How to fill Inspire Award nomination of Student , ( इंस्पायर अवॉर्ड साठी मुलांची माहिती online कसे भरावे पहा स्टेप बाय स्टेप )

     

How to fill Inspire Award nomination of Student , ( इंस्पायर अवॉर्ड साठी मुलांची माहिती online कसे भरावे पहा स्टेप बाय स्टेप )


Step no 1 

👉सर्वप्रथम तुम्हाला गुगलमध्ये इन्स्पायर अवॉर्ड (INSPIRE AWARD)असे सर्च करायचे आहे



Step no 2 

 👉यानंतर सुरुवातीला जो एक नंबरला INSPIRE Award म्हणून नाव येतं त्यावर तुम्हाला क्लिक करायचा आहे



Step no 3

👉 यानंतर खालील चित्रात स्कूल अथोरिटी (SCHOOL ATHORITY) जेथे दिसतं त्या ठिकाणी  आपल्याला क्लिक करायचा आहे



Step no 4

👉 स्कूल अथोरिटी ओपन झाल्यानंतर पुढे आपल्याला खाली स्क्रोल करत गेल्यानंतर टू लॉगिन क्लिक हिअर वर क्लिक करून आपल्या लॉगिन या पेजवर जावयाचे आहे


Step no 5

👉 यानंतर  पुढील प्रकारचे पेज ओपन होईल या पेजवर तुमच्या शाळेचा या पूर्वी रजिस्ट्रेशन झाले असेल तर शाळेचा युजर आयडी व पासवर्ड  टाकायचा आहे आणि त्याखाली कॅप्चा कोड  दिलेला आहे तो जसेच्या तसे आपल्याला टाईप करून लॉगिन या बटनावर क्लिक करावयाचे आहे. पण यापूर्वी आपण कधीच इंस्पायर अवॉर्ड साठी रजिस्ट्रेशन केला नसेल तर प्रथम शाळेचा रजिस्ट्रेशन करून घेणे व त्यामार्फत मिळालेला यूजर आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन होणे


Step no 6

👉 लोगिन केल्यानंतर वेलकम स्कूल अथोरिटी अंडर द इंस्पायर अवार्ड मानक या पेजवर आपण आल्यानंतर  समोर दिसत असलेल्या पेज वरील स्टुडन्ट नोमिनेशन वर क्लिक करून विद्यार्थ्यांची माहिती भरायला चालू करावी


Step no 7 

👉 यानंतर पुढील पेज ओपन होईल त्यावर  पर्टीकुलर ऑफ द स्टुडंट असे लिहिले असेल त्यात स्टुडन्ट नेम बँक पासबुक वर जे आहे तो टाकायचा आहे ,फादर्स नेम ,मदर्स नेम ,जेंडर , डेट ऑफ बर्थ ,आधार कार्ड नंबर असेल तर ठीक नसेल तर चालेल ,कॉन्टॅक्ट नंबर पालक,  फिजिकल हॅंडीकॅप असेल तर ,  तसेच ई-मेल अड्रेस असेल तर, टाकावे तसे ते अनिवार्य नाही,  क्लास कम्पल्सरी आहे, कॅटेगरी कम्पल्सरी आहे, त्यानंतर आयडिया इंनोवेशन टायटल यात आपण जे प्रयोग सादर करणार आहोत या प्रयोगाचे टायटल याठिकाणी भरायचे आहे ,  त्यानंतर त्यांचे 300 शब्दात माहिती भरायची हे सर्व इंग्लिश मध्ये भरावे यानंतर टीचर नेम या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून विज्ञान शिकवणाऱ्या  शिक्षकाचे नाव भरावयाचे आहे 


Step no 8 

👉 यानंतर डिटेल्स ऑफ बँक अकाउंट ऑफ नॉमिनेट स्टुडंट्स फोर रिसिविंग अमाऊंट टेन थाउजंड रुपीज थ्रू Ecs यामध्ये विद्यार्थ्यांचे बँक अकाउंट ज्या बँकेत आहेत त्या बँकेचे नाव व पत्ता भरावयाचे आहे,  विद्यार्थ्यांच्या  अकाउंट नंबर , अकाउंट होल्डर नेम, आयएफएससी कोड,  इत्यादी माहिती भरून सबमिट करावे .


Step no 9

👉 बँक डिटेल्स माहिती भरल्यानंतर पुढील जो पेज आहे त्या पेजवर तुम्हाला विद्यार्थ्यांचा फोटो अपलोड करायचा आहे, तो फोटो स्कॅन करून हा फोटो 10mb पेक्षा जास्त आकाराचा राहू नये याची काळजी घ्यावी,तसेच हा फोटो जेपीजी या फॉरमॅट मध्ये असावे, तसेच आपण दिलेला जो प्रोजेक्ट आहे त्याच्या माहिती चा फोटो काढून अपलोड करायचा आहे तसेच आपण  जो प्रोजेक्ट तयार करणार आहोत त्याचा  फोटो  अपलोड करावयाचा आहे , तसेच जर   प्रोजेक्टची माहिती असणारा व्हिडिओ असेल तर त्याला अपलोड करावे नसेल तरी चालेल , ययानंतर सेव अँड ऍड आनादर स्टुडन्ट वरती क्लिक करून पुढील दुसरा विद्यार्थी भरा 


धन्यवाद वरील ही माहिती पर्याय आहे इतकी माहिती मिळाली की आपल्याला फॉर्म भरता येतो आणि स्टेप बाय स्टेप मध्ये आपण हा फॉर्म भरून कम्प्लेंट करू शकतो , तर वेळ खूप कमी आहे जास्तीत जास्त शिक्षकांनी आपल्या शाळेतील इयत्ता 6 वी ते आठवीपर्यंतच्या शाळा असतील किंवा दहावी पर्यंतची शाळा आहेत या शाळेवर प्रत्येकांनी  जास्तीत जास्त पाच विद्यार्थ्यांना आपल्याला नॉमीनेट करायचा आहे व कमीत कमी दोन विद्यार्थी या ठिकाणी भरला तरी चालेल. पण  जास्त विद्यार्थी असलेली शाळा असेल  तर पाच विद्यार्थी आपण आवश्यक त्या ठिकाणी भरावयाचे आहे .धन्यवाद🙏


 माहिती व संकलन

 श्री सुनील नरसिंग राठोड मुरुम ता उमरगा 

Post a Comment

0 Comments