बुडगा
मनातील तीव्र इच्छा साठवून
स्वतःचे सांत्वन करतो आठवून,
अंगणात खेळणाऱ्या मुलांना पाहून
भासे मीही बसलो आहे खेळून।
पाहुनी सुरपारंबा खेळणारी मुले
जे पटापट झाडावर चडुनी झुले,
त्यात आता माझेच नंबर आले
असे भास मलाच होऊन गेले ।
जवळच गप्पा मारणारे मित्र
होती जुळवी जीवनाचे सूत्र,
ऐकून मध्येच मी सांगू पावित्र्य
भासे मीच रंगवत जीवनचित्र ।
पाहुनी लग्नमंडपातील जोडी
जणू ते शोधत जीवनातील गोडी ,
वाटे मला दोस्त काढतील माझीच खोडी,
भासे मज माझ्या जीवनाची गाडी ।
नातवंडांना खेळवत असणाऱ्या बापाला पाहून,
वाटे मीच चिमुकल्यांना खेळावतोय जाऊन ,
खेळण्याचा खच पडलेला पाहून ,
भासे लेकरांसाठी खूप केलं राबून ।
साठी ओलांडल्याने झालो अडगा ,
जीवन माझा बनला कोडगा,
भासे मी पुन्हा झालो दांडगा ,
असाच होत गेलो मी बुडगा ।
*भाविक अलंकार प्रस्तुत*
*बुडगा*
*श्री सुनिल नरसिंग राठोड, मुरूम मो .9763961999.*
2 Comments
सूनिलजी.....
ReplyDeleteखूपच छान भावना या कवितेतून प्रतित होतात. आपल्या विचारांची शक्ती आणि शब्दांची खरी ताकत या कवितेतून खूप कांहीं सांगून जाते.
धन्यवाद मॅडम
Delete