हे मना..
हे मना..,
तू ब्रह्मांडच की,
कसलाच अंत लागू देत नाहीस
सतत संभ्रमात ठेवतोस,
असा कसा रे तू?
हे मना..
तू वेसण नसलेला घोडाच की,
सैराट धावतोस,
लवचिक असतोस
असा कसा रे तू?
हे मना..
तू ऋतुचक्र की,
सतत रंग बदलतोस,
सप्तरंगी असतोस,
असा कसा रे तू?
हे मना..
तू आकाशगंगाच की,
सीमाहीन असतोस,
वायूहीन दिसतोस,
असा कसा रे तू?
हे मना...
तू सुर्या आणि चंद्रच की,
तेजस्वी असतोस,
निस्तेज राहतोस
असा कसा रे तू?
हे मना..
तू एक गुपित रहस्यच की
गूढ अंधारात राहतोस,
अवघड कोडं बनतोस ,
असा कसा रे तू ?
हे मना...
तू निसर्गच की,
आवाक्याबाहेर असतोस,
कुणाच्या ताब्यात नसतोस,
असा कसा रे तू?
हे मना..
तू एक जादूगारच की,
संम्मोहित करतोस,
पण गुलाम बनवतोस,
असा कसा रे तू?
श्री सुनिल नरसिंग राठोड , मुरूम.
रूपक अलंकार प्रस्तुती..
0 Comments