चला चला हो शाळेत जाऊ ' प्रवेशोत्सव गीत .

 


चला चला हो शाळेत जाऊ  (प्रवेशोत्सव गीत )


चला चला हो शाळेत जाऊ

 खूप शिकूनी मोठे होऊ।।धृ।।


पाटी पेन्सिल घेऊन हाती 

घट्ट करू  शाळेशी नाती ।।1।।


वह्या पुस्तके पेन घेऊया 

ज्ञानाच्या कक्षा वाढवूया ।।2।।


अज्ञानाच्या नाशासाठी 

ज्ञानाच्या त्या किरणासाठी ।।3।।


आई वडिलांच्या सेवेसाठी 

मातृभूमीच्या रक्षणासाठी।।4।।


चला चला हो ...................


कवी - श्री सुनिल नरसिंग राठोड, मुरूम 


CLICK HERE FOR SONG

Post a Comment

0 Comments