झाड



   झाड



इवले इवले अंकुर 

धरणी पोटी जन्मले,

डोळे उघडुनी पाहताच,

मनातल्या मनात हसले।


कोवळे कोवळे फांद्या त्याचे

नाजूक नाजूक हात,

पाखरे येऊन बसती त्यावर,

मिळाली त्याला साथ।


हिरवे हिरवे पाने त्याचे,

वाऱ्याच्या जोतावर डोले,

हर्षुनी पाहे चोहीकडे,

आनंदाने बोले।


बघता बघता मोठा झाला,

विस्तारुनी मोठे अंग,

चिमणी-पाखरं सारी येती,

खेळ खेळाया संग।


काळे काळे ढग येती,

भेटावयास सारे,

आनंदाने डोलू लागला,

विसरुनी भान सारे।


सुंदर सुंदर फळे नि फुले

वाटायला जग साऱ्या,

अभिमानाने फुलून जाई,

देऊनी दान जग साऱ्या।


अंत समयी येता जवळ,

थरकाप अंगाचा होई,

श्वास दिले जगण्या ज्यांना,

तोच मारुनी प्राण घेई।


मरता मरता हळूच हसुनी,

मनात स्वतःशी बोलून,

साथ तुझी मी न सोडू

तुझ्यासंगे सरणावर जळुन।



✍🏻श्री सुनिल नरसिंग राठोड , मुरूम,

चेतनगुणोक्ती अलंकार प्रस्तुत 

Post a Comment

0 Comments