सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी! सरकारी कर्मचारी होणार पुन्हा मालामाल ! सरकार मोठा निर्णय घेण्याचा तयारीत ?

 





सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!

सरकारी कर्मचारी होणार मालामाल..?

 सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..?

       आपण जाणतोच की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात नुकतीच 3 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) 34 टक्क्यांवर पोचलाय. त्यानंतर आता मोदी सरकार कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे समजते…ते काय आहे पुढे पाहुयात 

       परंतु गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कर्मचाऱ्यांकडून एक मागणी केली जातेय.. ती म्हणजे, ‘फिटमेंट फॅक्टर’..! केंद्रीय कर्मचाऱ्यांचा ‘फिटमेंट फॅक्टर’ वाढवण्यासाठी सरकारवर दबाव वाढत आहे. किमान मूळ वेतन (Basic Salary) 18 हजारांवरुन 26 हजार रुपये, तर ‘फिटमेंट फॅक्टर’ 2.57 वरून 3.68 पट करण्याची मागणी होत आहे. जे की साहजिक आहेच. काही दिवसांपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ झालीय. आता कर्मचाऱ्याच्या ‘फिटमेंट फॅक्टर’साठी सुरु असलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळणार असल्याची चर्चा आहे.. त्याआधी ‘फिटमेंट फॅक्टर’ म्हणजे नेमकं काय, याबाबत समजून घेऊ यात जसे की पुढे जाणून घेऊयात.

‘फिटमेंट फॅक्टर’ म्हणजे काय हे समजून घेऊ..

    केंद्रीय कर्मचार्‍यांच्या मूळ पगाराचे ‘कॅल्क्युलेशन’ हे सातव्या वेतन आयोगाच्या ‘फिटमेंट फॅक्टर’नुसार केले जाते. जसेच्या तसेच राज्य कर्मचाऱ्यांना सुद्धा  सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, सध्या ‘फिटमेंट फॅक्टर’ 2.57 आहे. सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर, सहाव्या वेतन आयोगाच्या वेतन बँडमध्ये ग्रेड-पे जोडून मूळ वेतन करण्यात आले. त्यात सध्याचा एंट्री लेव्हलचा पगार हा ‘फिटमेंट फॅक्टर’ 2.57 ने गुणाकार करून ठरवला होता. आता यात कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार मूळ वेतनात वाढ करण्यासह सरकारने ‘फिटमेंट फॅक्टर’ फॉर्म्युलामध्ये बदल केल्यास, पगारात एकाच वेळी मोठी वाढ होईल. सध्याचा ‘फिटमेंट फॅक्टर’ फॉर्म्युला 2.57 इतका आहे. त्यात वाढ झाल्यास तो 3.68 पट होईल. असे वर्तविले जात आहे जे की खरे आहे.

या वाढीनंतर किती पगार हातात येईल..?

सध्या किमान वेतन 18 हजार रुपये आहे. ‘फिटमेंट फॉर्म्युला’ 2.57 नुसार कर्मचाऱ्यांची ‘स्टार्टिंग सॅलरी’ 46 हजार 260 रुपये होते. मूळ पगार दरमहा 26 हजार रुपये झाला नि नवीन ‘फिटमेंट फॅक्टर’ वापरल्यास एकूण पगार 26 हजार रुपयांच्या 3.68 पट होईल. म्हणजेच तुम्हाला प्रत्येक महिन्याला 95 हजार 680 रुपये पगार मिळेल म्हणजे भक्कम वाढ आणि कर्मचारी मालामाल होण्याची चिन्हे दिसत आहेत.याच दरम्यान फिटमेंट फॉर्म्युला वाढिबरोबर आणखीन एका भत्त्यात वाढ होईल ते म्हणजे HRA म्हणजेच घरभाडे भत्त्यात सुद्धा मोठी वाढ होणार असल्याचे समजते , असे झाल्यास एकूण पगारात खूप मोठी वाढ होणार आहे...

       



Post a Comment

0 Comments