(टी ई टी) घोटाळ्याबाबत आपण सर्वजण जाणतोच सध्या राज्यातील शिक्षण क्षेत्रातील एका मोठ्या (टी ई टी )घोटाळ्याची जोरदार चर्चा आहे .
तब्बल 7800 उमेदवार अपात्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) , प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपयांपर्यंत रक्कम घेऊन त्यांना पात्र ठरविल्याची माहिती समोर आली होती.
या’ महाघोटाळ्याप्रकरणी आता एक नवी अपडेट समोर येत आहे. त्यानुसार, बोगस सर्टिफिकेट घेऊन शिक्षण सेवेत रुजू झालेल्या या नकली मास्तरांचा शोध सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे या शिक्षकांचे धाबे दणाणले आहे.आणि टी ई टी पास होऊन नौकरी मिळवलेल्यांच्या समस्येत ही समस्या अग्रणी ठरत आहे . सन 2019-20 मध्ये झालेल्या परीक्षेत एकूण 16,592 परीक्षार्थींना टी ई टीत पात्र झाले होते परंतु सायबर पोलिसांनी निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल 7800 परीक्षार्थी अपात्र असल्याचे समोर आल्याने महाघोटाळा उदयास आला आहे .
या परीक्षेतील पहिला पेपर 1 लाख 88 हजार 688 उमेदवारांनी दिला होता. त्यातील 10,487 जण पात्र ठरले होते. तसेच 1 लाख 54 हजार 596 जणांनी परीक्षा दिली होती. पैकी 6105 जण पात्र ठरले होते. 19 जानेवारी 2020 रोजी हा निकाल जाहीर झाला हाेता. मात्र, पडताळणीत 7800 विद्यार्थी अपात्र असताना, त्यांना पात्र दाखविल्याचे समोर आले होते.
आता 2013 पासूनच तपासणी सुरु झाली आहे.
आतापर्यंतच्याया इतिहासात शैक्षणिक क्षेत्रात असा महाघोटाळा दिसून आला नव्हता ...
0 Comments