तुमचं वागणं, आम्हाला जपणं,
आमच्या सुखासाठी तुमचं राबणं.
तुमचा तो स्नेह किती खरा,
जसा न अटणाऱ्या पाण्याचा झरा.
देऊन हजारो स्वप्नांच्या बळी,
झिजलात स्वतःच्या लेकरांसाठी .
स्वप्ने आमची फुलवण्यासाठी,
जसे फुलतात कळी.
जत्रेत बोट धरून चालायचं
अख्खं जग माझं वाटायचं.
सुटताच बोट तुमचं ,
जसं वणवा मनात पेटायचं.
बसुनी खांद्यावर बाजारात यायचो,
वहाणे तुमच्या पायात नसायचे.
फोडे तुमच्या पायात यायचे,
जसे विस्तूवरच्या पापडवर असायचे.
स्वतः राहुनी उपाशी,
लेकरांना खाऊ घाले तुपाशी.
रिकाम्या पोटावर हाथ फिरवी,
जसे अंध मूल पाटी गिरवी.
लेक जाताच सासरी,
समोर जरी नसलात रडून.
हुंदके देऊनी एकांतात रडता,
जसे लहान बाळ पडून.
श्री सुनिल नरसिंग राठोड
मुरूम.
1 Comments
Very nice keep going
ReplyDelete