भारतातील महत्वाच्या क्षेत्राला विकले गेले आणि नवीन योजनेच्या आहारी जाऊन वर्ल्ड बँकेकडून कर्ज घेतल्याने सर्व व्याजात पैसे जातात भारताचे?
बीजेपी च्या या दोन टर्म चा हिशोब केला तर भारताला कर्जबाजारी बनवण्याचं कांम या आताच्या सरकारने केलय
यापूर्वी सुद्धा मा मनमोहन सिंग ची सरकार होती त्यावेळेस भारतावर एकूण 55 लाख कोटी रुपयेचा कर्ज होता 😕 मा मनमोहन सिंग सरकार पडली त्यावेळेस आपल्या भारतातील प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावर 35 हजार रुपयेचा बोजा करून पडला ??? हे त्यावेळेस ची परिस्थिती होती.
त्यानंतर अब की बार मोदी सरकार च्या लाटेने सर्वकाही बरं होईल असे वाटत होतं, म्हणून जनतेने बी जे पी ला कौल दिला आणि तेंव्हापासूनच प्रत्येक नागरिकांच्या स्वप्नाला कळा लागली आणि आज आपण घर के न घाट के अशीच परिस्थिती झाली आहे . वर्ल्ड बँकेकडून मोदी सरकार इतके कर्ज काढली की आज आपल्या भारतावर विदेशी मुद्रेच जवळपास 154 लाख कोटी रुपयेचा कर्ज झालंय आणि केवळ याच्या व्याजापोटी सरकारला दरवर्षी आलेला जनतेच्या टॅक्स मधून जवळपास 35 टक्के रक्कम तर केवळ व्याजाला द्यावी लागते, आणि प्रत्येक वर्षाला 2 ते 3 टक्के वाढत आहे. म्हणजेच आज घडीला भारतातील प्रत्येक नागरिकांवर एक लाख रुपयेचा कर्ज मोदी सरकारने वाढवला असून पूर्वी 35 हजार रुपयेचा होता आता त्यात 65 हजार रुपये वाढलेत , 😡😡
खरी परिस्थिती आपल्या भारतातील पूर्वीचे चांगले नियम व योजना हे दुसऱ्याच्या सांगण्यावरून केवळ सरकारी तिजोरीवर याचा ताण पडतो म्हणून बंद करण्यात आल्या त्यात , आपली जुनी पेन्शन आहे , बी एस एन एल , सारख्या मोठ्या सरकारी कंपन्या तसेच गरीब जनतेला पूर्वी खूप मोठा आधार आणि आदर दोन्ही मिळायचे उदा सर्वच प्रकारचे सबसिडी सवलत वैगेरे या मोदी सरकारने हळूहळू बंद केली . मा अजित पवार नी खूप मोठं लंब संब गणित मांडून आलेला टॅक्स सर्व सरकारी करचार्यांच्या पेन्शन ला जाईल म्हणून काढलेला मार्ग nps dcps वगैरे सर्व महाघोटाला आहे.
आज प्रत्येक जनतेच्या डोक्यावर एक लाख रुपयेचा कर्ज आहे जे की ते नागरिक कधीच उचलले नाहीत. त्याची भरपाई हे सरकार आपल्याकडून खूप पद्धतशीर करत आहे , जसे की आज असे कोणतेच क्षेत्र नाही त्यात महागाई वाढलेली नाही , पूर्वी केंद्रात पेट्रोल वर 14 टक्के टॅक्स होता आज घडीला 32 टक्के झालाय म्हणजे केवळ एवढ्यावरच विचार केला तर केंद्राची आजची परिस्थिती ही प्रत्येक नागरिकांच्या खिशातून दंडलशाहीने पैसे वसूल करण्याची आहे यात केवळ पेट्रोल च्या माध्यमातून 1 लाख त्रेचाळीस हजार कोटी रुपयेची कात्री सरकार केवळ एका महिन्यात लावत आहे , म्हणजे वर्षाला 17 लाख 16 हजार कोटी रुपये चा टॅक्स केवळ एक पेट्रोलटून घेत आहे
जुनी पेन्शन चा खर्च टाळून ही सरकार उचललेला कर्ज फेडत आहे पण आलेला प्रचंड असा टॅक्स कुठे जात असेल , तिजोरीवर ताण पडत आहे का पाडत आहेत हे जाणून घेतले पाहिजे , नाहीतर आपण गुलामगिरीकडे 360 डिग्रीमध्ये वळत चाललो आहेत हे नक्कीच*
*याला थांबवायचं असेल तर महाक्रांती शिवाय पर्याय नाही*
✍🏻श्री सुनिल नरसिंग राठोड
0 Comments