1.दिसतोय पाण्यासारखा रंग माझा लाल
प्रत्येक प्राण्यात आहे माझा संचार
घेतली आहे स्वतःला चार गटात वाटून
पुढे चालवितो जीवन प्राणवायू मिसळून
जर कराल मला दान
तर वाचल दुसऱ्याचे प्राण
ओळखा पाहू मी आहे कोण?
विज्ञान कोड्याचे उत्तर : रक्त
2. स्वयंपोषी वनस्पतीची वैशिष्ट्ये महान
वनस्पतीच्या वाढीच्या प्रक्रिया छान
गरज असते सूर्यप्रकाशाची
पाणी आणि कार्बन-डाय-ऑक्साइडची
अन्न तयार करणारी प्रणाली वनस्पतीची
महत्त्वाची भूमिका हरितलवकांची
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : प्रकाश संश्लेषण
3. पंख नाही तरी उडतो आकाशात
मानवाला घेऊन जातो नभात
दळणवळणाचे जलद साधन
वेगात उडतो जाळून इंधन
संशोधक माझे ऑरविल, विलबर
सेना ,संशोधन व प्रवासी वापर
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर : विमान
4. राष्ट्रीय प्राण्याचा आहे मला सन्मान
अन्नसाखळीत आहे टोकाचे स्थान
तांबूस रंगावर नक्षीदार पट्टे काळे
डरकाळी ऐकून सर्व घाबरून पळे
तीक्ष्ण दात करडी नजर
दबा धरून पकडतो सांबर
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर : वाघ
5. दळणवळणाची महत्त्वाचे साधन
वाहून नेते भारदार वजन
धावते धातूच्या रस्त्यावर
पोहोचते नेहमी अचूक वेळेवर
शरीर माझे लांबच फार
शिट्टी वाजून होते पसार
ओळखा पाहू मी आहे कोण ?
उत्तर : आगगाडी
6. खांबासारखे पाय माझे ,सुपासारखे कान
दात आहेत बाहेर माझे ,नाक आहे शान
मेहनती आहे मी, प्राणी बुद्धिमान
सर्कशीत भेटतो ,जरी असले डोळे लहान
विशालकाय देह ,आवड शाकाहार
जमिनीवरील प्राण्यात सर्वात जास्त वजनदार
ओळखा पाहू मी आहे कोण ?
उत्तर: हत्ती
7. मी उडते थाटात
सुंदर फुलांच्या घाटात
घर माझे षटकोणी
त्यात भरले गोड पाणी
इवले इवले पंख
असेल तर मारेल डंख
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : मधमाशी
8. लोहाला आकर्षणाचा माझा स्वभाव
यावरूनच पडले माझे नाव
दक्षिण-उत्तर राहतो स्थिर
सजातीय द्रव व करतात एकमेकांना दूर
सभोवताली निर्माण करतो माझ्या क्षेत्र
माझ्या पासून बनवतात वीज निर्माण करणारे यंत्र
ओळखा पाहू मी आहे कोण ?
उत्तर : लोहचुंबक
9. फळ आहे रसदार
पोषक घटकांचा भरमार
आंबट-गोड सोमाजी खास
त्यासोबत येतो सुवासिक वास
नाव तसाच आहे सुंदर रंग माझा
साल कडून माझी दहा फोडी मोजा
ओळखा पाहू मी आहे कोण ?
उत्तर : संत्रे
10. पडलेला ॲपल पाहिलाय मी
गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलाय मी
सप्तरंगाची केलीय उकल
कॅल्क्युलस विकसनात झालो सफल
गतीचे नियम सांगितलेत तीन
बनविली पहिली परावर्ती दुर्बीण
ओळखा पाहू मी आहे कोण ?
उत्तर : सर आयझॅक न्यूटन
11. कवचधारी आहेत त्वचा माझी नाजूक
पाने खाऊन रोपाची मिटवतो भूक
सक्रिय असतो मी खूप रात्रीत
अंडे घालतो मऊशार मातीत
पाठीवर घेऊन फिरतो माझे घर
डोळे असतात माझे त्वचेच्या मिश्यावर
ओळखा पाहू मी आहे कोण?
उत्तर : गोगलगाय
12. सर्वात मोठी ग्रंथी शरीरात
कोंबून ठेवली बरगड्यांच्या आत
आवरण मला संयोजी ऊतीचे
निर्माण करतो पित्त रसाचे
विषारी पदार्थांचा करतो नाश
मदत करतो चयापचयास
ओळखा पाहू मी आहे कोण ?
उत्तर : यकृत
13. शरीराचे सौंदर्य वाढवितो मी
लज्जा रक्षण करतो मी
निर्माण होतो कापूस पासून
रक्षण करतो ऊन वाऱ्यापासून
मला वापरणारा मानवा एकमेव सजीव
रंगीबेरंगी नक्षीदार रेखीव
ओळखा पाहू ! मी आहे कोण?
उत्तर : कापड
14. सजीवांच्या शरीराचे बाह्य आवरण
आंतरेंद्रियांचे करते रक्षण
स्पर्शाची जाणीव देते करून
तापमान नियंत्रित करते घाम बाहेर काढून
उष्णता व थंडीपासून बचाव करते
शरीरातील आर्द्रता राखून ठेवते
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : त्वचा
15. वस्तूच्या कंपनाने होतो मी निर्माण
कानामुळे होते माझे ज्ञान
सतारीच्या ताररातून निर्माण होणारे तत्व
कंपने असेपर्यंत असते माझे अस्तित्व
लहरींच्या स्वरूपात माझा प्रसार होतो
वायू, द्रव्य, स्थायु असा वेग वाढत जातो
ओळखा पाहू! मी आहे कोण?
उत्तर : ध्वनी
16. मी आहे स्वयंपोषी करतो प्रदूषण कमी
माझ्या सानिध्यात मिळेल दीर्घ आयुष्याची हमी
जिथे मी असेल तिथे थांबवीतो जमिनीची धूप
धराल माझी संगत तर पाऊस पडेल खूप
माझ्यामुळे तुम्हाला प्राणवायू मिळतो
तुम्हाला सावली देऊन मी उन्हात तळतो
ओळखा पाहू ! मी आहेत कोण ?
उत्तर : झाड
17. मी आहे एक जलचर प्राणी
मला म्हणतात पाण्यातील राणी
कल्याद्वारे घेतो ऑक्सिजन
पानवनस्पतींचे करतो भक्षण
आवडीने करतात माझे सेवन
पाणी हेच माझे जीवन
ओळखा पाहू! मी आहे कोण?
उत्तर : मासा
18. कारखान्याच्या धुरात लपले माझे घटक
संयोग पाहून वाफेशी होतो प्राणघातक
सलफ्युरिक व नायट्रिक आम्लांचे तयार होतात ढग
पडतो विषारी पाऊस होऊन तेंव्हा त्रासून जाते जग
घातक द्रव्य मिसळतात जलसाठ्यात
पाण्यातील जलचर मृत्यू पावतात क्षणात
ओळखा पाहू ! मी आहे कोण?
उत्तर :आम्लवर्षा
19.चव असते माझी आंबट गोड
वेलीला लागलेला असतो घड
पक्व फळ माझे आहे उत्तम खाद्य
काही प्रकारापासून बनवितात मद्य
रसाळ मृदुफळे गोलसर बांधणी
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जास्त आहे मागणी
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : द्राक्षे
20. स्फटिक काचाचा त्रिकोणी आकार
प्रकाश किरण जातात आरपार
अपवर्तन होते प्रकाशाचे
अपस्करण करतो सप्त रंगाचे
किरण वळतात वेगवेगळ्या रंगातून
पांढरा प्रकाश बनतो सात रंगापासून
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : प्रिझम
21.नाजूक मऊशार पांढरा पदार्थ
दरवळतो माझा झणझणीत सुगंध
कृत्रिम व नैसर्गिक होते माझी निर्मिती
जंतुनाशक मलमात असते उपस्तिथी
चटकन होते माझे ज्वलन
घडून येते स्वंप्लवन
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : कापूर
22. निर्माण करतो मला वाहता वारा
अपारंपारिक स्रोतांचा वापर सारा
भविष्यात नाही संपणार कधी
प्राधान्य द्या मला सर्वात आधी
पहा ही जादू भिंगरीची
सुट्टी करतो प्रदूषणाची
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : पवनऊर्जा
23. पडताच माझ्यावर सूर्यप्रकाश
बदलतो मी अदृश्य रुपास
उंच जातो हलका होऊन
सघन होतो गडगडाट करून
येतो खाली मिळताच गारवा
वाहत जाऊन मिळतो सागरा
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
उत्तर : जलचक्र
24. संप्रेषणाचे साधन मी
नंबर लावताच वाजेन मी
अविष्कारक माझा मार्टिन कूपर
संगणकच आहे मी हातातील सुपर
संदेश माझ्यातून पाठवाल लघू
व्हिडीओ कधींपण शकाल बघू
ओळखा पाहू ! मी आहे कोण?
उत्तर : भ्रमणध्वनी
25. शोधापासून होती ओळख मला ग्रहाची
खगोलतज्ञामध्ये होती भिंन्नता मतांची
ग्रहांच्या यादीतून केले मला बाद
खुजाग्रह म्हणून आता घालतात साद
सर्वाधिक लंबवर्तुळाकार कक्षा माझी खास
मिथेन , नायट्रोजन व बर्फाचा पृष्ठभाग
ओळखा पाहू ! मी आहे कोण ?
मला आहे चुंबकाची जोड मी करतो दिशेची फोड मुक्त बसविली मध्येच फिरकी क्षितिज समांतराला घेतो गिरकी जहाज विमान माझे सोबती निष्क्रिय होतो ध्रुवावरती
उत्तर :- होकायंत्र
रंग आहे माझा श्वेत ज्यात जीवनसत्व अनेक प्रथिनांचा आहे मी राजा पूर्णांन्न खाऊन येईल मजा..
उत्तर :- दुध
सुंदर चमकदार कठीण आहे खूप मौल्यवान आहे कार्बनचे रूप सापडतो मी कोळशाच्या खाणीत अनेक वेळा करतो प्रकाशाला परावर्तित पैलू पाडून करतात सुंदर कठोरपणात पहिला नंबर
उत्तर :-हिरा
राष्ट्रीय प्राण्याचा आहे मला सन्मान अन्नसाखळीत आहे टोकाचे स्थान तांबूस रंगावर नक्षीदार पट्टे काळे डरकाळी ऐकून सर्व घाबरून पळे तीक्ष्ण दात करडी नजर दबा धरून पकडतो सांबर
उत्तर :-वाघ
वाळवंटातील मी आदर्श वाहन ऐटीत चालतो उंचावून मान चिवट बहुपयोगी शांतिप्रिय प्राणी जपून वापरतो शरीरातील पाणी पाठीवर आहे अन्नाची शिदोरी तीन पापण्या माझ्या डोळ्या वरी
उत्तर :-उंट
दिसतोय सुंदर कोकणचा राजा खाऊन येते खूप खूप मजा बी आहे माझी द्विबीजपत्री सर्वच माझ्याशी करतील मैत्री मान असला राष्ट्रीय जरी पानांचे तोरण प्रत्येक घरी
उत्तर :-आंबा
दिसायला सुंदर अवयव नाजूक माझ्यामुळे कळते वस्तूंचे रंगरूप करून देतो मी प्रकाशाची जाणीव श्वेतपटल दृष्टीपटल बाहुली रेखीव अद्भुत नैसर्गिक कॅमेऱ्यांची रचना सुखदुःखात मी व्यक्त करतो भावना
उत्तर :- डोळे
दळणवळणाचे महत्त्वाचे साधन वाहून नेते भारदार वजन धावते धातूच्या रस्त्यावर पोहोचते नेहमी अचूक वेळेवर शरीर माझे लांबच फार शिट्टी वाजून होते पसार
उत्तर :-आगगाडी
नाजूक मऊशार पांढरा पदार्थ दरवळतो माझा झणझणीत सुगंध चटकन होते माझे ज्वलन घडून येते संप्लवन
उत्तर :-कापूर
लुक लुक करतो रात्रीला गायब होतो दिवसाला लाखो मैलांचा माझा प्रवास निर्माण करतो स्वतः प्रकाश
उत्तर :-तारे
दिसतात माझे रात्रीच लाल डोळे पंख असतात मला, पण पिसे नाही.
मी पाजतो पिलांना दुध. कावळा, चिमणी, पोपट, व कोंबडा यांसारखा पक्षी नाही.
सांगा पाहू मी कोण?
उत्तर : वटवाघूळ
मी तपासतो लोकांना किती बिल झाले ते मी पाहतो आजार करतो नीट लोक होतात फिट
उत्तर : डॉक्टर
रंग नाही, वास नाही, चव नाही जाणवते पण दिसत नाही
माझ्याशिवाय एकही सजीव जगू शकत नाही.
उत्तर : हवा
१
मी आहे प्राणवायूचा साठा अन्नधान्याची देतो रास तोडू नका हो मला कोणी उपयोगी पडतो मी हमखास
*उत्तर- वृक्ष / वनस्पती / झाड*
२
स्वच्छ ठेवा हो तुम्ही मला तहान तुमची भागवते थांबत नाही कोठेच कधी सतत मी वाहत असते
*उत्तर - नदी*
३ उंचच उंच बर्फाच्या राशी देशाचे करतो सदैव रक्षण वनौषधींचे आगर आहे पर्यावरणाचे करतो संरक्षण
*उत्तर - हिमालय पर्वत*
४
दारोदारी लावतात तिला समजली जाते खूप पवित्र औषधी अशी सर्वगुणसंपन्न आढळते ही भारतात सर्वत्र
*उत्तर - तुळस*
५ छाया पडते कधी चंद्राची राहू, केतू ना दैवी खेळ अंधश्रद्धा नको डोळस व्हा विज्ञानाशी घाला याचा मेळ
*उत्तर - ग्रहण*
६
वनस्पती आहे इवलीशी हात लावताच ती लाजते स्पर्श करताच तिला जरासा पाने आपली मिटवून घेते
*उत्तर - लाजाळूचे झाड *
७
ही एक क्रिया वनस्पतींची सूर्यप्रकाश शोषून घेतात पानांच्या साहाय्याने मग अन्न आपले तयार करतात
*उत्तर - प्रकाश संश्लेषण *
८
हा आहे शेतक-यांचा मित्र नागपंचमीला काढतात चित्र पाय नसतात सरपटत जातो जमीन तो भुसभुशीत करतो
*उत्तर - साप*
९
बेडूकराव जमिनीत झोपतात आठ महिने तेथेच राहतात सांगा मुलांनो या निद्रेला विज्ञानप्रेमी काय म्हणतात?
*उत्तर - शीतसमाधी*
१०. पोटात पाय ठेवते ती हळूहळू ती सतत चालते चिकट स्त्राव सोडत जाते लहान मुलांना खूप आवडते
*उत्तर - गोगलगाय*
११.
आक्सीजन घेतो रक्त शुद्ध करतो सुक्ष्म वाहिन्यांद्वारे शरीराला पोहचवितो
*उत्तर - हृदय*
१२
जन्म मरणाच्या चक्रामध्ये आहे हा एक लहानसा शब्द घेत राहिलो सदैव तर जगतो बंद झाल्यास होतो निःशब्द
*उत्तर - श्वास*
१३
बत्तीस सैनिक तुटून पडतात बारीक तुकड्यात पाणी मिसळते एक महाराणी मात्र मजेत आस्वाद त्यांचा आनंदाने घेते
* बत्तीस सैनिक - दात, पाणी - लाळ*
* महाराणी - जीभ *
१४
हा एक चमत्कारिक कागद आम्ल अल्कलीत रंग बदलतो पहा मुलांनो गंमत जवळून जादूची हा कांडी फिरवतो
*लिटमस कागद *
१५. रंग माझा लाल तांबडा वाघ असो वा कोंबडा प्रत्येक सजीवात राहतो शरीराला मी उर्जा देतो
*उत्तर - रक्त*
१६.
लांबी याची खूप मोठी म्हणतात याला लहान नाव लहान असले तरी कार्य याचे आहे महान
*उत्तर - लहान आतडे*
१७.
स्त्रिया पुजती पौणिर्मेला प्राणवायूचा अखंड झरा साधूसमान लांब दाढी बहुपयोगी आहे हा खरा
*उत्तर - वडाचे झाड*
१८.
शरीरातील शूर शिपाई करतो रोगापासून संरक्षण उभी करूनी फौज त्याची करतो आपले सदैव रक्षण
*उत्तर - पांढ-या पेशी*
१९.
डाळींमध्ये याचे अस्तित्व दुधामध्येही असते सत्त्व मजबूत करण्या शरीर ठेवण याचे करावे दररोज सेवन
*उत्तर - प्रथिने*
२०
गवतासारखी पाने औषधी चहात टाकून पितात सर्दी खोकला तापाला लगेच पळवून लावतात
*उत्तर - गवती चहा*
२१ एका बाटलीत रंग दोन सांगा उत्तर हुशार कोण?
उत्तर - अंडे
२२ सारखेच आम्ही दोन भाऊ
उत्तर लवकर सांगा पाहू
उत्तर - डोळे
२३
देतो ज्ञान शिकवतो विज्ञान उंदीर असतो मदतीला कोठेही न्या सोबत याला सलाम याच्या शास्त्रज्ञाला
उत्तर - संगणक
२४
रात्रीचा दिवा आकाशात चमचम चमकतो नभात म्हणतात मला रजनीनाथ देतो रात्रभर तुम्हा साथ
उत्तर- चंद्र
२५
सप्तरंग घेऊन हा आकाशात अवतरतो पृथ्वीवरील लोकांना खूप खूप आवडतो
उत्तर - इंद्रधनुष्य
२६
ही एक वनस्पती कीटकांना खाते येता जवळ कीटक गिळून आत घेते
उत्तर - हायड्रा
२७
एक प्राणी सरपटणारा देतो तो अंडी त्याला पाहताच आपली सुटते घाबरगुंडी
उत्तर - साप
२८
मित्र म्हणती सारे याला देतो चोहीकडे प्रकाश उर्जा व उष्णतेचा स्त्रोत घर आहे त्याचे आकाश
उत्तर - सूर्य
२९
वर फेकलेली वस्तू येते नेहमी खाली प्रसिद्ध आहे हा न्यूटनचा शोध काय म्हणतात सांगा मुलांनो झाला का तुम्हाला बोध?
उत्तर - गुरुत्वाकर्षण
३०
पृथ्वीचा हा उपग्रह आकाशात तो राहतो आकार बदलून रात्रीला आपल्याला प्रकाश देतो
उत्तर - चंद्र
३१
जलचर हा प्राणी पाण्यात पोहतो अन्न म्हणूनही उपयोगी पडतो
उत्तर - मासा
३२
छोटेसे हे फळ देते माणसाला बळ फोडा याला पटकन तोंडात टाका चटकन
उत्तर- अक्रोड
३३ जांभळा झगा अंगावर हिरवी टोपी डोक्यावर मिळेल तुम्हाला बाजारात आणा मला तुमच्या घरात
उत्तर - जांभळी वांगी
३४
अंगात घालतो निळा अंगरखा रुबाब माझा बादशहा जसा ! सौंदर्याने पाडतो भुरळ लोकांना थुईथुई नाचतो नर्तक कसा?
उत्तर - मोर
३५ आम्रवृक्षावर बसून गातो पक्षी हा मधुर आवाजात अंडी कधी उबवत नाही ठेवतो दुस-यांच्या घरट्यात
उत्तर - कोकीळ पक्षी
0 Comments