1 एप्रिल हा जागतिक मूर्ख दिवस म्हणून का साजरा केला जातो ? सविस्तर जाणून घ्या .

     


    मित्रांनो आपण जाणतोच की जगात प्रत्येक दिवशी कोणता न कोणता सण साजरा केला जातो. प्रत्येक दिनाचं आपलं महत्त्व असतं आणि लोक आनंद घेत तो दिवस साजरा करतात. अशात 1 एप्रिल रोजी जागतिक मूर्ख दिवस साजरा का केला जातो? या दिवशी लोक एकमेकांची थट्टा का करतात हे जाणून घेणे मजेदार ठरेल.Fool Day 1 एप्रिल रोजी का साजरा केला जातो. यामागील ठोस कारण माहित नाही तरी वेगवेगळ्या कहाण्या आहेत. 

    


       बरेच इतिहासकारांप्रमाणे याचा इतिहास सुमारे 438 वर्ष जुना आहे. जेव्हा 1582 मध्ये फ्रान्सने ज्युलियन कॅलेंडर वगळता ग्रेगोरियन कॅलेंडर स्वीकारले त्यामुळे जूलियन दिनदर्शिकेत 1 एप्रिलपासून नवीन वर्ष सुरू होतं तर ग्रेगोरियन दिनदर्शिकेत ते एक जानेवारीपासून सुरु होतं. त्याच वेळी असे म्हणतात की दिनदर्शिका बदलल्यानंतरही बर्‍याच लोकांना हा बदल समजण्यात न आल्यामुळे ते 1 एप्रिललाच नवीन वर्ष साजरा करीत होते. मार्चच्या शेवटल्या आठवड्यापासून त्यांचं सेलिब्रेशन सुरु होऊन ते 1 एप्रिलपर्यंत चालत असे. अशा परिस्थितीत हे सर्व लोक विनोदांचे कारण बनले, ज्यामुळे त्यांना एप्रिल फूल म्हटले जाऊ लागले आणि हा दिवस सुरू झाला.



        या व्यतिरिक्त काही इतिहासकारांनी फूल डे साजरा करण्यामागील हिलेरियाशी संबंध जोडले. हिलारिया हा लॅटिन शब्द आहे, याचा अर्थ आनंद असा आहे. तसंच प्राचीन रोममध्ये हिलारिया हा समुदाय उत्सव म्हणून साजरा केला जात होता. हा सण मार्चच्या शेवटी साजरा केला जात असे. यात लोक वेश बदलून एकमेकांना मूर्ख बनवत होते. येथून एप्रिल फूल दिवस साजरा करण्याची परंपरा सुरु झाल्याचे देखील म्हटलं जातं.एवढेच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये हा दिवस वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो.


          या दिवशी इटली, बेल्जियम आणि फ्रान्समधील लोक एममेकांच्या पाठीवर कागदाने तयार केलेले मासे चिटकवून देतात, ज्यामुळे याला एप्रिल फिश असेही म्हणतात. या दिवशी कुठलीही अधिकृत सुट्टी नसते परंतू लोक अपाल्या मित्र-नातेवाईकांना मूर्खात काढून हा दिवस साजरा करतात. परंपरेनुसार काही देश जसं न्यूझीलंड, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका येथे या प्रकारी थट्टा केवळ दुपारपर्यंत केली जाते. सुरुवात असू शकते. तर काही लोक आहेत ज्यांचा असा विश्वास आहे की, इंग्लंडचा राजा रिचर्ड दुसरा याचे अॅनीसोबत लग्न ठरलं होतं. त्यामुळे एप्रिल फूलचा दिवस साजरा केला जातो. काही लोक या दिवस खरं सांगयचं झालं तर हा एप्रिल फूलचा दिवस कधीपासून सुरू झाला याची निश्चित माहिती आमच्याकडेही नाही. अद्याप ही माहिती कोणाकडेच नाहीये. परंतु लोकांचा असा विश्वास आहे की, फ्रेंच दिनदर्शिकेत होणारा बदल हा एप्रिल फूल डे च्या नावाने साजरा करण्याची सुरुवात असू शकते. 



       तर काही लोक आहेत ज्यांचा असा विश्वास आहे की, इंग्लंडचा राजा रिचर्ड दुसरा याचे अॅनीसोबत लग्न ठरलं होतं. त्यामुळे एप्रिल फूलचा दिवस साजरा केला जातो. काही लोक या दिवसाचा संबंध हिलारिया महोत्सवाशीदेखील लावतात. हा दिवस कधीपासून साजरा केला जातो याविषयीची सर्वात भारी अख्यायिका म्हणजे जुन्या काळात रोमन लोक नवीन वर्षाची सुरुवात एप्रिलपासून करत. तर मीडिल युरोपमध्ये नवीन वर्षाचा उत्सव 25 मार्च रोजी साजरा केला गेला. परंतु 1852 मध्ये पोप ग्रेगोरी 8 वे यांनी ग्रेगोरियन दिनदर्शिका जाहीर केली, त्यानंतर जानेवारीला नवीन वर्षाची सुरुवात झाली.ग्रेगोरियन कॅलेंडर फ्रान्सने प्रथम स्वीकारले होते. परंतु लोकांच्या मते, युरोपमधील बर्‍याच देशांनी हे कॅलेंडर स्वीकारले नव्हते, तेव्हा बरेच लोक त्याबद्दल पूर्णपणे अनभिज्ञ होते. 

     


          ज्यामुळे लोक नवीन कॅलेंडरच्या आधारे नवीन वर्ष साजरे करू लागले. नवीन कॅलेंडरनुसार नवीन वर्ष साजरे करणारे लोक जुन्या मार्गाने नवं वर्ष साजरे करणाऱ्या लोकांना मूर्ख समजतं. त्यानंतर एप्रिल फूल साजरे करण्यास सुरुवात झाली.तर मित्रानो असे आपण हा मूर्ख दिवस एक एप्रिलला साजरा करतो.

Post a Comment

0 Comments