आता डोळे नसणाऱ्यांनाही दृष्टी मिळणार ! कृत्रिम डोळे , बायोनिक आय च्या माध्यमातून ...जाणून घेऊ

 




आता डोळे नसणाऱ्यांनाही दृष्टी मिळणार ! कृत्रिम डोळे , बायोनिक आय च्या माध्यमातून ...जाणून घेऊ 

       आपण जाणतोच की डोळा ही निसर्गाने मानवाला देलेली एक देणगीच आहे . काही अपवाद वगळता जवळपास बहूतांश प्राण्यांना डोळा हा सुंदर अवयव आहे व थोड्याफार बदलासह सर्व प्राण्यांमध्ये जवळपास सारखीच रचना आहे . डोळा हा मानवाच्या सर्वात महत्वाच्या अवयवांपैकी एक अवयव आहे . जवळपास ८० टक्के पेक्षा जास्त ज्ञान आपल्याला डोळ्यांद्वारे मिळते . यावरूनच याचे महत्व आपल्याला लक्षात आले असेल . 





         जागतिक स्तरावर विचार केला असता आज ३ कोटी पेक्षा जास्त व्यक्ती दृष्टिहीन आहेत तर १०० कोटी पेक्षा जास्त लोकांना दृष्टिदोष आढळून येतो . याच डोळ्याद्वारे मेंदूला संदेश कारणामुळे शास्त्रज्ञ मानवी डोळ्यावर अहोरात्र संशोधन करत आहेत . या संशोधनाचाच एक भाग म्हणजेच कृत्रिम दृष्टी . जी साकारली आहे बायोनिक आय ने . जे की एक वरदानच आहे.

       कृत्रिम डोळा म्हणजेच बायोनिक आय ( Bionic Eye ) अशा दृष्टिहिनांसाठी आशेचा किरण आहे . ज्यांची काही कारणाने दृष्टी नाहिशी झाली किंवा अंधत्व आले . अश्या व्यक्तिंना बायोनिक आय च्या साहाय्याने पून्हा दृष्टी प्राप्त करून देता येते . मानवी शरीरातील एखाद्या मूळ अवयवा ऐवजी एखादा इलेक्ट्रॉनिक किंवा यांत्रिक अवयव बसविणे म्हणजेच बायोनिक तंत्रज्ञान होय असे विज्ञानाच्या भाषेत म्हणतात.




       जागतिक लेवलचे संशोधक अनेक वर्षापासून मानवासाठी बायोनिक अवयव बनविण्यासाठी प्रयत्नरत आहेत . याचा एक भाग म्हणून मानवाचा सर्वात नाजूक व गुंतागुंतीचा असलेला अवयव डोळा तयार करण्यात संशोध कांना यश आले आहे . यामध्ये संपूर्ण डोळा न बदलता एका संगणकाच्या चिपच्या मदतीने संशोधकांनी बायोनिक डोळा विकसित करण्यात यश मिळविले आहे . जे की आता मानवाला याचा खूप उपयोग होईल. 

       यात आणखीन विस्ताराने समजून घेण्यासाठी आपण बायोनिक आय यालाच बायोइलेक्ट्रॉनिक आय असे सुद्धा म्हणतात . हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे , जे डोळ्याचे अंशता वा पूर्ण कार्य करते . हे तंत्रज्ञान याच्या सुरूवातीच्या विकसित अवस्थेत आहे . याच्या साहाय्याने प्रकाशाची जाणीव मेंदूला होण्यास मदत झाली आहे . यावर संशोधन करून याला अधिक विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे . जे की आता जवळपास 100 टक्के साकार होण्याच्या मार्गावर आहे.



         सायन्स आपल्याला सांगतो की डोळा स्वतः चित्र बघत नाही तर त्याच्या समोरच्या वस्तूवरील प्रकाशाचे संदेश तो मेंदूला देतो व मेंदू त्या चित्राची ओळख पटवितो . म्हणजे डोळा हे फक्त मेंदूपर्यंत संदेश पोहचविण्याचे माध्यम आहे , हेच काम ही चिप करते . - एखाद्या वस्तूवर प्रकाशकिरण पडल्यानंतर ते डोळ्यात शिरून दृष्टिपटलावर पडते . दृष्टिपटल हे प्रकाशसंवेदी पेशींचे बनलेले असते . कोट्यावधिच्या संख्येने असणाऱ्या शंक्वाकार पेशी रंगाला तर दंडाकार पेशी प्रकाशाला प्रतिसाद देतात . दृष्टिपटलावर आलेल्या किरणाद्वारे त्यावर वस्तूची उलटी प्रतिमा तयार होते . दृष्टिपटल चेतासंस्थेद्वारे मेंदूला विद्युत संदेश पाठवितो आणि मेंदूला ज्ञात झालेली वस्तू आपल्याला दिसते . आहे की नाही आश्चर्य !




       आता अंधत्व असणाऱ्या बऱ्याच व्यक्तिंच्या डोळ्यातील शंक्वाकार व दंडाकार पेशी अकार्यक्षम असतात . काही वेळा फक्त दृष्टिपटल सुरळीत कार्य करत नसल्यानेही अंधत्व येते परंतु इतर भाग कार्यक्षम असतात . म्हातार वयात हे प्रमाण जास्त करून आढळते . ज्यामुळे प्रकाश संवेदना मेंदूकडे पाठविल्या जात नाहीत . त्यामुळे अंधत्व येते .म्हणजे आपली दृष्टी कमजोर होत जाऊन पुढे पुढे दिसेनासे होते.

         कृत्रिम डोळे म्हणजेच बायोनिक आय प्रकाशसंवेदी पेशींना उत्तेजित करते . यामध्ये एक सुक्ष्म अशी संगणकीय चीप शस्त्रक्रियेद्वारे डोळ्याच्या मागे दृष्टिपटलाच्या पिशवीत बसविली जाते . डोळ्यावर लावलेल्या चश्म्यावर एक कॅमेरा लावलेला असतो जो प्रकाश ग्रहन करून या चिपला संदेश पाठवितो . ही चीप प्रकाश संवेदना ग्रहन करून विद्युत तरंगामध्ये परावर्तीत करते व मेंदूकडे पाठविते ज्यामुळे मेंदूला चित्राचे ज्ञान होते . आणि आणि आपण पाहतो . 



       पण सध्या ही प्रक्रिया अधिक खर्चिक व अचूक नसली तरी भविष्यात यावर संशोधनाला भरपूर वाव आहे . आज याद्वारे प्राप्त असलेले चित्रे हे हुबेहुब नसले तरी प्रकाशाच्या तिव्रतेच्या फरकाची जाणीव , हालचाल , वस्तूंचे आकार व वस्तूचे अस्थित्व समजण्यात हे तंत्रज्ञान यशस्वी झाले आहे , व भविष्यात याच्याच विकसित रूपात कृत्रिम दृष्टि देणारा हुबेहूब मानवी डोळा पाहायला मिळेल हे मात्र नक्कीच आपण येणाऱ्या पाच दहा वर्षात नक्कीच अचिव्हमेंट करू शकतो.


✍️श्री सुनिल नरसिंग राठोड,


Post a Comment

0 Comments