छत्रपती शिवाजी महाराज शेर शायरी , whatsapp status wallpapers 2021( chhatrapati Shivaji maharaj sher shayari best shayari )

                                    आपण जाणतोच की महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दांपत्यापोटी शिवनेरी किल्ल्यावर (जुन्नर तालुका – पुणे जिल्हा) झाला. त्यांच्या जन्म-तिथीविषयी एकमत नाही. मराठी बखरींच्या आधारावरून त्यांचा जन्म १६२७ मध्ये झाला; पण जेधे शकावली, कवींद्र परमानंद याचे शिवभारत आणि राजस्थानात उपलब्ध झालेल्या जन्मपत्रिका, या विश्वसनीय साधनांवरून फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख बहुतेक इतिहाससंशोधकांनी आणि आता महाराष्ट्र शासनानेही निश्चित केली आहे. शिवाजी महाराजांचे पूर्वज चितोडच्या सिसोदिया घराण्यातील होते, अशी लौकिक समजूत आहे. हे घराणे दक्षिणेतील होयसळ वंशातील आहे, असेही संशोधन पुढे आले आहे. मालोजी हे या घराण्यातील पहिले कर्तबगार पुरुष. त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुलगे होते. मालोजी हे निजामशाहीतील एक कर्तबगार सरदार होते. मालोजी व त्यांचे बंधू विठोजी यांच्याकडे औरंगाबादजवळचे वेरुळ, कन्नड व देऱ्हाडी (देरडा) हे परगणे मुकासा (जहागीर) म्हणून होते. शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजी मरण पावले. त्यांच्या नावाची जहागीर शहाजींच्या नावाने राहिली.



निजामशाहीच्या दरबारातील खंडागळेच्या हत्तीच्या प्रकरणावरून शहाजी व लखूजी जाधव यांच्यात वितुष्ट आले, ते पुढे कायम राहिले. शहाजींनी १६२० पासून निजामशाहीच्या बाजूने आदिलशाहीविरुध्द लढण्यास सुरुवात केली होती; पण १६२४ मध्ये भातवडीच्या लढाईत पराक्रम करूनही त्यांचा सन्मान झाला नाही, म्हणून ते आदिलशाहीस मिळाले; पण इब्राहिम आदिलशहाच्या मृत्युनंतर ते पुन्हा निजामशाहीत आले.



छत्रपती शिवाजी महाराज शेर शायरी wallpapers 2021( chhatrapati Shivaji maharaj sher shayari best shayari )


ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरी, माहुली (ठाणे जिल्हा) व पुणे येथे गेलेले दिसते. बंगलोरलाही ते काही काळ राहिले. शिवाजी आणि जिजाबाई यांच्याकडे महाराष्ट्रातील जहागिरीची व्यवस्था सोपवून शहाजीराजांनी त्यांची पुण्याला रवानगी केली. जहागिरीची प्रत्यक्ष व्यवस्था पाहण्यासाठी शहाजींनी दादोजी तथा दादाजी कोंडदेव आणि आपले काही विश्वासू सरदार यांची नेमणूक केली.





जिजाबाईंचा देशाभिमान, करारीपणा आणि कठीण प्रसंगांतून निभाऊन जाण्यासाठी लागणारे धैर्य, या त्यांच्या गुणांच्या तालमीत शिवाजीराजे तयार झाले. त्यांच्या या शिकवणीतून शिवाजीराजांना स्वराज्यस्थापनेची स्फूर्ती मिळाली. आपल्या जहागिरीच्या संरक्षणासाठी गड, किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजेत, ही जाणीव त्यांना बालवयापासून झाली. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्युनंतर (१६४६-४७) शिवाजीराजांनी प्रत्यक्ष कारभार हाती घेतला. त्यांनी गड आणि किल्ले आपल्या ताब्यात घेण्यासाठी अनेक मोहिमा आखून यशस्वी रीत्या पार पाडल्या. या कामात त्यांना आपल्या मातोश्रींचे आशीर्वाद होतेच.



छत्रपती शिवाजी महाराज शेर शायरी wallpapers 2021( chhatrapati Shivaji maharaj sher shayari best shayari )


जसे शिवाजी महाराजांनी आपल्या उपक्रमाची सुरुवात सावधपणे केली. आपल्याशी सहमत होणारे समवयस्क तरुण त्यांनी जमविले आणि देशमुख, देशपांडे, वतनदार इत्यादींशी त्यांनी निरनिराळ्या प्रकारे संबंध जोडले. शिवाजी महाराजांना आठ पत्नी असल्याचे उल्लेख मिळतात. त्यांपैकी सईबाई (निंबाळकर) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला. त्यानंतर सोयराबाई (मोहिते), पुतळाबाई (पालकर), सकवारबाई (गायकवाड), काशीबाई (जाधव) व सगुणाबाई (शिर्के) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. यांशिवाय इंगळे व आणखी एका घरण्यातील मुलीबरोबरही त्यांचा विवाहसंबंध झाला.
              महाराजांना सईबाईपासून संभाजी (१६५७ –८९) व सोयराबाईपासून राजाराम (१६७०–१७००) असे दोन मुलगे झाले. याशिवाय त्यांना सहा कन्याही होत्या. सईबाई १६५९ मध्ये मरण पावल्या आणि काशीबाई राज्याभिषेकापूर्वी मरण पावल्या (१६७४). पुतळाबाई महाराजांबरोबर सती गेल्या. सोयराबाई संभाजींच्या कारकीर्दीत १६८१ मध्ये आणि सकवारबाई शाहूंच्या कारकीर्दीत मरण पावल्या. महाराजांनी पुण्याच्या परिसरातील मोकळ्या टेकड्या, पडके किल्ले, दुर्गम स्थळे हळूहळू आपल्या ताब्यात आणली. राजगड आणि तोरणा किल्ला (प्रचंडगड) महाराजांनी हस्तगत केला. महाराजांना येऊन मिळालेल्या अनुयायांत पुढे प्रसिध्दीस आलेली कान्होजी जेधे, नेताजी पालकर (समकालीन कागदपत्रांनुसार नेतोजी पालकर), तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर इ. नावे आढळून येतात.

छत्रपती शिवाजी महाराज शेर शायरी wallpapers 2021( chhatrapati Shivaji maharaj sher shayari best shayari )

            भोरजवळ रोहिडेश्वरासमोर स्वराज्यनिष्ठेची शपथ घेतल्याची कथा ही याच सुमारास असावी. जी स्थळे आपण घेतली, ती विजापूर राज्यातील सुरक्षितता कायम रहावी या हेतूनेच, अशी भूमिका महाराजांनी घेतली. विजापूर दरबारनेही सुरुवातीस महाराजांच्या या चळवळीकडे फारसे लक्ष दिले नाही; पण महाराजांनी कोंडाण्याच्या (सिंहगडच्या) किल्लेदाराला आपलेसे करून तो आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी मुहंमद आदिलशहाचे डोळे उघडले. महाराजांच्या विरुध्द विजापूरचे सैन्य चालून गेले. दक्षिणेत विजापूरच्या सैन्यात शहाजीराजे हे अधिकारी म्हणून जिंजीच्या किल्ल्यासमोर तळ देऊन होते. त्यांच्यावर फितुरीचा आरोप ठेवण्यात येऊन त्यांना कैद करण्यात आले (१६४८) आणि त्यांना विजापूरला आणण्यात आले. या काळात पुरंदरच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी निकराचा लढा देऊन विजापूरचे सैन्य उधळून लावले (१६४८ अखेर).
सैन्याची इतर भागांतील आक्रमणेही परतवण्यात आली. शहाजी राजांना काय शिक्षा होईल, याची काळजी महाराज आणि जिजाबाई यांना पडली. त्यावेळी दक्षिणेचा मोगल सुभेदार म्हणून शाहजहानचा मुलगा मुरादबख्श हा औरंगाबाद येथे कारभार पहात होता. त्याच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्याच्या मार्फत विजापूरवर दडपण आणण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. कोंडाण्याचा किल्ला परत द्यावा, ही अट आदिलशहाने घातली. किल्ला परत देण्यास महाराज नाखूष होते; तथापि सोनोपंत डबीर याने शिवाजी महाराजांची समजूत घातली. सिंहगडचा किल्ला आदिलशहाकडे परत करण्यात आला. त्यानंतर शहाजींची सुटका होऊन (१६४९) त्यांची बंगलोरला सन्मानाने रवानगी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज शेर शायरी wallpapers 2021( chhatrapati Shivaji maharaj sher shayari best shayari )



स्थापूनी हिंदी स्वराज्य आपुले, शौर्याने लिहिली इतिहास गाथाअसा हा जाणात राजा माझा, तयाच्या चरणी झुकवितो माथा




छत्रपती शिवाजी महाराज शेर शायरी wallpapers 2021( chhatrapati Shivaji maharaj sher shayari best shayari )





गगनभेदी नजर ज्याची, पहाडसम विशाल काया
धगधगता सूर्य ही झुकतो, आणि वंदितो प्रभू शिवराया




छाती होती पोलाद ज्याची, डोळ्यात ज्याच्या अंगार
त्या माझ्या शिवबाचा आज, गर्जा जयजयकार










छत्रपती शिवाजी महाराज शेर शायरी wallpapers 2021( chhatrapati Shivaji maharaj sher shayari best shayari )



बहादुरी मेरी आत्मा है!
विचार और विवेक मेरी पहचान है!
क्षत्रिय मेरा धर्म है!
छत्रपति शिवराय मेरे भगवान हैं!
हाँ मैं मराठी हूँ!
जय शिवराय !!







छत्रपती शिवाजी महाराज शेर शायरी wallpapers 2021( chhatrapati Shivaji maharaj sher shayari best shayari )







वे ही जीवित थे
वह एक जीवित महाराष्ट्र था
लेकिन अपने ही परिवार को भूल जाना
जनता से हाथ मिलाते हुए।
यह “आपका शिव” था
जय शिवराय







छत्रपती शिवाजी महाराज शेर शायरी wallpapers 2021( chhatrapati Shivaji maharaj sher shayari best shayari )










छत्रपती शिवाजी महाराज शेर शायरी wallpapers 2021( chhatrapati Shivaji maharaj sher shayari best shayari )







बिजली की तलवार की तरह,
हिंदुस्तान ने छाती पीट ली,
अफ्ज़खान बैग में बाघ के नाखून
मुट्ठी भर मावल के साथ हजारों शैतान भाग गए!
जब वे स्वर्ग में चढ़े, तब देवों ने उन्हें प्रणाम किया।
उन में से एक “मरदा मराठा शिवबा” बन गया …







छत्रपती शिवाजी महाराज शेर शायरी wallpapers 2021( chhatrapati Shivaji maharaj sher shayari best shayari )













छत्रपती शिवाजी महाराज शेर शायरी wallpapers 2021( chhatrapati Shivaji maharaj sher shayari best shayari)



सत्याची ती ढाल होती, निष्ठेची तलवार होती
विरतेचा भाला होता, हर हर महादेव नारा होता

सह्याद्रीची साथ होती, घोड्यांच्या टापांचा नाद
कडेकपारीत फिरत होता, मर्द मराठ्यांचा वाघ

सूर्याची जी मशाल आहे, शिखराप्रमाणे विशाल आहे
अस्तित्वचा प्रश्न असेल तर तूच एक मिसाल आहेस, जय शिवराय

छत्रपती शिवराय प्रत्येक मावळ्यांच्या मनात
आहे अढळ श्रद्धास्थान, जाणता राजा आहे माझा न्यायालंकार पंडित

त्याची किर्ती आहे अवघ्या त्रिभवनी अखंडित
ज्याची गरूडाची नजर, माता भगिनींबद्दल आदर
प्रत्येकाच्या मनात केलं घर, तेच छत्रपती आणि त्यांचा कायम आदर

रयतेचा तो राजा, पुत्र महाराष्ट्राच्या मातीचा
जिजाऊच्या आशिर्वादाने केली, ज्याने स्वराज्याची स्थापना
असा तो वीर शिवाजी, जाणता राजा माझा















Post a Comment

0 Comments