Good Thoughts in Marathi
फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून
दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !
अपयशाने खचू नका; अधिक जिद्दी व्हा.
दु:ख कवटाळत बसू नका;
ते विसरा आणि सदैव हसत रहा.
आपल्यामुळे दुसऱ्याला दु:ख होईल
असे कधीही वागू नका.
निघून गेलेला क्षण
कधीच परत आणता येत नाही.
उद्याचं काम आज करा
आणि आजचं काम आत्ताच करा.
चुकीचा व्यवहार माणसं तोडतो
म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
नवं काहीतरी शिकण्यासाठी
मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.
माणसाची चौथी मूलभूत गरज म्हणजे पुस्तक.
सत्याने मिळतं तेच टिकतं.
जो दुसऱ्यांना देतो त्याला देव देतो.
परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय
कुठलेही कार्य सिध्दीस जात नाही.
Marathi Suvichar
हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे;
मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !
स्वप्न आणि सत्य यात साक्षात परमेश्वर उभा असतो.
प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.
खरी श्रीमंती शरीराची, बुध्दीची आणि मनाची.
तडजोड हे आयुष्याचं दुसरं नाव आहे.
वाहतो तो झरा आणि थांबते ते डबकं !
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस !
जो गुरुला वंदन करतो;
त्याला आभाळाची उंची लाभते.
गर्वाचं घर नेहमीच खाली असतं.
झाडावर प्रेम करणारा
माणूस सदैव प्रसन्नच असतो.
माणसाचा सगळ्यात मोठा
सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.
क्रांती हळूहळू घडते;
एका क्षणात नाही.
बाह्यसौंदर्यापेक्षा अंतर्गत
सौंदर्य जास्त मोलाचं असतं.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही
श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
चुकतो तो माणूस
आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !
मित्र परिसासारखे असावेत
म्हणजे आयुष्याचं सोनं होतं.
छंद आपल्याला आयुष्यावर
प्रेम करायला शिकवतात.
आपण जे पेरतो तेच उगवतं.
फ़ळाची अपेक्षा करुन
सत्कर्म कधीच करु नये.
उशीरा दिलेला न्याय हा
न दिलेल्या न्यायासारखा असतो.
शरीराला आकार देणारा
कुंभार म्हणजे व्यायाम.
प्रेम सर्वांवर करा पण
श्रध्दा फ़क्त परमेश्वरावरच ठेवा.
आधी विचार करा; मग कृती करा.
आयुष्यात आई आणि
वडील यांना कधीच विसरु नका.
Good Thoughts in Marathi
खिडकी म्हणजे आकाश नसतं.
जगण्यात मौज आहेच पण
त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.
वाचन, मनन आणि लेखन म्हणजे अध्ययन.
भाकरी आपल्याला जगवते आणि
गुलाबाचं फुल कशासाठी जगायचं हे शिकवते.
कविता म्हणजे भावनांचं चित्र!
संभ्रमाच्या वेळी नेहमी
आपल्या कर्तव्याला प्राधान्य द्या.
तुम्ही जेवढं इतरांना द्याल तेवढंच,
किंबहुना त्याच्या कित्येक पटीने देव तुम्हाला देईल.
ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव !
स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका;
आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.
अनुभवासारखा दुसरा गुरू नाही.
तुलना करावी पण अवहेलना करू नये.
समाधानी राहण्यातच
आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे.
Marathi Thoughts
आयुष्यातल्या कोणत्याही क्षणी
क्रोधाचे गुलाम बनू नका.
मनात आणलं तर या जगात
अश्यक्य असं काहीच नाही.
चेहरा हा आपल्या
व्यक्तीमत्त्वाचा आरसा असतो.
व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका;
आहे तो परिणाम स्वीकारा.
आवडतं तेच करू नका;
जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.
तुम्ही किती जगलात ह्यापेक्षा
कसं जगलात याला जास्त महत्त्व आहे.
अश्रु येणं हे माणसाला
हृदय असल्याचं द्योतक आहे.
विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा.
मरण हे अपरिहार्य आहे
त्याला भिऊ नका.
Marathi Suvichar
आयुष्यात प्रेम करा ;
पण प्रेमाचं प्रदर्शन करू नका.
आयुष्यात कुठलीच नाती
ठरवून जोडता येत नाही.
प्रायश्चित्तासारखी दूसरी शिक्षा नाही.
तुम्ही जिथे जाल तिथे
तुमची गरज निर्माण करा.
सगळेच निर्णय मनाने घेऊ नका;
काही निर्णय बुध्दीलाही घेऊ द्या.
काळ्याकुट्ट रात्रीनंतर सुर्य उगवतोचं.
लखलखते तारे पाहण्यासाठी
आपल्याला अंधारातच राहवं लागतं.
चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.
तुमची उक्ती आणि कृती यात भेद ठेवू नका.
चांगला माणूस घडवणे
हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.
आयुष्यात सर्वात जास्त
विश्वास परमेश्वरावर ठेवा.
उलटा केलेला पिरॅमिड
कधीच उभा राहू शकत नाही.
पोहरा झुकल्याशिवाय
विहिरीतलं पाणी पोहऱ्यात जात नाही.
अत्तर सुगंधी व्हायला
फुले सुगंधी असावी लागतात.
मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू
अधिक दुःखदायक असतो.
रागाला जिकंण्याचा एकमेव उपाय – मौन !
Suvichar in Marathi
अती अशा हे दुःखाचं मूळ कारण आहे.
अंथरूण बघून पाय पसरा.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत;
ते मिळवावे लागतात.
तुम्हाला ज्या विषयाची माहिती आहे
त्याविषयी कमी बोला,
आणि ज्या विषयाची माहिती नाही
त्या विषयी मौन पाळा.
अतिशहाणा त्याचा बैल रिकामा.
संकटं तुमच्यातली शक्ती,
जिद्द पाहण्यासाठीच येत आसताच.
सौंदर्य हे वस्तूत नसते;
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा
आधी स्वतःशी प्रामाणिक रहा.
एकदा तुटलेलं पान झाडाला
परत कधीच जोडता येत नाही.
Marathi Suvichar
कामात आनंद निर्माण केला की
त्याचं ओझं वाटत नाही.
आयुष्यात खरं प्रेम,
खरी माया फार दूर्मिळ असते.
ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत
त्या नष्ट करण्याचा आधिकार आपल्याला नाही.
कुणीही चोरू शकत नाही
अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.
देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे
घेता घेता एक दिवस, देणाऱ्याचे हात घ्यावे !
आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्याला जमतील असं नाही.
मूर्खांना विवेक सागंणे हाही मूर्खपणाच !
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही
त्यात नाक खुपसले की तोटाच होतो.
जे झालं त्याचा विचार करू नका;
जे होणार आहे त्याचा विचार करा.
मराठी सुविचार
आपल्याला जे आवडतात त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करा.
जे आपले आहेत त्यांच्यावर कुणीही प्रेम करतं;
पण जे आपले नाहीत त्यांच्यावर प्रेम करणं हेच खरं प्रेम !
लक्षात ठेवा-आयुष्यात
कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते.
कधी कधी आपण ज्यांच्यावर खूप प्रेम करतो
तीच माणसं आपल्यापासून फार दूर जातात.
जे आपले नाही त्याच्यावर कधीच हक्क सांगू नका.
पुढचा आपल्याशी चांगला वागेल
या अपेक्षेने त्याच्याशी चांगलं वागू नका.
आयुष्यात भेटणारी सगळीच माणसे सारखी नसतात.
गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !
कुठल्याही कामाला अंतःकरणाचा उमाळा लागतो.
स्वतःचा अवगुण शोधणं हीच गुणांची पूर्तता !
ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही
तो दिवस फुकट गेला असं समजा.
Pu La Deshpande Quotes
जो स्वतःवर प्रेम करू शकत नाही
तो जगावर काय प्रेम करणार !
सृजनातला आनंद कल्पनेच्या पलीकडचा असतो.
श्रध्दा असली की सृष्टीतल्या प्रत्येक गोष्टीत देव दिसतो.
आनंदी मन, सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा
ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.
तन्मयता नसेल तर; विद्वत्ता व्यर्थ आहे.
शिक्षण हे साधन आहे; साध्य नव्हे.
हसा, खेळा पण शिस्त पाळा.
आयुष्यात काय गमावलंत ह्यापेक्षा
काय कमावलंत ह्याचा विचार करा.
स्वतः जगा आणि दुसऱ्यालाही जगू द्या.
तूच आहेस तूझ्या जीवनाचा शिल्पकार !
काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
काळजाची प्रत्येक जखम भरून येते कारण
काळ दुःखावर मायेची फुंकर घालत असतो.
एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो
म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.
हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे
व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे!
या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे.
तुम्हाला मोठेपणी कोणं व्हायचंय
ते आजच ठरवा, आत्ताच !
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहीजे.
दुसऱ्यांच्या गुणाचं कौतुक
करायलाही मन मोठं लागतं.
माणूस म्हणजे गुण व दोष यांचे मिश्रण आहे.
प्रत्येक क्षण अपल्याला
काही ना काही शिकवत असतो.
व्यायामामुळे बुध्दी आणि मन
दोहोंचे सामर्थ्य प्रभावी होते.
काट्याविना गुलाबाचा कोमलपणा व्यर्थ असतो.
दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका;
वाटू शकलात तर आपला आनंद वाटा
बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी
अंतःशत्रूचीच अधीक भीती असते.
चिंता ही कुठल्याच दुःखावरचा
उपाय होऊ शकत नाही.
तलवारीच्या जोरावर मिळवलेलं
राज्य तलवार असेतोवरच टिकतं.
दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे
त्याच्या दुःखातला सहभाग होय.
जगू शकलात तर चंदनासारखे जगा;
स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या.
बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी
हे मधमाश्यांकडून शिकावं.
तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे.
गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर.
Whatsapp Suvichar Marathi
प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची शक्ती.
आपले सौख्य हे आपल्या विचारांवर अवलंबून असते.
जे घाईघाईने वर चढू पाहतात ते कोसळतात.
उषःकाल कितीही चांगला असला तरी
सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.
लज्जा हा सौंदर्याचा अलंकार आहे.
मोहाचा पहिला क्षण,
ही पापाची पहिली पायरी असते.
जीवन नेहमीच अपूर्ण असते
आणि ते अपूर्ण असण्यातच
त्याची गोडी साठवलेली असते.
सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते.
जगात सारी सोंगे करता येतात,
पण पैशाच सोंग करता येत नाही.
जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा
ताज्या करण्यात शहाणपणा नसतो.
Marathi Suvichar
क्रांती तलवारीने घडत नाही;
तत्वाने घडते.
जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल,
तर खाचखळगे पार करावेच लागतील.
जीवन ही एक जबाबदारी आहे.
क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं.
जीवन जगण्याची कला हीच
सर्व कलांमध्ये श्रेष्ठ कला आहे.
सुख हे दुःखाचे मोल देऊनच मिळते.
श्रीमंताचे बंगले चांगले असतात पण म्हणून
कोणी आपल्या झोपड्या पाडत नाही.
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
उषःकालाकडे जाण्याचा एकमेव मार्ग आहे,
तो म्हणजे रात्र.
ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत
त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये.
जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात,
त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नही.
दोष लपवला की तो मोठा होतो
आणि कबूल केला की नाहीसा होतो.
Sundar Vichar Marathi
जखम करणारा विसरतो पण
जखम ज्याला झाली तो विसरत नाही.
पिंजऱ्यात कोंडून पाखरं
कधीच आपली होत नाहीत.
आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये;
परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे.
मोती होण्यासाठी जलबिंदूला आकाशातून
आपला अधःपात करून घ्यावा लागतो.
शहाणपणाचे प्रदर्शन करणारा
पोपट कायमचा बंदिवान होतो.
गवताची दोरी वळली म्हणजे
तिने मत्त हत्तीसुध्दा बांधला जातो.
दुर्जन मंडळीत बसण्यापेक्षा एकटे बसणे बरे
आणि एकटे बसण्यापेक्षा
सज्जन मंडळीत बसणे हे त्याहून बरे.
चारित्र्याचा विकास सुसंगतीत होतो
तर बुध्दीचा विकास एकांतात होतो.
Sundar Vichar Marathi
क्रोध माणसाला पशू बनवतो.
आपल्या दोषांवरचे उपाय
नेहमी आपल्याकडेच असतात;
फक्त ते शोधण्याची तसदी घ्यावी लागते.
आयुष्यात पैसा हवा पण पैशात आयुष्य नको.
कडू घोट प्रेमळ माणसाच्या
हातून दिल्यास तो कमी कडू लागतो.
भरणाऱ्या जखमा भरू द्याव्यात;
त्याची खपली काढू नये.
बोलावे की बोलू नये,
असा संभ्रम निर्माण झाला असता
मौनाने बोलण्याची जागा घ्यावी.
शत्रूने केलेले कौतुक
हीच आपली सर्वोत्तम कीर्ती होय.
तिरस्कार पापाचा करा;
पापी माणसाचा नको.
जरूरीपेक्षा अधिक गरजांचा हव्यास ठेवू नका.
आपलं जे असतं ते आपलं असतं
आणि आपलं जे नसतं ते आपलं नसतं.
Marathi Suvichar
जो धोका पत्करण्यास कचरतो,
तो लढाई काय जिंकणार !
हृदये परस्परांना द्यावीत,
ती परस्परांच्या अधीन करू नयेत.
कर्तव्य पार न पाडता हक्कांच्या मागे
धावलात तर हक्क दुर पळतात.
हाव सोडली की मोह संपतो
आणि मोह संपाला की दुःख संपते.
आपण कसे दिसतो यापेक्षा
कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
न मागता देतो तोच खरा दानी.
चांगले काम करायचे मनात
आले की ते लगेच करून टाका.
मराठी सुविचार
केवड्याला फळ येत नाही पण
त्याच्या सुगंधाने तो
अवघ्या जगाला मोहवून टाकतो.
भितीयुक्त श्रीमंत जीवन जगण्यापेक्षा
शांततामय, मानाचे गरीब जीवन चांगले.
निश्चयी भिकारी हा अनिश्चयी
सम्राटापेक्षा कितीतरी श्रेष्ठ असतो.
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
जशी दृष्टी तशी सृष्टी.
सत्तेशिवाय शहाणपन काय कामाचे!
Marathi Suvichar Images
निःस्वार्थी मन हाच सर्वोच्च आदर्श आहे.
माणसाची खरी ओळख
त्याच्या अंतःकरणाच्या नम्रतेने होते.
कृतीपेक्षा वृती महत्त्वाची असते.
आपला चेहरा हा आपल्या मनाचा आरसा असतो.
बुध्दीला पटल्याशिवाय
कोणताही विचार स्वीकारू नका.
संकटात उडी घेऊन जे कार्य करतात
त्यांनाच विजयश्री हार घालते.
हिंसा हे दुर्बलांचे शस्त्र आहे,
अहिंसा हे सबलांचे.
परीसाच्या स्पर्शाने लोखंडाचंही सोनं होतं.
शहाणा माणूस चुका विसरतो,
पण त्याची कारणे नाही.
कर्तव्याची दोरी नसली की
मनाचा पतंग कुठेही फडफडत राहतो.
मी माझ्यासाठी आहे त्यापेक्षा
मी कुणासाठीतरी आहे
ही भावनाच किती श्रेष्ठ !
Marathi Suvichar
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे
कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते;
ज्ञान तुमचेच रक्षण करते.
विज्ञानाचं तंत्र शिका
पण जगण्याचा मंत्र हरवू नका.
जो स्वतःला ओळखत नाही,
तो नष्ट होतो.
न्यायाची मागणी करणाऱ्याने
स्वतः न्यायी असले पाहिजे.
साधेपणात फार मोठे सौंदर्य असते.
जो मूळ सोडून फाद्यांचा शोध घेतो तो भरकटतो.
दुर्बल मनाचा मनुष्य
कधीच महात्मा होऊ शकत नाही.
अन्न हे पूर्णब्रह्म आहे;
त्याचा अनादर करू नका.
ज्याच्या डोळ्यात आत्मविश्वासाचे अंजन असते;
तो कूठल्याही काळोखातून सहज मार्ग कढतो.
डोक्यावर बर्फ व जीभेवर साखर
असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात
कोणी कितीही चिडवण्याचा प्रयत्न केला
तरी मनावर संयम ठेवणे,
शांत राहणे हेच खरे शौर्याचे लक्षण आहे.
अपयशाची भीती ही सर्वात मोठी भीती होय.
तलवार ही शौर्याची नव्हे;
भीतीची निशाणी आहे.
Success Marathi Suvichar
जूलूम सहन करणे म्हणजे सोशिकपणा नव्हे,
परमार्थही नव्हे, ती केवळ लाचारी आहे.
माणूस नेहमी प्रगतीशील असला
तरच मोठा होण्यासाठी धडपडतो .
अल्पसंतूष्ट माणूस निष्क्रीय बनतो .
जीभ जिंकणारा जग जिंकतो.
गुलाब पाणी देणाऱ्या हातांना
त्याचा सुगंध चिकटल्याशिवाय राहत नाही.
जीवनाला अखेरची रेषा नसते.
ते क्षितिजासारखे रुंदावणारे आहे.
मराठी सुविचार
विचार कराण्यासाठी वेळ द्या.
पण एकदा का कृती करण्याची वेळ आली की
विचार करणे थाबंवा
आणि स्वतःला कार्यात झोकून द्या.
प्रेमाशिवाय सेवा व्यर्थ आहे.
प्रेम नसताना जर कोणी सेवा केली असेल
तर ती सेवा नसते, तो व्यापार असतो.
पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे अधिक महत्त्वाचे असतात.
अंधारातच प्रकाशाची खरी किंमत कळते.
अपराध्याला पुन्हाःपुन्हा क्षमा करणं
हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं आहे.
समुद्राचा तळ शोधल्याशिवाय
मोती मिळत नाहीत.
Marathi Suvichar
फांदीला फुलांचं ओझं कधीच वाटत नाही.
पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.
दुसऱ्याला सावली देण्यासाठी
झाडाला स्वतः उन्हात उभं राहावं लागतं.
श्रध्देच्या जोरावर
असाध्य गोष्टी साध्य करता येतात.
क्रोधाच्या एका क्षणी संयम राखला तर
पश्चातापाचे शंभर क्षण वाचतात.
आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो की
दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते.
जीवन हा हास्य आणि
अश्रू यांचा सुरेख संगम आहे.
जे तलवार चालवतील ते
तलवारीनेच मरतील.
विचार परीपक्व झाले की शब्दांचे
रूप देऊन कागदावर उतरवता येतात.
नाव ठेवणे सोपे आहे,
परंतु नाव कमावणे खूप अवघड.
राजाला फक्त राज्य मानते,
तर बुध्दीवंताला संपूर्ण विश्व.
निंदकाचे घर असावे शेजारी.
लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे
यापेक्षा तुमचे स्वतःबद्दल
काय मत आहे हे महत्त्वाचे.
कुरूप मनापेक्षा कुरूप चेहरा चांगला.
मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे,
तर कर्तृत्त्वावर अवलंबून असते.
कीर्ती ही सावलीप्रमाणे
सदगुणांबरोबर वावरत असते.
औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं
आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं.
हात उगारण्यासाठी नसतात;
उभारण्यासाठी असतात.
Marathi Suvichar for Students
तुमचे सौख्य तुमच्या
विचारांवर अवलंबून असते.
ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात
तो कधीही एकटा नसतो.
लोखंडाने सोन्याचे कितीही तुकडे केले
तरी सोन्याची किंमत कमी होत नाही.
दुःखाची चव घेण्यापेक्षा ते
पचवण्यात अधिक गोडी आहे.
सूड घेण्यापेक्षा क्षमा करणे अधिक चागंले.
प्रत्येक काळ्या ढगाला
रूपेरी किनार असते.
आपले सत्यस्वरुप सिध्द करण्यास सोन्याला
अग्नीत शिरुन दिव्य करावे लागते
व हिऱ्याला घणाचे घाव सोसावे लागते.
आचाराच्या उंचीवरच
विचारांची भव्यता अवलंबून असते.
आशा ही उत्साहाची जननी आहे.
अपयश म्हणजे संकट नव्हे;
आपल्याला योग्य मार्गावर आणणारे
ते मार्गस्थ दगड आहेत.
आईच्या डोळ्यातील रागाच्या पाठीमागे
वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.
आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो.
Marathi Suvichar Sangrah
आशा हीच जीवनाची
सर्वात मोठी शक्ती असते !
अखंड यशाने आपल्या जीवनाची
केवळ एकच बाजू कळते.
दुसरी बाजू कळण्यासाठी
अपयशाची जरुरी असते.
अंधारच नसता तर चमकणाऱ्या
ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती.
संकलन श्री राठोड सुनिल नरसिंग मुरूम
0 Comments