राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आता 34 टक्के महागाई भत्ता ?

 


राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आता 34 टक्के महागाई भत्ता ?


होय पुढील आदेश वाचा .........


राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आता थेट 34 टक्के महागाई भत्ता मिळेल . होय ! राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्रात आता कर्मचार्यांना 1 जानेवारी 2022 पासून महागाई भत्ता 3% वाढवून दिला जाणार आहे..........

  

          केंद्र सरकारने या आधी 31 मार्च 2022 रोजी आदेश निर्गमित करून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 34% असा केला होता...........


आता केंद्राच्या 31 मार्च 2022 रोजी निर्गमित झालेल्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना 1 जानेवारी 2022 पासून महागाई भत्ता 34% दिला जाणार आहे...... 



           संपूर्ण आदेश काय आहेत ह्या करिता वरील माहिती संपूर्ण वाचा..केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या क्रमांक 1/2/2022-E-II (B), Government of India, Ministry of Finance Department of Expenditure, दिनांक ३१.०३.२०२२ च्या कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित.असे आदेश कार्यवाहीसाठी निर्गमित केले आहेत.


      ज्याप्रमाणे केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक ०१.०१.२०२२ पासून लागू करण्यात आलेला ३% वाढीव दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) व ज्ञापनात नमूद इतर तरतूदी लागू होतात त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील. त्यानुसार दि.०१.०१.२०२२ पासून ३४% दराने महागाई भत्ता अनुज्ञेय राहील. पण इतर राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना सुद्धा लवकरच लागू होईल यात शंका नाही. 


Post a Comment

0 Comments