नव्या पुस्तकाचे स्वागत करूयात , प्रत्येक शिक्षकांनी वाचले पाहिजे असे पुस्तके

 नव्या पुस्तकाचे स्वागत करूयात , प्रत्येक शिक्षकांनी वाचले पाहिजे असे पुस्तके

शाब्बास गुरुजी 



      शाब्बास गुरुजी हे पुस्तक राजेंद्र दिघे यांच्या या लेखसंग्रहात जिल्हा परिषदेच्या शाळांसह विविध शाळांमधील वेगवेगळ्या उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे . ' सकाळ'च्या नाशिक आवृत्तीत प्रसिद्ध होणाऱ्या सदरातील लेखांचे हे संकलन असून , प्रत्येक लेखामध्ये दिघे यांनी उपक्रमशील शिक्षक आणि त्यांच्या विविध उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना कसा फायदा झाला , तसेच शिक्षणाची गंगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहचली यावर भर दिला आहे . नाशिक जिल्ह्यातील कर्तबगार शिक्षकांची कामगिरी नेमकी कशी होती , अडचणीतून त्यांनी मार्ग कसा काढला , तसेच लोकसहभाग घेऊन शाळांचा कायापालट कसा केला ते यातील लेखांतून कळते . 


प्रकाशक : चपराक प्रकाशक ( ७०५७२ ९ २० ९ २ ) पृष्ठं : १७६ मूल्य : २५० रुपये


ऋणानुबंध 



ऋणानुबंध हे पुस्तक शशी भालेकर यांनी त्यांच्या आयुष्यात आलेल्या विविध व्यक्तींचा त्यांच्यावर कसा प्रभाव पडला , त्यांचे आयुष्य या व्यक्तींमुळे कसे बदलले याविषयी लिहिले आहे . यातील माणसे अत्यंत दिग्गज अशी आहेत . दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे , ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांच्याशी भालेकरांचा संबंध आला होता . वेगवेगळ्या कारणांनी या दिग्गजांशी त्यांची जी भेट झाली त्यातून त्यांना काय शिकता आले ते त्यांनी यामध्ये नेमकेपणाने मांडले आहे . कमाल आमरोही , आचार्य अत्रे , जयवंत दळवी यांच्याबद्दलही त्यांनी ओलाव्याने लिहिले आहेत 


. प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन , पालघर ( ९ ८२०७४८०८१ ) पृष्ठं : १२० मूल्य : २०० रुपये


मूल्यत्रयीची कविता 

   मूल्यत्रयीची कविता हे पुस्तक विश्वास वसेकर यांच्या या काव्यसंग्रहात सामाजिक संदर्भाच्या कविता आहेत . स्वातंत्र्य , समता आणि बंधुभाव या तीन गोष्टी त्यांच्या कवितेतून सातत्याने प्रकट होतात . यातील सर्वच कविता नवीन नाहीत . नव्या कवितांबरोबरच पूर्वीच्या त्यांच्या काही संग्रहांमधील निवडक कविता येथे आहेत . या काव्यसंग्रहातील ' पसायदान ' ही कविता आवर्जून वाचलीच पाहिजे अशी आहेत . त्याचबरोबर इथे दिलेली दोन परिशिष्टं वसेकरांबद्दल आणि त्यांच्या साहित्याबद्दल तपशीलवार माहिती देतात . 


प्रकाशक : संस्कृती प्रकाशन , पुणे ( ०२०-२४४९ ७३४३ , ९ ८२३०६८२ ९ २ ) पृष्ठं : १७६ मूल्य : २०० रुपये


इमोझील 

     

      इमोझील हे पुस्तक कोरोना या महासाथीच्या काळात अनेकांचे आयुष्य बदलले . प्रचंड नैराश्य यावे अशी परिस्थिती या कालावधीत निर्माण झाली होती . या काळातील कथा या संग्रहात आहेत . डॉ . महेश अभ्यंकर आणि मनोविकास सल्लागार आरती भार्ज यांनी कोरोनाच्या काळात केलेल्या समुपदेशनावर आधारित या कथा आहेत . या कथांमधील पात्रांमधून वाचकाला जगण्याची उमेद मिळेलच ; पण नवनिर्माण करण्याची शक्ती आपल्याकडे आहे याची जाणीव होईल असा विश्वास या दोन्ही लेखकांना आहेत . त्याचा अनुभव यातील कथा वाचताना येतो . 

प्रकाशक : रोहन प्रकाशन , पुणे ( ०२०-२४४८८०८६ , ९ ६१ ९ ४५४२०१ ) पृष्ठं : १०४ मूल्य : २५० रुपये

गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा 


     गोवा आणि महाराष्ट्रातील पत्रकारितेतल्या कथा हे पुस्तक  ज्येष्ठ पत्रकार कामील पारखे यांनी आपल्या राज्यात आणि गोव्यात पत्रकारिता केली . इंग्रजीत पत्रकारिता केलेल्या पारखे यांनी वेगवेगळ्या निमित्ताने मराठीतूनही लेखन केले . पत्रकारितेत वेगवेगळ्या बीटवर काम करताना अनेक विलक्षण अनुभव त्यांना आले . अनेक नेत्यांशी त्यांचा जवळून संपर्क आला . या नेत्यांबद्दलचे विविध अनुभव त्यांच्या गाठी जमा आहेत . एखाद्या वेगळ्या विषयावरील बातमी देताना त्या घटनेभोवतीचे सारे कंगोरे त्यांना तपासून पाहता आले . हेच सारे अनुभव त्यांनी यातील २ ९ प्रकरणांमध्ये लिहिले आहेत . अभिनेत्री ललिता पवार यांच्यापासून ते पूल कोसळण्याच्या घटनांपर्यंत विविध संदर्भ यातून वाचकांच्या समोर येतात .


 प्रकाशक : चेतक बुक्स , पुणे ( ०२०-२४४५०४२४ , ८४०७ ९ ४०३७३ ) पृष्ठं : १८४ मूल्य : ३०० रुपये 


बाबासाहेबांची पत्रकारिता  


     बाबासाहेबांची पत्रकारिता या पुस्तकात राज्यघटनेचे शिल्पकार डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी विविध क्षेत्रांत व्यापक स्वरूपाचे काम केले . विद्यावाचस्पती विद्यानंद यांनी या पुस्तकात बाबासाहेबांच्या पत्रकारितेचा वेध घेतला आहे . बाबासाहेबांनी मूकनायक , प्रबुद्ध भारत , यासह चार नियतकालिकांमार्फत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला . या नियतकालिकांमधून बाबासाहेबांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करणारे लेख लिहिले . बाबासाहेबांच्या या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेले लेख आजही समाजाला मार्गदर्शक असे आहेत . विद्यानंद यांनी या सर्व नियतकालिकांची आणि बाबासाहेबांनी त्यामध्ये कोणते विषय मांडले होते याची माहिती दिली आहे . काही दुर्मीळ छायाचित्रांचाही पुस्तकात समावेश केला आहे . 


प्रकाशक : घेरा पानवडी फाउंडेशन , पुणे ( ९ ३७१११०८०४ ) पृष्ठं : ८० मूल्य : १५० रुपये


◆ कथा त्यांच्या वक्तृत्वाची




      कथा त्यांच्या वक्तृत्वाची या पुस्तकात प्र . के . अत्रे , पु . ल . देशपांडे , बाबासाहेब पुरंदरे , शिवाजीराव भोसले आणि राम शेवाळकर ही पाचही बुलंद माणसे आज आपल्यात नाहीत . त्यांचे साहित्य अजरामर आहे . या पाच साहित्यिकांमध्ये एक समान मुद्दा होता , तो म्हणजे त्यांचे अफाट वक्तृत्व . प्रत्येकाची वक्तृत्वशैली अत्यंत वेगळी . मुद्दा मांडण्याची हातोटी स्वतंत्र . भाषेवरचे प्रभुत्व अफाट ; पण शब्दांचा वापर करण्याची प्रत्येकाची रीत निराळी . वाणीच्या या उपासकांनी सरस्वतीच्या आशीर्वादाने अनेक श्रोत्यांना वर्षानुवर्षे मंत्रमुग्ध केले . या पाच नामवंतांच्या वक्तृत्वशैलीचा आणि विविध ठिकाणची व्याख्याने देताना त्यांना आलेल्या विविध अनुभवांबद्दल प्रा . मिलिंद जोशी यांनी या पुस्तकात लेखन केले आहे . त्यांच्या लेखनातून या पाच माणसांचे वक्तृत्व किती उंचीचे होते याची नेमकी कल्पना येते . 


प्रकाशक : राजहंस प्रकाशन , पुणे ( ०२०-२४४७३४५९ ) पृष्ठं : १२८ मूल्य : १६० रुपये


शरीर



      शरीर  या पुस्तकात आपले शरीर अनेक आघात सहन करीत असते . मात्र त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने हेच शरीर मातही करते . वैद्यकीय भाषेत शरीराचे वर्णन सविस्तर केलेले असले , तरी सामान्य माणसाला हे शरीर म्हणजे काय हे नेमकेपणाने माहीत नसते . अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे या दोघांनी या पुस्तकातून आपले शरीर म्हणजे काय , हेच सोप्या भाषेत समजावून दिले आहे . इतिहासातील , पुराण काळातील विविध उदाहरणे देत मात्र कुठेही जड शब्द किंवा आकडेवारीची रूक्ष जंत्री न देता आपले शरीर म्हणजे केवळ रक्त , मांस आणि विविध अवयव यांचे कपाट नसून त्याचा परस्परसंबंध उलगडून देत महत्त्वपूर्ण माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे . 


प्रकाशक : मनोविकास प्रकाशन , पुणे ( ०२०-२९ ८०६६६५ ) पृष्ठं : ५६४ मूल्य : ४२५ रुपये


संकलन श्री सुनिल नरसिंग राठोड 

Post a Comment

0 Comments