अभ्यास करण्याच्या पद्धती Methods of Doing study At Home..

 


      सध्या सर्वत्र अभ्यास म्हंटले की मुलांच्या व मुलींच्या डोक्यावर  अट्या येतात कारण 

  • कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रतेची गरज असते. एखादा लोहार, सुतार, केशकर्तनकार किंवा सोनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणवितो. 
  •  एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात होउन नुकसान होण्याची शक्यता असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लोक कोणतीही पुस्तके वाचत नाहीत वा कोणत्या योगशिबीरातही जात नाहीत. 
  • सराव केल्याने आपोआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्याचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी "मनाच्या एकाग्रतेची" गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे.
  •  मनाची एकाग्रता नसेल तर साध्या-साध्या कामांमध्येही चुका होउ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामेदेखील अचूक होउन जातात.
  • मनाच्या एकाग्रतेमध्ये येणारे अडथळे कोणते?

      मनाची चंचलता ही सर्वात मोठी अडचण आहे. मन मोठे बलवान असते, चंचल असते. मनाला काबूत ठेवणे वा-याला पकडण्याएवढे अवघड असते. 

  • अखंड अभ्यास आणि अनासक्ती (वैराग्य) यांच्या सामर्थ्यानेच मनाला ताब्यात ठेवता येते असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगीतलेले आहे. मनाची एकाग्रता साधणे हे सहजसोपे नाही तसे अशक्यही नाही. आयुष्यात कोणत्याही गोष्टीत असाधारण यश प्राप्त करुन घ्यायचे असेल तर मनाच्या एकाग्रतेला पर्याय नाही. 
  • मनाची एकाग्रता साधण्यासाठी, ज्यासाठी ही एकाग्रता साधायची त्या ध्येयाप्रती, आपली अविचल श्रध्दा पाहिजे. ती गोष्ट प्राप्त करुन घेण्याची अपरिहार्यता मनाने स्विकारली पाहिजे. इतर अनेक पुरक गोष्टी एकाग्रता साधायला मदत करतील.

१. अभ्यासाला बसताना योग्य आसन असणे गरजेचे आहे. टेबल खुर्ची किंवा डेस्कसारखी उंच वस्तू घ्यावी. पाठीचा कणा ताठ राहील अशी बसण्याची स्थिती असावी. 
२. एकदा अभ्यासाला बसले की शरीर शक्यतोवर स्थिर ठेवावे, चुळबुळ करु नये. पेन किंवा पेन्सील चावणे, केस खाजविणे, विनाकारण इकडेतिकडे बघणे, वेडेवाकडे बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. 

३. एखाद्या विषयाचा अभ्यास सुरु केला की किमान तासभर तरी त्या विषयाला द्यायला हवा. याचे कारण असे की मन त्या अभ्यासघटकाशी समरस व्हायलाच दहा मिनिटे लागतात. 

४. अभ्यासाला बसल्यानंतर लगेच मनात ना-ना त-हेचे विचार येणे सहाजिक आहे. मन अभ्यासासाठी तयार नसते. तरीही दहा मिनिटे चिकाटीने अभ्यास करीत रहावे. .

५. अभ्यासाला बसण्याआधी घरच्यांना तशी कल्पना देउन "तासभर तरी मला बोलावू नका" असे सांगून ठेवावे. मोबाईलसारखे अडथळेही दूर ठेवावेत. 

६. अभ्यासाच्या ठिकाणी शांतता असणे अतिशय गरजेचे आहे. मनाला विचलीत न करणारे संगीत एकाग्रता वाढायला मदत करते. .

७. अभ्यास करताना अवधान राखणे खूप गरजेचे आहे. मन चंचल असते, उगीच कुठेतरी भटकत राहते किंवा दिवास्वप्नांमध्ये मग्न होते..

८. चकाट्या पिटण्याची सवय पूर्णत: सोडावी. ज्या विषयाशी आपल्याला काहीही घेणेदेणे नाही.

९. मन एकाग्र करण्याचा प्रयत्न केल्यावर डोके दुखत असेल तर तो शरीराचा दोष आहे.

१०. मनाच्या एकाग्रतेसाठी सर्वोत्तम पुरक साधन म्हणजे श्रध्दा. श्रध्देच्या सहाय्याने ध्येयाचा मार्ग सहज आक्रमिता येतो व त्यायोगे ध्येय प्राप्त करता येते..

११. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रेम. आपल्या आवडीच्या ठिकाणी वास करणे मनाला नेहमी आवडते. 

12.मनात एक प्रकारची जिद्द नेहमी मनपटलाच्या कोपऱ्यात तेवत ठेवा म्हणजे त्याची असून मधून आठवण येत राहील आणि पुन्हा प्रचंड शक्तीनिशी अभ्यासाला लागता येईल.

अशा प्रकारे अभ्यास करण्याची पद्धत अवलंबून अभ्यास केल्याने 100 टक्के अभ्यास होईल यात शंकाच नाही 

चला तर मग अभ्यासाला लागू ....


✍️श्री सुनिल नरसिंग राठोड ,मुरूम 

Post a Comment

0 Comments