मराठी चारोळ्या ( कार्यक्रमातील टाळ्यांसाठी ) Marathi Charoli

 


👉पाऊस कधीचा पडतो,

झाडाची हलती पाने,
हलकेच मला जाग आली,
दु:खाच्या मंद स्वराने

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉पाऊस पडत असताना, तो मातीचा सुगंध,
आणि गार गार वारा……
मला नेहमीच आवडतात झेलायला,
मुसळधार पावसाच्या त्या बरसणाऱ्या धारा…

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉नसती उत्तरे द्यावी लागतात,
वेड्यासारखं वागल्यावर,
पण वेड्यासारखं वागायला होत,
पाऊस पडायला लागल्यावर

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो……

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉शेवटचं आज जाताना ,

मागे वळून पाहणं नव्हतं…
तेव्हाच कळलं मला ,
सारंच आता संपलं होतं

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉शांत संध्याकाळी समुद्रकिनारी
तुझी वाट बघत मी बसलो होतो
दूर देशावरून येणाऱ्या लाटेशी
एकटाच बोलत बसलो होतो

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉माझं असं वागणं
तुला खरंच झेपेल का.?
ढगाआड चंद्र लाजून
लपला चालेल का?
जवळच असूनही तुझ्यापासून
दूर राहीले तर खपेल का. ?
इतकं प्रेम करूनही
व्यक्त झाले नाही तर
मनाला तूझ्या रूचेल का..?
आठवणींनी कंठ दाटून आला तर
माझं मन कुठे रमेल का..?
प्राजू 

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉सये रोज नव्याने दरवळतो

तुझ्या आठवणीचा सुगंध

मग उगाचच जडतो जीवाला

तुला आठवायचा वेडा छंद

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉सवयींचे काय , त्या कशाही जडतात,
हळु हळु अंगवळणीही पडतात,
म्हणुन का लक्ष्य सोडायचे असते?
एकटेपणा टाकुन , सावलीसह पुढे जायचे असते

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉श्रवण म्हणजे मला वाटतं
प्राजक्ताचे दिवस
सृष्टीने कधीतरी करून
फेडलेला नवस

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉गरुडासारखे उंच उडायचं असेल

 तर कावळ्यांची संगत सोडावी लागते.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉सरलेल्या आयुष्यात ही
थोड्या आठवणी आहेत,
सुखाचे क्षण जरी विसरले
त्या आठवणी सोबतीला आहेत

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉सर्वांपासून दूर एक

वेगळीच दुनिया आहे…
जिथे फ़क्त
तू आणि मी आहे

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉सहवासाची संगत तू
चांदण्यांची गंमत तू ,
रवि किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तू 

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉सुखाची चटक लागली कि

मनाला दु:ख सोसवेनास होत.
आपल्या आभाळभर आकांक्षानी
आपलच दैव आपल्यावर उलटत

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉पंखहीन असतील जरी अश्रू
तरी प्रवास अबोल भावनांतून होतो,
ह्या डोळ्यातला मोती क्षणात
समोरच्या डोळ्यातुन ओघळतो

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉कोल्ह्यांची जमली टोळी
सिहांची शिकार करणार
सगळे भ्रष्टाचारी आत्ता
देश भ्रष्टाचार मुक्त करणार

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉इच्छांचा पिच्छा सोडिला आयुष्य तेव्हा कळले. 

दिवसाचे हास्य पसरले जेव्हा

 डोळ्याचे ओझे रात्री तुनि ढळले

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉हळुवार जपून ठेवलेले क्षण,

तेच माझ्या जगण्याची आस आहे…
एकेक साठवून ठेवलेली आठवण,
तिच माझ्यासाठी खास आहे

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉हळूच माझ्या ह्रदयाला कोणीतरी
चोरून नेलंय….
स्वतःच ह्रदय मात्र माझ्याकडे
ठेवून गेलंय

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉सगळ्यात अनोळखी कोण आहे ?
तर मी आहे माझ्यासाठी
अन सगळ्यात जवळचा कोण आहे
तर मी आहे तुझ्यासाठी

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉फस्त केली दुःखे सारी मी ताटातली नशीब पुन्हा पुन्हा का बाढून जातेमी मांडली कुंडली डोळसपणे आयुष्य अंधपणेफाडून जाते

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉सारखचं वाटतं पाऊस पडावा,
तू सोबत असताना…
ओढणी धरावीस डोक्यावर
पावसाचा थेंब पडताना

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉स्वप्न मलाही पडतात, पण
त्यांच्या मागे मी धावत नाही
माझ्या आठ बाय दहाच्या खोलित
राजवाड्याचा दरवाजा मावत नाही

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉सुख दुखाचा विचार करताना
मी तुलाच समोर पाहिले
माझे संपूर्ण जीवनच
तुझ्या माझ्या प्रेमाच्या नावे वाहीले

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉ह्रदय ही हल्ली, माझं तुझ्याशिवाय

काहीच मागत नाही
तू सोबत असताना माझे ह्रदय,
माझे राहत नाही

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉सोबतीला असे आज ही सांज ओली
अवेळी आठवांचे धुके दाटलेली…
ऋतू जीवघेणे किती विसरावे..
पुन्हा मोहरावी प्रीत मनी रुजलेली

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉आकाशातले द्योंगावणारे विमान आणि त्यामागुन विरत चाललेल्या धुरामध्ये हरवलेलं बालपण आठवत राहतं उंचावूनी हात मारलेली हाक हरवलेल्या ढगात हरवलेल्या झाडांत काटलेला माग डोळ्यांत साठवत राहतं मोठे होत गेलो कक्षा रुंदावत गेल्या क्षितीजे धुंडाळले स्वप्ने गुंडाळले तरी बालपणीच विमान गाठत राहतं

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉वाटेवरील प्रत्येक पाऊल

आता सावकाश पडत होते
लक्ष्य अवघड नव्हते
मात्र अनुभव कडवट होते.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉केव्हा संपेल जीवन

कुणालाच समजत नाही
मनासारखं जगून घ्यावं
कारण हा जन्म पुन्हा मिळत नाही.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉जीवनाचा प्रवास
स्वतःच करायचा असतो
कुणीतरी सदैव सोबत असावं
असा हट्टसुद्धा धरायचा नसतो.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉न कळणाऱ्या जीवनात
थोडं सांभाळून चालावं
सरळ रस्त्यावर वेगाने तर
वळणावर पाऊल जपून टाकावं

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉 जीवनात सदैव

आनंदी राहायचं असतं
कारण दुःखाचं गाठोडं इथं
प्रत्येकाच्या नशिबात असतं.

 🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉 जीवनाच्या प्रवासात

अनेक लोकं भेटतात
साथ देणारे कमी अन
सोडून जाणारेच जास्त असतात.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉दुसऱ्याविषयी बोलतांना
शब्द आठवावे लागत नाही
अन स्वतःविषयी बोलतांना
मग शब्द सुचत नाही.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉प्रत्येकाने आयुष्यात
खूप व्यस्त असावं,
जे पैश्याने नाही मिळणार
ते कमवून बघावं.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉आयुष्य फक्त
जिंकण्यासाठी नसतं
कधी हरण्यासाठी
तर कधी शिकण्यासाठी असतं

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉या अस्थिर आयुष्यात
काहीच स्थिर नसतं
कधी दुःखाचा सागर येतो
तर कधी सुखाचं तळं भेटतं.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉आई...
हे आयुष्य आहे रे,
आई नाही प्रत्येकवेळी
प्रेम करायला...💯

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉आई असेल
सोबतीला
तर विषय सुद्धा अमृत
होईल,
आई नसेल सोबतीला 
तर सावलीतसुद्धा

 चटके देईल.

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉जीवनातील पहिली शिक्षक
   आणि मैत्रीण आई असते
आपलं जीवन पण आईच कारण
आपल्याला जीवन देणारी आईच असते

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉आई साठी काय लिहू
आई साठी कसे लिहू
आई साठी पुरतील एवढे
शब्द नाहीत कोठे.. 

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉आई वरती लिहीण्याइतपत
नाही माझे व्यक्तिमत्व मोठे
आई तू उन्हामधली सावली
आई तू पावसातली छत्री
आई तू थंडीतली शाल...

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉जीवन हे शेत आई म्हणजे विहीर
जीवन ही नौका तर आई म्हणजे तीर
जीवन ही शाळा तर आई म्हणजे पाटी
जीवन हे कामच काम तर आई म्हणजे सुट्टी

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉आई म्हणजे मंदिराचा उंच कळस
आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं ठंडगार पाणी...
..                             

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉आई म्हणजे..

आई म्हणजे मंदिराचा उंच कळस

आई म्हणजे अंगणातली पवित्र तुळस

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी

आई म्हणजे वाळवंटात प्यावं अस थंड पाणी


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉मुंबईत घाई

शिर्डीत साई, फुलात जाई

गल्लीगल्लीत भाई

पण जगात भारी 

केवळ आपली आई!


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉तुझ्याविना घर हे

आता सुनं पडलंय,

तू गेल्यावर मन माझं

आता परकं झालंय.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉दुखाचा डोंगर कोसळलेला असो

कि सुखाचा वर्षाव होत असो

मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो

कि आठवणीचे तारे लुकलुकत असो

आठवते फक्त .....आई....


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉आई असते एक फुलाची कळी 

सतत उमलत राहून सतत सुगंध दरवळत ठेवणारी

आई असते क्षमेची मूर्ती, 

आपल्या मुलांचे अनेक अपराध पोटात घालणारी

आई असते एक सावली

सतत सोबत राहून मार्ग दाखवणारी

आई असते परोपकारी

स्वतःसाठी न जगता इतरांसाठीच जगत राहणारी


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉माझं दैवत उभं माझ्याच घरात,

आयुष्यभरासाठी 'आशीर्वाद' देण्यास.

माझ्या मना काहीच कळेना,

विसर मनाला लागलो वारीला.

वारी-वारी करून झालो मी बारीक,

खर्चुनी घरचं धन लागली मनास सल.

सुखाच्या मी शोधात कपाळी बुक्का लावत

माझं दैवत घरात मी निघालो वारीत.

देहू-आळंदी झाले पंढरी झाली-काशीलाही गेलो

मिसळलो मी वारीत गुलाल खोबरे उधळत.

उशिराने कळुनी चुकले मनास

'वैभवाचं मंदिर' त्यावर कळस.

'तुळशीसम' प्रसन्न सगळीकडं सहभाग,

सुखदुखात सोबत "मना हिरवं रोपटं".

आली दाटुनी नयनी आसवे,

मन माझे पोरके झाले.

होतं घरीच दैवत मी निघत वारीत, मी निघत वारीत माझं दैवत घरात.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो

तरी तू मला शोधून काढशील

आई, तुला एकदाच हाक दिली

तरी अब्जांनी धावून येशील.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉अतिथींच्या आगमनाने

गहिवरले हे सेवासदन
अतिथींना विनंती,
करूनी दिपप्रज्वलन
प्रसन्न करावे वातावरण....


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉एक छोटीसी ज्योत प्रतिक
म्हणून काम करते
थोडासा का होइना पण
अंधार दूर करते.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉जीवनाला हवी प्रकाषाची वात
दिव्यामध्ये जळते छोटीषी वात
तरीही तिला आहे मानाचे स्थान
हे आपणास आहे ज्ञान
तेव्हा दिपप्रज्वलनाने करूया
कर्यक्रमाची सुरूवात.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉संस्कृती आहे आपली प्रकाषाची
षितलता आहे त्यात चंद्राची
दिपप्रज्वलनाने सुरूवात कार्यक्रमाची
हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉गुरूजनांचा आषिर्वाद घेवून
साथ दयावी सर्वांनी मिळून
आजच्या कार्यक्रमाचा उद्देष
जाणूण घ्यावा प्रास्ताविकेतून.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान
ज्ञानाच्या विष्वात षिक्षकाला मान
आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे
प्रास्ताविकेचे ज्ञान


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉जीवनाचे सार कळते
ग्रंथ आणि पुस्तकातून
कार्यक्रमाचा उद्देष कळतो
प्रास्ताविकातून


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉तेज तुमचे आहे सुर्य-चंद्राहूनही जास्त
तुमच्या या बोलण्याच्या शब्दातच आहे
जीवणाचे संपूर्ण शास्त्र


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉ज्ञानरूपी मार्गाच्या
पदक्रमातून कळस गाढू प्रगतीचा
त्यासाठी मान आहे
अध्यक्षीय मार्गदशनाचा


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉बोलके करण्यास हवे असते संभाषण
आधारासाठी हवे असते आश्वासन
योग्य दिशा मिळण्यासाठी
आवश्यक आहे मार्गदर्शन


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉कार्यक्रम झाला बहारदार
भाशणही झाले जोरदार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे सर्वांचे आभार


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉प्रास्ताविक झाले प्रार्थना झाली
आतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली
आपल्या मार्गदशर्नाने
आम्हाला दिशा मिळाली
शेवटी आता आभारप्रदर्षनाची वेळ आली.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉थेंबाथेंबाने तलाव भरतो
हाताहाताने कार्यक्रम फुलतो
जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार
तेंव्हा मानलेच पाहिजेत त्यांचे आभार.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉वसंतात येतो फुलांना बहार
तेंव्हा फांदयाच होतात त्यांचा आधार
श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार
तेंव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉कवितांच्या दुनियेत किती मजा असते

एकटं एकटं वाटताना अख्खी दुनिया सोबत असते.


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


👉 देवाला हात जोडून
    स्वस्थ बसायच नसत
    देव घडवीत नाही
    आपण घडायच असतं

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉काही अबोलक्या भावना
     शब्दांच्या कुशीत मोजतात
     कधी हसण्यात फुलतात
     तर कधी आसवात भिजतात

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉 जीत हासिल करनी हॆ
      तो काबिलीयत बढाई
      किस्मत की रोटी तो
       कुत्ते को भी नसून नही होती

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉 खेल तसा का हो या जिंदगी का
     अपना उल्का तब ही सिखाना
      जब सामने बादशहा हो

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶   

👉जिनके इरादे नेक होते हॆ
      उनके  दोस्त अनेक होते हॆ

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

👉 कोर्या कोर्या कागदावर
      असलं जरी छापलं
    ओठावर आल्याखेरीज
       गाणं नसतं आपलं


🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶


संकलन श्री राठोड सुनिल नरसिंग मुरूम.



Post a Comment

0 Comments