यंत्रांचा जिवंतपणा कृत्रिम बुद्धिमत्ता sofiya Robbot Artifitial Inteligency

      


       मित्रांनो आज मानव तंत्रज्ञान विकासाच्या एका मोठ्या पायरीवर उभा आहे. मागील तीस वर्षांपूर्वीचा विचार केला असता आपल्याला जाणवेल की ते आधीच या शंभर वर्षांच्या काळातील तंत्रज्ञानाच्या विकासापेक्षा कितीतरी पटीने जास्त तंत्रज्ञान विकास या अवघ्या तीस वर्षात झाला .पुढे येणाऱ्या तीस वर्षाचा काळ हा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काय घेऊन येईल याची कल्पनासुद्धा करणे शक्य नाही कारण आज तंत्रज्ञानाच्या बाबतीत दररोज नवनवीन विकसित प्रणाली समोर येत आहे.

Artifitial Inteligency 

      मानवाप्रमाणे परिस्थितीनुसार कार्य करण्यासाठी उपकरणे तयार केली जात आहेत , हे सर्व शक्य आहे ते कृत्रिम बुद्धिमत्ता यावर ,आपण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या संकल्पनेमुळे मानवाचे भरपूर काही काम अगदी काही क्षणात पुर्ण होतील . जेव्हापासून संगणकाचा शोध लागला तेव्हापासून मानवाने त्याला आपल्या गरजेनुसार विकसित केले आहे संगणकाचा आकार लहान होत असून त्याचा वेग व क्षमता वाढत आहे आता सगळ्या कलाकृती बुद्धिमत्तेची जोड मिळाल्याने भविष्यात अशक्य वाटणारे अनेक गोष्टी आपल्याला येत्या काही वर्षातच पाहायला मिळतील . 

Artifitial Inteligency

      कृत्रिम बुद्धिमत्ता हे शब्द आजकाल आपल्या संगणक व विविध यांत्रिक उपकरणे यांच्याबाबतीत ऐकायला येतात आपण या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत की कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय?  एखाद्या यंत्राने परिस्थिती समजून घेऊन बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या कृतीत बदल करून सर्व योग्य कार्य करणे ही कृत्रिम बुद्धिमत्तेचे सोपी वाक्य करता येईल . संगणक विज्ञानाची महत्त्वाची शाखा म्हणून आर्टिफिशिअल इंटेलिजन्स चे महत्व आहे. याचे मुख्य कारण म्हणजे बुद्धिमान यंत्र तयार करणे जे मानवाप्रमाणे बुद्धिमान असेल व त्याचे स्वतःचे निर्णय क्षमता असेल ज्यामुळे मानवाचे काम सोपे होईल. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तत्त्वावर रोबोटिक्स च्या सर्व वस्तू यंत्रे व उपकरणे चालतात . 

Artifitial Inteligency

      सध्या चर्चेत असणारी सोफिया ही यंत्रमानव कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रकार आहे जी आपल्या दैनंदिन कामासोबतच आपल्याशी बोलू शकतो आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चेहऱ्यावरील हावभाव कसे देते यामध्ये मनाप्रमाणे त्वचा कान डोळे सारख्या इंद्रियांचा वापर करून प्राप्त परिस्थितीवर निर्णय घेण्यासाठी प्रणाली विकसित केलेली आहे .भविष्यात या प्रकारच्या अनेक यंत्रमानव आपल्याला पाहायला मिळतील कृत्रिम बुद्धिमत्ता ही एक अशी संगणक प्रणाली असते ज्यामुळे यंत्राला मानवी बुद्धिमत्ता दिले जाते ते मानवाप्रमाणे विचार करून कार्य करण्यासाठी स्वतः योग्य निर्णय घेऊ शकेल यासाठी तयार केलेले असते, यामध्ये यंत्राला स्वतःच ठरवायचे असते की पुढे त्याला काय करायचे आहे .हे सर्व संगणकाच्या मदतीने केले जाते या सर्व यंत्राबद्दल कृत्रिम बुद्धिमत्ता विकास मुख्यता तीन पायर्‍या द्वारे केलेले आहेत 

Artifitial Inteligency

1) लर्निंग ज्याप्रमाणे कुठलेही नवीन कार्य करण्यासाठी सर्वप्रथम ते आपल्याला समजून घ्यावे लागते शिकावे लागते अगदी त्याचप्रमाणे या स्तरावर यंत्रांचे मेंदूमध्ये माहिती भरली जाते आणि भरून काही त्यांना नियम सुद्धा शिकविले जातात, ज्यामध्ये त्या नियमांचे पालन करून तयार केलेली यंत्रणा उपयुक्त बनवण्यासाठी मनाप्रमाणे त्याला अनुभव दिले जाते.

 2)  समोरील परिस्थिती समजण्यासाठी यंत्रामध्ये विशेष व्यवस्था केली आहे .यंत्रांना दिलेल्या सूचना व नियमांच्या अधीन राहून प्राप्त ज्ञानाचा वापर योग्य त्या ठिकाणी योग्य पद्धतीने करण्याची क्षमता त्यामध्ये निर्माण केली जाते. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची माहिती कॅमेऱ्याच्या साह्याने पाहून ऐकून समजून घेतली जाते.

 3) सेल्फ करेक्शन कार्य करत असताना बदललेल्या परिस्थितीनुसार यंत्र स्वतःच्या प्रणालीत बदल करून योग्य निर्णय घेऊन कार्य पूर्णत्वास नेण्यासाठी सक्षम बनविले जाते कार्य करत असताना यंत्राद्वारे झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्याला सक्षम करणे 

Artifitial Inteligency

     यामध्ये कौशल्य प्रणाली ज्याला आपण एक्सपर्ट सिस्टीम असे म्हणतो ध्वनी ओळख आपण स्पीच रेकॉग्निशन असे म्हणतो व यांत्रिक दृष्टी ज्याला आपण मशीन विजन असे म्हणतो या सर्वांचा समावेश यामध्ये आहेत .कृत्रिम बुद्धिमत्ता याप्रमाणे बनवले गेले आहे तो अगदी मानवाप्रमाणेच विचार करेल, कार्य करेल आणि कार्य करत असताना ते कोणत्या पद्धतीने करणे सोपे व योग्य ठरेल व जिद्दीने पूर्ण करेल.  याबद्दल स्वतः वेळ परिस्थितीनुसार विचार करते. अशा प्रकारचे मानवी मेंदू ची विशेषता यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्ता द्वारे दिली जाते ज्याद्वारे ते योग्य काम करू शकेल.

Artifitial Inteligency

      आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही संकल्पना सर्वप्रथम जॉन मक्कार्थी यांनी 1956 मध्ये डार्टमाउथ अधिवेशनात जगाला ओळख करून दिली .अमेरिकन संगणक तंत्रज्ञ होते आज ही एक स्वतंत्र शाखेत विकसित झाली आहे. गेल्या काही दशकात याने तंत्रज्ञांची मने जिंकली करण्यामध्ये आता वेग साठवणूक कार्यक्षमता व माहितीवर वेगळी प्रतिक्रिया प्रक्रिया करण्याची क्षमता असल्या कारणाने अनेक कंपन्या या पद्धतीला आपल्या उद्योगाशी जुळून येत आहेत .मानवाचे होणाऱ्या चुका तसेच कमी वेळात जास्त उत्पादन प्राप्त करण्यासाठी उद्योगधंद्यांना ही उपयोगी ठरत आहे.

Artifitial Inteligency

        आर्टिफिशिअल इंटेलिजन्स उद्दिष्टे आपण पाहूयात

 1) कार्यकुशल प्रणाली तयार करणे 

2) मानवी बुद्धिमत्तेला यंत्रात लागू करणे 

यंत्राने आपल्या प्राप्त ज्ञानाचा वापर करुन कौशल्यपूर्वक कार्य करण्यासाठी यामध्ये प्रणाली विकसित केली जातएकाच प्रकारचे कार्य पुन्हा पुन्हा सुखाने करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे बुद्धिचातुर्य प्रदर्शन करून घटनेतील चुका निदर्शनास आणून आपल्या वापरकर्त्यांना सल्ला सुद्धा देऊ शकेल. मानवी बुद्धिमत्तेला यंत्रात लागू करणे यामध्ये म्हणतो तर माणूस ज्याप्रमाणे एखाद्या परिस्थितीचा विचार करून त्यानुसार आपले वर्तन ठेवून कार्य करत असतो अगदी त्याच प्रमाणे परिस्थितीची माहिती जाणून घेऊन त्यानुसार चातुर्याने निर्णय घेऊन कृती करण्याची क्षमता प्राप्त करणे म्हणजेच मनाप्रमाणे समजू शकेल, विचारू शकेल, विचार करेल, शिकू शकेल व मानवाप्रमाणे वर्तन करू शकेल .

3)यात सगळे निर्णय घेण्यासाठी, गाण्यासाठी, सक्षम केले जाते  .याचा  उपयोग मेडिकल मध्ये सुद्धा होतो.

 4) नॅचरल लैंग्वेज प्रोसेसिंग, ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये संगणक प्रणालीच्या मदतीने कोणत्याही मानवी भाषांना मशीन द्वारे समजले जाते , आपल्याशी संभाषण करण्यासाठी अशी प्रणाली विकसित केल्या जातील, लिहिलेली आवाजाने भाषा समजणे, सूचनेनुसार कृती करणे यामध्ये समावेश होतो .

     उद्योग क्षेत्रात या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स उपयोग होते.   एकाच प्रकारचे काम पूर्ण  वगैरे करण्यासाठी याचा वापर तंत्रज्ञानावर केला जातो. हे अत्यंत जोखमीचे काम अचूक व सुरक्षित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल आणि उपयुक्त ठरलेले आहे .उद्योग औषध निर्मिती व विविध उपकरणे तयार करण्याच्या उद्योगांमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तसेच याचा उपयोग आरोग्य या क्षेत्रात सुद्धा केला जातो व कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून वैद्यकीय क्षेत्रात सर्वात जास्त प्रमाणात केला जात आहे यामध्ये रुग्णांना उत्तम रित्या निदान व उपचार करण्यासाठी याचा वापर होतो तेही कमीत कमी खर्च याचा विचार करून करूनच विविध कंपन्यांना आर्टिफिशल यांचा वापर मोठ्या हॉस्पिटलमध्ये करत आहे ज्यामुळे रुग्णांना कमी वेळात उत्तम उपचार योग्य पद्धतीने दिला जातो असेच एक आयबीएम गावाचे प्रसिद्ध व तंत्रज्ञान आहे त्यासोबतच सर्वसामान्य आजारासाठी हेल्थ सिस्टम सुद्धा आले आहे यांच्या साह्याने सामान्य लोकसुद्धा आपल्या आजारावर उपचार करत आहेत या सर्व यंत्राच्या वापराने आता वैद्य क्षेत्रामध्ये मोठी क्रांती होत आहे तसेच याचा उपयोग शिक्षण या क्षेत्रात सुद्धा होऊ शकते याच्या साह्याने ग्रेडिंग केले जाऊ शकते त्याद्वारे विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी जास्त वेळ मिळू शकेल याच्या सहाय्याने विद्यार्थ्यांची उत्तम रित्या तपासणी केली जाऊ शकतात विद्यार्थ्यांची गरज काय आहे कोण कोणत्या विषयात तो कसा आहे इत्यादींची माहिती मिळते जेणेकरून त्या विद्यार्थ्याला उत्तम मार्गदर्शन मिळेल तसेच त्याचा वापर अर्थ विभाग यामध्ये सुद्धा केला जातो जसे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या अर्थशास्त्रीय संस्थांना खूप लाभ मिळत आहे कारण कंपन्यांना सुरुवातीला माहिती प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ व पैसा खर्च करावा लागत असे पण आता तसं नाही दिवसेंदिवस कृत्रिम बुद्धिमत्ता चा वापर वाढत आहे मानव हळूहळू या यंत्राच्या सवयीच्या आहारी जाऊन सर्वस्वी त्यांच्यावरच अवलंबून राहता हे स्वयंचलित कार यंत्रमानव यासारखे कितीतरी उपकरणे आपण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी बनवून यायला अधिक शक्तिशाली व अद्ययावत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहोत कारण त्यांनी आपले कठीणच कठीण काम केले पाहिजे शेकडो माणसांचे काम एक यंत्र सहज करू शकते हे सर्व करत असताना यंत्रे कळत नकळत अधिक शक्तीशाली बनवत आहे व यांच्यामध्ये विचार करण्याची शक्ती सुद्धा विकसित होत आहे ज्याद्वारे ते कुठल्याही परिस्थितीनुसार स्वतः समायोजन करु शकेल ही गोष्ट बनवा साठी चांगली नाही तो दिवस दूर नाही जेव्हा हे स्थळ आणि मानवाच्या आदेशाचे पालन करणार नाही व स्वतःच्या व स्वतःच्या विचारानुसार कार्य करेल अशा परिस्थितीत मानवावर त्यांचे गंभीर परिणाम दिसून येतील आपण याचा वापर आपल्या फायद्यासाठी करावा पण एक गोष्ट प्रकर्षाने नोंदवू इच्छितो काही गोष्टी ज्या नियंत्रण याच्यावर आहेत त्यावर ठोस उपाय केल्याशिवाय कुठलाही तंत्रज्ञान विकसित करू नये जेणेकरून गरज पडल्यास योग्य वेळी त्याचा वापर करता येईल आपण इतके बुद्धिमत्तेने कशाला झालेला होती अशा प्रकारचे यंत्रमानव स्वतः तयार करत आहोत आणि आपल्या बुद्धीच्या जोरावर अशा प्रकारचे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तयार करून आपणच आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेत नाही ना ? कारण कुठल्याही पद्धतीने कुठलेही कार्य करत असताना त्याची क्षमता ओळखून त्याचे धोके पडताळून कार्य करणे गरजेचे आहे जरी ते विज्ञान असेल तंत्रज्ञान असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल अति तिथं माती या गोष्टीचा विसर आपण कधीही आपल्याला दुसऱ्या गोष्टीचा कधीही पडू नये अशी अपेक्षा करून हा लेख संपवतो . 

    जर आपणास हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा करून मी माझ्या या पोस्टला विराम देतो धन्यवाद🙏

 सौजन्य गुगल व नोबल सायन्स विज्ञान द्वि मासिक

 संकलन- श्री सुनील नरसिंग राठोड मुरूम

Post a Comment

1 Comments

  1. फायदा जरूर आहे परंतु त्याचे गंभीर परिणाम देखील मा
    नवला भोगावे लागतील

    ReplyDelete