संकलित मूल्यमापन भारांशमध्ये कोणत्या प्रकारच्या प्रश्नाला किती टक्के भारांश द्यावा ....
👉सर्वप्रथम जाणून घेऊ की संकलित मूल्यमापनाची आवश्यकता का आहे?
- विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या विषयातील समज आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी याचा वापर केला जातो.
- जीवन कौशल्यात विकास झाला की नाही हे यातून पडताळून पाहता येते .
- विद्यार्थ्यांना चांगली सवय लागण्याच्या दृष्टीने याचा वापर होतो .
- अशाप्रकारचे बदल झाले की नाही हे पाहण्यासाठी वर्षातून दोन वेळा संकलित मूल्यमापन करणे आवश्यक आहे.
👉 संकलित मूल्यमापनाचा हेतू काय आहे ?
- शैक्षणिक वर्षातील निरनिराळ्या टप्प्यावर प्रत्येक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासविषयी विखुरलेल्या माहितीमधून त्याच्या व्यक्तिमत्वाचे संकलित चित्र तयार करणे गरजेचे आहे.
- आकारिक मूल्यमापनामध्ये दिसलेली प्रगती टिकून आहे की नाही हे पडताळून पाहणे.
- व्यक्तिमत्व विकासाचे सिंहावलोकन करून पुढील अध्ययन अध्यापनाची दिशा ठरवणे, तसेच त्यामध्ये आवश्यक ते बदल करणे गरजेचे असते.
👉 संकलित मूल्यमापनाचे स्वरूप .
- कालावधी
प्रथम सत्राच्या व द्वितीय सत्राच्या अखेरीस.
- विषय
पहिली ये आठवीच्या कला ,कार्यानुभव तसेच शारीरिक शिक्षण व आरोग्य हे विषय वगळून बाकी सर्वच विषयाचे संकलित मूल्यमापन करावयाचे आहे.
👉संकलित मूल्यमापन आढावा
- शाळेतील सर्व शिक्षकांनी वर्ग पातळीवर विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापन पूर्ण करावे .
- संकलित मूल्यमापनाच्या अनुषंगाने विषयांच्या उद्दिष्टानुसार लेखी , तोंडी, प्रात्यक्षिक, प्रश्नांचा समावेश करण्यात यावा
- द्वितीय सत्राचे संकलित मूल्यमापन , तोंडी प्रात्यक्षिक वर्ग किंवा शाळास्तरावर मुख्याध्यापक यांनी योग्य नियोजन करावे .
- शासन परिपत्रक क्र संकीर्ण 2001 /प्र क्र 178/ एस डी 6 / मंत्रालय मुंबई दिनांक 24 मार्च 2022 नुसार इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांचे मूल्यमापन माहे एप्रिल महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात घेण्यात यावे व निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा..
- संकलित मूल्यमापनाच्या प्रश्नपत्रिका शाळास्तरावर काढण्यात याव्यात प्रत्येक शाळेतील त्या त्या वर्गांना शिकविणाऱ्या शिक्षकांनी विषयनिहाय , वर्गनिहाय संकलित मूल्यमापन करावे.
- संपूर्ण शिक्षण प्रक्रिया आनंददायी असणे आवश्यक आहे.
- मूल्यमापणामुळे विद्यार्थ्यांना भीती , दडपण वाटणार नाही याची काळजी घ्यावी .
- संकलित मूल्यमापनाचे वेळापत्रक वर्ग किंवा शाळा स्तरावर निश्चित करण्यात यावा .
- चाचणीचे पेपर तपासणी करून श्रेणीनिहाय गुणांकन करण्याचे नियोजन मुख्याध्यापकांनी दिनांक 30/04/2022 अखेर पूर्ण करावे.
- सर्व क्षेत्रीय अधिकारी यांनी दिनांक 01/04/2022 ते दि. 30/04/2022 अखेर आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापनाच्या अनुषंगाने शाळा भेटी कराव्यात व मार्गदर्शन करावे ....
ही माहिती pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी पुढे क्लिक
करा
0 Comments