5 जून हा दिन जागतिक पर्यावरण दिन म्हणून जगभरात मोठ्या प्रमाणात साजरा केेला जातो . सध्या नुसते साजरा करून चालणार नाही तर ते प्रत्यक्षात कृती करून दाखवणे गरजेचे आहे .
- जागतिक पर्यावरण दिन केंव्हापासून साजरे होऊ लागले ?
तर याची १९७२ साली युनोच्या सर्वसाधारण सभेने, मानव व पर्यावरण याविषयी आयोजित केलेल्या परिषदेत, पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी राजकीय, औद्योगिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर कृतिशील सहभाग मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवले गेले.
त्यानुसार शाश्वत विकासावर भर देण्यात येत आहे. शेवटी 1974 पासून संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस साजरा करायला सुरुवात केली आणि त्यानंतर दरवर्षी एक थीम ठरवून जगभरातली सरकारं, उद्योग, विविध संस्था पर्यावरणाशी संबंधित त्या विषयासाठी प्रयत्न करत असतात. तसेच पर्यावरण संरक्षणाचे स्थान आणि त्यांच्या संवर्धनाची गरज लक्षात घेऊन १०० पेक्षाही जास्त सहभागी देशांमध्ये विविध प्रकल्प राबविले जात आहेत.
कारण निसर्गातील सजीवांच्या अनेक अन्नसाखळ्या तुटण्याच्या स्थितीला पोहोचल्या आहेत. अनेक सजीव पृथ्वीवरून कायमचे नष्ट झाले आहेत व होत आहेत. प्रदूषण वाढत आहे. हवामान बदलत आहे. आणि या सर्व स्थितीला आधुनिक मानवाची बेफिकीर जीवनशैली कारणीभूत आहे! २०५० मध्ये जगाची लोकसंख्या तब्बल ९.६ अब्ज असण्याची शक्यता आहे.
चंगळवाद भागवण्यासाठी मानवाने निसर्गाला ओरबाडणे असेच चालू ठेवले तर त्यावेळी पृथ्वीवर जगणेच मुश्किल होईल असा इशारा पर्यावरणतज्ज्ञांनी दिला आहे! जो कि कुठे न कुठे खरे होत असल्याचे पुरावे आता दिसू लागले आहेत .
म्हणजेच सरकारची यावर्षीची भूमिका हि 2021 वर्षासाठीची थीम आहे इकोसिस्टीम रिस्टोरेशन (Ecosystem Restoration). म्हणजे परिसंस्थेची हानी रोखत तिचं संतुलन भरून काढण्याचे प्रयत्न करणं. वर्षानुवर्षं आपण आपल्या पर्यावरणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहोत, आणि परिणामी पर्यावरणाचं नुकसान झालंय.
पर्यावरण रक्षक बना
पर्यावरण म्हणजेच Environment हा इंग्रजी शब्द Environ या फ्रेंच शब्दापासून तयार झाला आहे. सजीव-निर्जीव यांच्यामधील क्रिया-प्रतिक्रिया व आंतरक्रियांमधून साकार झालेली सजिवांच्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण असा याचा अर्थ होतो.
या परिस्थितीवरच समस्त जीवसृष्टी आणि पृथ्वी म्हणजेच वसुंधराचे अस्तित्व अवलंबून आहे. परंतु एकीकडे जल, वायू आणि मृदा प्रदूषणाचा वाढता अतिरेक, त्यामुळे पृथ्वीचे वाढणारे तापमान, निसर्गाचे बदललेले ऋतूचक्र, पर्जन्याचे कमी होत जाणारे प्रमाण, वारंवार निर्माण होणारा दुष्काळ, तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, पाण्याचा मर्यादित साठा, भरमसाठ होणारा अपव्यय या आणि अशा अनेक कारणांमुळे केवळ मानवजातच नव्हे तर पृथ्वीवरील एकूण जीवसृष्टीच धोक्याच्या सीमेवर येवून उभी राहिली आहे.
त्यामुळे वेळीच सावध होऊन समस्त मानव जातीने पर्यावरण संवर्धनासाठी वेळीच जागृत होऊन त्या दिशेने पाऊल टाकणे ही काळाची गरज बनली आहे . आता जेंव्हा हा दिवस साजरा करायचा असतो तेथे नुसते देखावा न करता त्या दिवशी आपण जे करण्यासठी जमलेलो असतो तेथे प्रत्यक्ष कृती आणि संगोपन दिसून आले पाहिजे ,उदा नुसते वृक्षारोपण कागदावरच करणे व कागदोपत्री घोडे नाचवणे . फोटो काढण्यापुरते वृक्षारोपण करून वर्षानुवर्षे एकाच खड्यात दरवर्षी वृक्षारोपण करणे. किंवा सुरुवातीलाच लावलेल्या रोपाला अवतीभोवती गाळा करून वृक्षारोपण करत असलेलेल भासवणे किंवा काही ठिकाणी तर रोपण केले जात पण त्याच संगोपन होत नसल्याने परिस्थिती जैसे थे होत आहे .
म्हणून जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना नुसते देखावा नको तर कृती हि तेवढीच महत्वाची आहे .
आज उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण केले गेले .येथील स्टाफ जेमतेम ५ जणांचा आहे यात भालेराव बालाजी सर नावाचे पर्यावरण प्रेमी शिक्षक त्यांनी तेथील शिक्षक स्टाफ असो किंवा गावकरी असो या सर्वांच्या मनात निसर्गाविषयी व पर्यावरणाविषयी प्रेम व जागृती निर्माण केलेली असून गेल्या ४ वर्षापासून येथील वृक्ष आणि त्याचे संगोपन उन्हाळ्यात पाण्याची कमतरता असताना देखील खिशातून पैसे देऊन गावातीलच निसर्ग प्रेमी सेवक राम मंडले मामा यांना पाण्याची व्यवस्था करवून खूप मोठ्या प्रमाणात झाडांची जोपासना करण्यात आली असून आज तेथील झाडे डोलदारपणे डोलताना दिसून येतात .
-श्री सुनिल नरसिंग राठोड मुरूम ९७६३९६१९९९
0 Comments