव होते. डॉ बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून खूप हुशार व महत्वाकांक्षी विचारांचे होते. त्यांना शालेय शिक्षण घेताना "अस्पृश्य' म्हणून मानहानी स्विकारावी लागली. पण ते मुळीच खचले नाहीत, त्यांनी अस्पृश्य दीन दलितांचा उध्दार हे जीवनाचे अंतिम ध्येय ठेवले.

       एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत.

भाषण क्र 11

  अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने शाहिद भगत सिंग यांच्या विषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

    देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील थोर क्रांतिकारक भगत सिंह यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ साली पंजाब प्रांतातील ल्यालपूर जिल्ह्याच्या  बंगा गावात झाला. त्यांचे संपूर्ण कुटुंब भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढा देत होते. त्यामुळे त्यांचा जन्म एकाप्रकारे क्रांतिकारी कुटुंबातच झाला होता असे म्हणता येईल. घरातील देशभक्तीमय वातावरणामुळे देशाच्या स्वातंत्र्या प्रती भाव भगत सिंग यांच्या मनात लहानपणा पासूनच होता.  भगत सिंग यांच्या जन्माच्या वेळी त्यांचे वडिल सरदार किशन सिंग तुरुंगात कैद होते. तसेच, त्यांच्या आईचे नाव विद्यावती होतं.

       एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत...

भाषण क्र 12

    अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने शाहिद भगत सिंग यांच्या विषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

    भगतसिंह यांचा जन्म 27 सप्टेंबर 1907 रोजी लीलापूर जिल्ह्यातील बंगा येथे किशन सिंह आणि विद्यावती येथे झाला. भारतीय राष्ट्रवादी चळवळीतील भगत सिंग यांना सर्वात प्रभावी क्रांतिकारक मानले जाते. त्यांनी अनेक क्रांतिकारी संघटनांसह सामील होऊन भारतीय राष्ट्रीय चळवळीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. 23 वर्षांच्या वयातच शहीद झाला. 23 मार्च 1 9 31 रोजी त्यांच्या फाशीनंतर भगतसिंहच्या अनुयायांनी व अनुयायांनी त्यांना “शहीद” म्हणून स्वीकारले. त्याच्या शहाणपणाचा परिणाम असा आहे की आजच्या काळात भारत हा स्वतंत्र राष्ट्र आहे

             एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत...

भाषण क्र 13

      अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने शाहिद भगत सिंग यांच्या विषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

        भगतसिंह यांचा जन्म 27 सप्टेंबर 1 9 07 रोजी लयालपूर जिल्ह्यातील बंगा येथे (आता पाकिस्तान) किशन सिंह आणि विद्यावती येथे झाला. त्याच्या जन्माच्या वेळी, त्यांचे वडील किशन सिंग, काका अजित आणि स्वरन सिंह 1 9 06 मध्ये लागू झालेल्या कॉलोनिझेशन विधेयकाच्या विरोधात निदर्शनास आले होते. त्यांचे काका सरदार अजित सिंह हे चळवळीचे समर्थक होते आणि इंडियन पॅट्रियट्स असोसिएशनची स्थापना केली. . चिनाब नहर कॉलनी विधेयकाच्या विरोधात शेतकरी संघटनेत त्यांचा मित्र सईद हैदर रझा यांनी त्यांना सहकार्य केले. अजित सिंग यांच्याविरोधात 22 प्रकरणे होती आणि त्यांना इराणला पळण्यासाठी भाग पाडण्यात आले. त्यांचे कुटुंब गदर पार्टीचे समर्थक होते आणि घरात राजकीयदृष्ट्या जागरूक वातावरणात तरुण भगतसिंहांच्या मनात देशभक्तीची भावना उत्पन्न करण्यास मदत झाली.

             एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत...

भाषण क्र 14

      अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

       आपला देश भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारी आणि विचारवंतांनी आपले जीवन समर्पित केले. यापैकीच एक होते लोकमान्य टिळक. टिळकांना भारताच्या स्वतंत्र लढ्यातील एक प्रमुख पात्र म्हणून ओळखले जाते. दरवर्षी शाळा-कॉलेज मध्ये 1 ऑगस्ट ला लोकमान्य टिळक पुण्यतिथि निमित्त लोकमान्य टिळक भाषणाचे आयोजन केले जाते. 

             एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत...

भाषण क्र 15

      अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

       स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी सिंहगर्जना करणारे बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलाई 1856 रोजी महाराष्ट्र राज्यातल्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. टिळकांचे लहान पणाचे नाव केशव असे होते. केशव ही टिळक घराण्याची कुलदेवता होती म्हणून केशव असे नाव ठेवले. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. लहानपणापासून देशप्रेमाची भावना त्यांच्यात भरलेली होती. टिळकांचे प्राथमिक शिक्षण मराठीतूनच झाले. प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पुढील शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आले. पुण्याच्या डेक्कन कॉलेजमधून त्यांनी बॅचलर ची पदवी मिळवली. टिळक लहानपणापासून बुद्धिमान होते त्यांची स्मरणशक्ती ही चांगली होती. टिळक लहान असतानाच त्यांचा आई वारल्या व सोळा वर्षाचे असतानाच त्यांच्या वडिलांचा सुद्धा मृत्यू झाला. गणित व संस्कृत हे टिळकांचे आवडते विषय होते. डेक्कन कॉलेजमध्ये असतानाच टिळकांची मैत्री गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी झाली. या मैत्रीच्या मदतीनेच त्यांनी सामाजिक क्षेत्रात सुद्धा काम केले. सन 1880 मध्ये त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि टिळकांचे सामाजिक जीवन एक शिक्षक आणि शिक्षण संस्थेचे संस्थापक या पद्धतीने सुरू झाले. 1885 मध्ये त्यांनी फर्ग्युसन कॉलेज सुरू केले व यात कोणताही पगार न घेत ते काम करू लागले.

     एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत...

भाषण क्र 16

    अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने लोकमान्य टिळक यांच्या विषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

  “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” असे इंग्रजांना अतिशय धाडसाने आणि आत्मविश्वासाने सांगणारे व्यक्तिमत्त्व म्हणजेच लोकमान्य टिळक. 

       भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांचे पूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचे जन्मनाव नाव केशव ठेवण्यात आले होते. पण सर्वजण त्यांना लाडाने ‘बाळ’ म्हणत. त्यामुळे मोठे झाल्यावर बाळ गंगाधर टिळक हेच नाव त्यांना पडले. टिळकांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई असे होते. 

        टिळक लहानपणापासूनच अतिशय हुशार आणि तल्लख बुद्धीचे होते. गणित आणि संस्कृत हे त्यांचे आवडीचे विषय होते. ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या उक्तीप्रमाणेच लहानपणापासूनच या तेजस्वी सूर्याचे तेज चमकू लागले आणि या तेजात सर्वांचेच डोळे दिपून जाऊ लागले. गणितामध्ये तर टिळकांचा कोणी हातच धरूच शकत नव्हते. एकदा गुरुजी वर्गात गणित शिकवत होते. सर्व मुलांनी दिलेली उदाहरणे वहीमध्ये लिहिली अन् सोडवायला सुरूवात केली. टिळकांनी मात्र एकही उदाहरण वहीमध्ये लिहिले नव्हते. गुरुजींनी टिळकांना विचारले तेव्हा वहीमध्ये न लिहिता टिळकांनी सर्व उदाहरणे उत्तरासहित व योग्यक्रमाने अचूक सांगितली. टिळकांची ही कुशाग्र बुद्धी व स्मरणशक्ती पाहून गुरुजींनासुद्धा खूप आश्चर्य वाटले. 

             एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत...

भाषण क्र 17

     अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या विषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

  सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म 31 ऑक्टोबर 1875 रोजी गुजरातच्या नाडियाड येथे एक जमींदार कुटुंबात झाला. ते त्यांचे वडील झावरभाई पटेल आणि आई लाडबाई यांचे चौथे पुत्र होते. त्याचे वडील एक शेतकरी होते, तर आई एक आध्यात्मिक आणि धार्मिक स्त्री होती. आम्हाला सांगू की त्यांचे तीन मोठे भाऊ नरसीभाई, विठ्ठलभाई आणि सोमाभाई पटेल आणि दहीबा पटेल अशी एक बहिण होती.

             एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत...

भाषण क्र 18

     अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या विषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

  सरदार वल्लभभाई पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक वरिष्ठ नेता होते आणि भारतीय गणराज्य स्थापन करणाऱ्या मधून एक होते. वल्लभभाई झावेरभाई पटेल यांचा जन्म ३१ ऑक्टोंबर १८७५ मदे नाडियाद, गुजरात मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव झावेरभाई आणि आईचे नाव लाढबाई होते.

     वल्लभभाई पटेल यांचे वडील झावेरभाई हे एक शेतकरी होते त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धामध्ये झाशी च्या राणी च्या सेनेमध्ये कार्य केले होते. सरदार पटेल ने आपले सुरुवातीचे शिक्षण आपल्या स्थानिक शाळेमधून आपल्या वडिलांबरोबर शेतीचे काम करत पूर्ण केले होते. सरदार पटेल लहानपणापासूनच एक बुद्धिमान, सहाशी आणि दृढ संकल्प ठेवणारे माणूस होते. ते नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असे. ह्याच गुणांमुळे त्यांना वकील बनायचे होते.पैशांची कमी असूनही सरदार वल्लभभाई पटेल यांनी आपल्या मित्रांकडून पुस्तके मागून वकिलीचा अभ्यास केला आणि जिल्हा वकिलीची परीक्षा ते पास झाले. त्यांनी गोधरा, गुजरात मध्ये आपली वकिली करायला सुरुवात केली. १९०२ मध्ये ते वलसाड येथे आले आणि जिल्हा मुख्यालय मध्ये यशस्वीपणे आठ वर्ष गुन्हेगारीवर वकिली केली जेणेकरून त्यांनी आपल्या परिवाराला आर्थिक रुपाने स्थिर केले.

             एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत...

भाषण क्र 19

     अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

   महान लेखक, विचारवंत आणि कुशल राजकारणी जवाहरलाल नेहरू यांचा जन्म 14 नोव्हेंबर 1889 रोजी काश्मिरी ब्राह्मण कुटुंबात अलाहाबाद येथे झाला. पंडित नेहरूंच्या वडिलांचे नाव पंडित मोतीलाल नेहरू होते, जे एक प्रसिद्ध बॅरिस्टर आणि समाजसेवक होते आणि त्यांच्या आईचे नाव श्रीमती. जो काश्मिरी ब्राह्मण कुटुंबातील होता.

      जवाहरलाल नेहरूंना तीन भावंडे होती ज्यात नेहरू सर्वात मोठे होते. नेहरूंच्या मोठ्या बहिणीचे नाव विजया लक्ष्मी होते, जे नंतर संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या, तर त्यांच्या धाकट्या बहिणीचे नाव कृष्णा हाथीसिंग होते, जे एक चांगले आणि प्रभावी लेखक होते. भाऊ पंडित नेहरू यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारी अनेक पुस्तकेही त्यांनी लिहिली होती

             एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत...

भाषण क्र 20

      अध्यक्ष महोदय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बाल-मित्रांनो आज मी तुमच्यासमोर 15 ऑगस्ट दिन हा  75 वा स्वतंत्र दिन अर्थात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विषयी माहिती सांगणार आहे. आपणास विनंती की शांततेने ऐकून सहकार्य व प्रोत्साहन द्यावे .

    स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचा मान पंडित जवाहरलाल नेहरू यांना मिळला. देशाच्या स्वातंत्र्यलढय़ात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. त्यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवणीद्वारे घेतले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरीता गेले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत.

      एवढे बोलून मी माझे भाषण संपवितो जय हिंद जय भारत...

✍️ श्री सुनिल एन राठोड मुरूम

Post a Comment

0 Comments